marathi suvichar for students : नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमाने मी तुमच्यासाठी Best Motivational quotes in Marathi for students म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार घेऊन आलेलो आहे. मला पूर्ण आशा आहे की हे विचार तुम्हाला यश संपादन करण्यात उपयुक्त ठरतील, व तुमच्या यशाच्या मार्गामध्येही मदत करतील.
आजच्या काळात विद्यार्थ्याना अभ्यास आणि मेहनत करण्यासाठी प्रेरणा मिळणे आवश्यक आहे या लेखामधील Motivational quotes in Marathi for students सर्वच विद्यार्थ्यानी वाचून आत्मसात करायला हवेत.
marathi suvichar for students
स्वताला पुढे ढकलत रहा
कारण दुसरे कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही.
‘कठीण परिश्रम’ हाच यशाचा एकमेव मंत्र आहे.
तुमच्या मर्यादा, या फक्त तुमच्या कल्पना आहेत.
जर तुम्हाला सूर्याप्रमाणे चमकायचे असेल
तर आधी सूर्याप्रमाणे जळायला शिका.
‘अपयशाचा हंगाम’ हाच यशाची बीजे पेरण्याचा
सर्वोत्तम काळ असतो- स्वामी परमहंस योगानंद.
तुमच्यासमोर 9 ससे असतील
आणि तुम्हाला एक पकडायच्या असेल.
तर फक्त एकावरच लक्ष केंद्रित करा- जॅक मा.
भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल
तर तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहचू शकणार नाही
त्यापेक्षा बिस्किट टाका आणि पुढे चला- धीरूभाई अंबानी.
Motivational images in Marathi for students
तुम्ही तोपर्यंत हरत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे थांबवत आहे
-अल्बर्ट आईन्स्टाईन
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल
तर तुम्हाला आपल्या कामात एकाग्रता आणावी लागेल.
जो पर्यँत तुमच्यावर कोणी तरी जळत नाही
तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहे हे कळत नाही.
मैदानात हरलेला व्यक्ती जिंकू शकतो,
परंतु मनातून हरलेला व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही
म्हणून मनातून कधीही हार मानू नका.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात,
तर अयशस्वी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
यशाचा कोणताही मंत्र नाही,
यश हे फक्त कठीण परिश्रमाचे फळ आहे.
marathi thoughts for students
जर वेळेवर वाईट सवय बदलली नाही
तर लवकरच ती सवय तुमचे जीवन बदलून टाकते.
अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.
स्वतःची चूक स्वीकार करणे
हा महान लोकांचा महत्त्वपूर्ण गुण आहे.
उदयाला सोप्प बनवण्यासाठी तुम्हाला
आज मेहनत करावी लागेल.
स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी
त्यांना व्यवस्थित पाहावे लागते- डॉ अब्दुल कलाम
विद्यार्थ्यांसाठी मराठी प्रेरणादायी सुविचार
अंधाराला घाबरू नका, कारण तारे अंधारातच चमकतात.
कोणताही व्यक्ती जन्माने नव्हे, तर आपल्या कार्याने महान होतो.
वेळ दिसत नाही परंतु खूप काही दाखवून देतो.
चुका करणे वाईट नाही,
परंतु चुका करूनही न शिकणे खूप वाईट आहे.
चांगली पुस्तके व चांगले लोक लवकर लक्षात येत नाहीत त्यांना वाचावे लागते.
वाट पाहू नका,
कारण वाट पाहणार्यांना तेवढेच मिळते
जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.
कठीण काळात समजदार व्यक्ती मार्ग शोधतो
तर भित्रा व्यक्ती निमित्त बनवीतो.
जो व्यक्ती संकटांपासून दूर पडतो
तो कधीही यशस्वी होत नाही.
आपल्या यशाची व्याख्या जर भक्कम असेल
तर आपण सदैव अपयशाच्या दोन पावले पुढे असू.
Inspirational quotes for students in Marathi
संकटांना हरवूनच यश प्राप्त केले जाते.
जीवनात जिंकण्याचे महत्त्व त्यालाच
कळते ज्याने हारेचा स्वाद चाखला आहे.
प्रयत्न करणारे कधीही हरत नाही,
ते काही ना काही नवीन शिकत असतात.
शांततेत प्रयत्न करा एक दिवस तुमचे यश आवाज करेल.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
दुसऱ्याच्या राजवाड्यात गुलामी करण्यापेक्षा,
स्वतःच्या झोपडीत राज्य केलेले कधीही चांगले.
ध्येय उंच असेल तर झेपही उंचच घ्यावी लागेल.
Also read>> Short marathi suvichar for students
तर मित्रांनो हे होते काही Motivational quotes in Marathi for students. मला आशा आहे की हे विद्यार्थ्यांसाठीचे मराठी सुविचार तुम्हाला हे मराठी सुविचार कसे वाटले मला कमेन्ट करून नक्की सांगा व या marathi quotes ला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आयुष्यात पुढे जाण्यास प्रेरणा मिळेल. धन्यवाद
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..