First Marriage Anniversary Wishes in Marathi या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत नवीन लग्न झालेल्या आणि लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणाऱ्या जोडप्या साठी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. लग्नाचा पहिला वाढदिवस लग्न झालेल्या जोडप्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आपण या लेखातून कॉपी करून आपल्या जोडीदाराला पाठवू शकतात. हे सुंदर शुभेच्छा संदेश वाचून त्यांना नक्की आनंद होईल व यामुळे तुम्हा दोघांच्या प्रेमात देखील वाढ होईल. तर चला सुरू करूया..
First Marriage Anniversary Wishes in Marathi
नव्या आयुष्याला सुरुवात
झाली होती सप्तपदीने
पाहता पाहता
वर्षंपुर्ती झाली प्रेमाने…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

तुझ्या माझ्या संसाराला
…आणि काय हवे
कधी तू पुढे, कधी मी पुढे
असा करत वर्षा मागून वर्षं जावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
सुखी संसाराला दोन
प्रेमळ मन पुरे असतात
निरंतर या प्रवासात
एकमेकांचे हात हातात असतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

हॅलो , वरून सुरू झालेला
प्रवास….
अहो वर येऊन थांबला
अगं अगं म्हणत
लग्नाचा पहिला वाढदिवस आला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐
प्रेमात होतो दोघे
भान नव्हते जगाचे
संसार सुरू झाला
मन जुळत गेले दोघांचे
अजून पुढे बरेच जायचे आहे
आता साजरे करू सुख
एका वर्षाचे….
तुझ्या संगतीने नव्या
आयुष्याला सुरुवात केली
समर्पण करून दोघांनी
संसाराची ज्योत वाढवली
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप 💐

लग्नाची वर्षंपुर्ती
व्हायला लागत नाही वेळ
अनोळखी चेहरे
ओळखीच्या व्हायचा
असतो हा खेळ
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
तू दिलेले प्रेम
मी सहजतेने स्विकारले
कारण प्रेमाआधी तू
आदराने आयुष्यात आणले…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
लग्नाचा तो दिवस
आज पुन्हा मला आठवला
दिवस खास होता तो
जो मी तुझ्या नावे केला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐
लग्न झाल्यावर
अस्तित्व स्वताचे
विसरायचे नसते
हातात हात देऊन
पुन्हा स्वतःला
भेटायचे असते
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
प्रेम तू ही केले होते
प्रेम मी ही केले होते
संसाराला आपल्या
सोबतीने सजवले होते
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
सोपं नसतं नव्या
घरात असे रमून जाणे
तू होता सोबतीला
म्हणून सहज
झाले हा संसार करणे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
प्रेमाला प्रेमाने बहरावयाचे असते
दोघांनी मिळून स्वप्न हे जगायचे असते
लग्न झाले ते मिळून जपायचे असते
असे कित्येक वर्षे साजरे करायचे असते
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐
दोघांनी समजावून घेतलं
म्हणून घर आपले फुलले
माझ्या पाठीशी तू उभा होता
म्हणून एक वर्ष किती आनंदात गेले
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
थोडे माझे रूसणे
थोडे तुझे मनवणे
चालले वर्षभर
आज जसे आहोत
तसेच राहू आपण
जन्मभर…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
पाहता पाहता
बघं एक वर्ष झाले
नवरी म्हणून पाऊल
टाकले काल…
आता अर्धागिणी
म्हणून जंगले
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐
संसार दोघांनी मिळून
बहरावयाचे असते
कठिण प्रसंग आले
तेव्हा खंबीर उभे
राहून सामोरे जायचे असते
कित्येक गोड आठवणी
दिल्यात या वर्षाने
थोडं हसलो
थोडं रूसलो
तरी जगलो फार हर्षाने
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
क्षणोक्षणी असाच
गोडवा संसारातील
वाढत राहो…
शुभ लग्नाचा वाढदिवस
पुन्हा पुन्हा येत राहो
वचन घेतले होते सात जन्माचे
सोडणार नाही हातातला हात कधी
तू आली अलगद पावलांनी
जशी समुद्राला मिळते नदी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
नाते हे विश्वासाचे
कधी तुटु नये
तुझ्या माझ्या संसाराला
नजर कधी लागू नये
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
प्रेमाचा धागा हा
कायम आपण टिकवू
स्वप्न दोघांचे
दोघांनी मिळून पुर्ण करु
आज पहिलाच वाढदिवस
आपल्या लग्नाचा…
पुढेही असेच वर्षानुवर्षे
साजरे करु
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
आपल्या संसारात
समर्पण दोघांचं असावं
प्रेमाचं उदाहरण
आपला संसार बनावं
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
सुख दुःखात
हात धरून राहू दोघांचे
स्वप्न डोळ्यातले
रंगवू आपल्या संसाराचे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
First Marriage Anniversary Wishes in Marathi

अख्खं जग जरी सोबत नसले
तरी तुझी साथ पुरेशी आहे
कठिण प्रसंगात तु दिलेली
प्रेमळ हाक पुरेशी आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
अक्षदांच्या सरित नाहलो
तू माझी, मी तुझा झालो
प्रवास सुरू झाला जन्मभराचा
सोबतीने संसारात वाहतो
अनमोल आठवणींचा
दिवस तो खास होता
अतुट क्षणांच्या उधळण्याचा
लग्नांचा दिवस सुंदर होता
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
गाठ बांधली परमेश्वराने
दोन जीवांची
प्रेम भरुयात दोघे
वेचुयात फुले सुखांची
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
वाढदिवस लग्नाचा
आला आनंद घेऊन
एक वर्षाच्या
आठवणींना पुन्हा जगवू
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
मी विश्वासाने
हातात हात दिला
तू त्याच विश्वासाने
सहजच जपला
संसारात त्याग
संघर्ष दोघांनी केला
प्रेमरूपी संसार
छान बहरला…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तर मंडळी आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही सुंदर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शेअर केले आहेत. आशा करतो की हे First Marriage Anniversary Wishes in Marathi आपणास आवडले असतील व आपल्या जोडीदाराला देखील हे नक्कीच आवडतील. व या सुंदर शुभेच्छा संदेश मुळे आपल्या प्रेमात नक्की वाढ होईल.
हे पण वाचा