Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi : लग्नाचा वाढदिवस म्हणजेच लग्नाला ठराविक वर्षे पूर्ण होणे होय. लग्नाचा वाढदिवस हा जोडप्यासाठी आनंदाचा क्षण असतो व या दिवशी चारही बाजूंनी लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश मिळत असतात. जर आपल्या देखील लग्नाचा वाढदिवस आलेला असेल तर सर्वात आधी आपणास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर या लेखात आम्ही आपल्यासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश घेऊन आलेलो आहोत. यामध्ये लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश फोटो – Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi व लग्न वाढदिवस आभार बॅनर देण्यात आलेले आहेत.
या लेखात देण्यात आलेले आभार संदेश तुम्ही शुभेच्छा पाठवणाऱ्या व्यक्ती सोबत शेअर करू शकतात व लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू शकतात. आम्ही आशा करतो की या लेखातील Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi आपणास नक्कीच उपयोगी ठरतील तर चला सुरू करूया..
Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या रूपाने आपला स्नेह समजला
त्याबद्दल आपले मनापासून आभार
असाच स्नेह आमच्यावर राहो.. खूप खूप आभार
आपल्यासारखी मोठ्या मनाची माणसं
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन
माझ्या नजरेत अजून मोठी झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार
लग्न वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छांचा वर्षाव झाला
सगळ्यांच्या शुभेच्छा बघून मनाला मोठा आनंद झाला
सगळ्यांचे अगदी मनापासून आभार
असंच प्रेम सोबत राहो हीच ईश्वराकडे मागणी
वाचा> लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश
विविध माध्यमातून आपण माझ्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आपले खूप आभार असच प्रेम वृध्दिंगत होत राहो

लग्न वाढदिवशी वेळात वेळ काढून आपण शुभेच्छा दिल्या
आणि आपल्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती समजून
आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे
आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार
आपली आपुलकी, आपलं प्रेम असच राहावं
माझ्या लग्नावर दिवशी व्यक्त केलेले प्रेम असच कायम राहावं
आपले मनापासून आभार
लग्न वाढदिवस हा एक दिवसाचा आहे
परंतु आपल्या शुभेच्छांचा स्नेह आयुष्यभर माझ्यासोबत आहे ही ग्वाही देऊन आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनापासून आभार व्यक्त करतो
आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा देऊन मला आपल्यातलं एक व्यक्ती मानलं त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
आकाशाला शोभा जशी इंद्रधनुष्य प्रमाणे येते
तशीच आमच्या विशेष दिनाला तुमच्या शुभेच्छांमुळे शोभा येते
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या स्मरणात राहतील त्याबद्दल आपले खूप खूप आभार
माझ्या लग्न वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत त्याचा मनातून स्वीकार करून असाच स्नेह राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना
आपल्या शुभेच्छा पाहून मला मी जोडलेल्या माणसांची श्रीमंती समजून आली
आपल्या मनात माझ्याविषयी असणारी जागा बघून आपल्या नात्याला नवीन नजर आली
लग्न वाढदिवशी शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
लग्न वाढदिवस आभार संदेश बॅनर

माझ्या लग्न वाढदिवशी आपण दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छा माझ्या आनंदात भर घालतील
आपल्यासारखी माणसं जगण्याचं मोल ठरतील लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनापासून आभार
लग्न वाढदिवसाचा आनंद तुमच्या शुभेच्छा तून वाढून येतो
माझ्यावर आपल्या असणाऱ्या प्रेमाची हा दिवस साक्ष देतो
आपले मनापासून आभार
आपल्या शुभेच्छांच्या रूपाने आपला आमच्यावर असणारा स्नेह कळाला
आनंददायी आमच्या संसाराला तुमच्या शुभेच्छा तुला आशीर्वाद मिळाला
आपला ऋणानुबंध असाच वाढत राहो हीच देवाकडे मागणी
लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना व्यक्त केल्याबद्दल आपले मनापासून आभार
आपल्यासारखी माणसं माझ्या जीवनात आहे याचा मला आनंद आहे
आपण लग्न वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा परतावा करता येणार नाही
आपल्यासारखी माणसं मागूनही प्रत्येकाला मिळत नाही
आपले खूप खूप आभार
आपली माझ्यावर असणारे आपुलकी शुभेच्छा तून समजून आली
आपल्यासारखी माणसं जीवनात असणं म्हणजे आयुष्याची पर्वणी झाली
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनापासून आभार

आपल्या शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विगुणीत झाला
आपण लग्न वाढदिवशी शुभेच्छा देऊन माझ्यावर आनंदाचा वर्षाव केला
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनस्वी आभार
आपला अनमोल स्नेह असाच स्मरणात राहील
आपल्या शुभेच्छा माझ्या आयुष्यात आनंद वाढवत राहील
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
तुमचं आमच्यावर असणार प्रेम शुभेच्छातून व्यक्त झालं
असंच प्रेम आमच्यावर असावं
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करून आपले खूप खूप आभार
तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम लग्न वाढदिवस आभार संदेश – Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi शेअर केलेत. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. आणि या शुभेच्छा संदेश पैकी आपण आपल्या आवडीचे संदेश नक्कीच शोधून काढले असतील. आमची इच्छा आहे की तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्ति सोबत आपण हे शुभेच्छा संदेश शेअर करावेत आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करावे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश फोटो आपणास कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद..
READ More
Join our Whatsapp Group> Click Here