{101} सोपे शालेय सुविचार मराठी संग्रह | Best Success quotes in Marathi

someone says that “The secret of getting ahead is getting started” therefore in today’s post i am going to share with you Success quotes in Marathi this Marathi quotes will inspire you and help to achieve success In addition to marathi sucess quotes, simple marathi suvichar also available for sucess in your life.

थोर महापुरूषांचे सुविचार आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी सोपे मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. हे शालेय सुविचार मराठी संग्रह टेक्स्ट आणि फोटो दोघी स्वरूपात रुपलब्ध आहेत. विद्यार्थ्याना शालेय परीपाठत हे सुविचा खूप उपयुक्त ठरतील या शिवाय हे शालेय सुविचार मराठी भाषेत आणि छोटे असल्याने समजायलाही सोपे आहेत.

शालेय सुविचार मराठी

शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून देते.


शिक्षण हे सर्वात प्रभावी हत्यार आहे, ज्याचा उपयोग तुम्ही जग बदलण्यासाठी करू शकतात.


जो शाळेचे दरवाजे उघडतो तो जेलचे दरवाजे बंद करतो.


पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडते.


प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते, मग त्याला विरोध होतो, शेवटी त्याच विचारांचा स्वीकार केला जातो.


परिस्थिति गरीब असली तरी चालेल, पण विचार ‘भिकारी’ नसावेत…


आपणा सर्वांकडे समान कौशल्य नाही, पण ते कौशल्य विकसित करण्याची समान संधी मात्र आहे- रतन टाटा.


success quotes Marathi

समजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान काहीही कामाचे नाही.


ज्यांना हरण्याची भीती आहे त्यांचा पराभव निश्चित आहे- नेपोलियन


आपल्या आत्मसन्मानाचे रक्षण हा माणसाचा प्रथम धर्म आहे- मूंशी प्रेमचंद


दिवसभरात एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे न केल्यास तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीच्या भेटीची संधी गमवाल. स्वामी विवेकानंद


गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीही हितचिंतक नसतो.


तुम्हाला पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका. पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका- लोकमान्य टिळक


एखादी उत्तम लहानशी गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचे कालांतराने मिळणारे फळ हे महाकाय असते.


ज्ञान म्हणजे शिकण, शहाणपण म्हणजे काही ना काही सोडून देणं.


success status in marathi

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा.


कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे, तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजळ पाडतो.


शहाणपण कोणालाही शिकवता येत नाही ते उपजतच असावं लागत.


परिस्थितीप्रमाणे बदलणाऱ्या माणसाच्या सहवासात राहण्यापेक्षा परिस्थिती बदलणाऱ्या माणसांच्या सहवासात रहा.


तीन गोष्टी जास्त वेळ लपून राहत नाहीत, सूर्य, चंद्र आणि सत्य- गौतम बुद्ध


प्रत्येक दिवस हीे तुम्हाला मिळालेली दुसरी संधी असते.


कौतुक हा शब्द खूप छोटा आहे. पण ते करायला मन मात्र मोठे लागते.


गरुडाइतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधीही उडणे सोडत नाही.


ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे. परंतु ज्ञाना नंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे.


सोपे मराठी सुविचार

दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे- स्वामी विवेकानंद.


प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा प्रगती करत नाही.


संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे- डॉ. एपीजे अब्दुल कलाम.


सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.


काळोखास कोसण्यापेक्षा एक लहान मेणबत्ती पेटवणे अधिक श्रेयस्कर असते.


दुसऱ्याबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल.


ज्या कर्तव्यात हृदयाचा जिव्हाळा नाही ते कर्तव्य किती चांगल्या प्रकारे केले तरी जगाला जिंकू शकणार नाही- साने गुरुजी


स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.


Read More

तर मित्रांनो हे होते काही success marathi suvichar. मला आशा आहे की तुम्हाला हे marathi quotes नक्कीच प्रेरणादायक वाटले असतील. हे शालेय मराठी सुविचार तुम्ही तुमच्या शाळेच्या ब्लॅकबोर्ड वर लिहू शकतात. आपली मित्र मैत्रिणीना हे सुविचार सांगून प्रेरित करू शकतात.