मित्रांनो वरवर जरी आपण आपल्या बहिणीशी भांडत असलो, तिला चिडवत असलो तरी आपले आपल्या बहिणी वरचे प्रेम फार असते आणि अश्यातच बहिणीचा वाढदिवस किंवा बहीण भावाचे सण जसे रक्षाबंधन व भाऊबीज आलेत तर सांगूच नका. या दिवशी संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण असते.
अनेक भावांच्या बहिणीचे लग्न झालेले असल्याने ते आतुरतेने आपल्या ताईच्या येण्याची वाट पाहत असतात. व जर अश्या प्रसंगी आपण आपल्या ताईला काहीतरी नवीन गिफ्ट भेट केले तर… तर मग सांगूच नका तिचा आनंद तर गगनात मावेनासा होईल. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही बहीणी करिता गिफ्ट आयडिया घेऊन आलेलो आहोत. या सर्व भेट ऑनलाईन उपलब्ध असल्याने आपण त्यांना ऑनलाइन खरेदी करू शकतात. तर चला सुरू करुया…
बहिणीसाठी वाढदिवसाची भेट – Gift Ideas For Sister in Marathi
टेडी बिअर
टेडी बियर अर्थात सॉफ्ट टॉय प्रत्येक मुलीची पसंद असते. जर आपल्या सुचत नसेल की बहिणीला काय भेट द्यावी तर आपण तिला सॉफ्ट टॉय म्हणून एक मोठ्या आकाराच्या टेडीबियर भेट देऊ शकतात. हे टेडी बियर वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांची साइज आणि किंमत पाहू शकतात.
नेम लेटर नेकलेस
स्त्रियांना ज्वेलरी घालण्याची फार आवड असते. आपण अनेक मुलींना त्यांच्या नावाचे पहिले अक्षर असलेले नेकलेस घातलेले पाहिले असेल. म्हणून आपणही आपल्या बहिणीला वाढदिवशी तिच्या नावाचे पहिले अक्षर असलेले नेकलेस भेट देऊ शकता. हे नेकलेस A-Z सर्व अक्षरात उपलब्ध असल्याने आपण आपल्या नावाप्रमाणे लेटर निवडू शकतात.
हेडफोन
मुलींना गाणे ऐकण्याची सुद्धा आवड असते. जर आपल्या बहिणीला देखील गाणे ऐकण्याची आवड असेल तर आपण तिला उत्तम दर्जाचे हेडफोन भेट म्हणून देऊ शकतात. याशिवाय आपण एअर फोन देखील खरेदी करू शकतात. जर आपण आपल्या बहिणी करिता चांगले गिफ्ट शोधत असाल तर हेडफोन अथवा इयरफोन फार उत्तम ठरेल.
स्माईली पिलो
टेडी बिअर नंतर सर्वात छान व आकर्षक गिफ्ट स्माईली पिलो चे असू शकते. आपण पाहू शकतात चित्रात दाखवल्याप्रमाणे या उशी दिसतात. इमोजी सारखे चेहरे असणाऱ्या या उशी दिसण्यात फारच आकर्षक असतात. स्माईली पिलो पाहून तुमच्या ताईचा चेहऱ्यावर देखील स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.
घड्याळ
हातात असणारी घड्याळ अथवा ब्रेसलेट मुलींना खूप आवडते व जवळपास सर्वच मुली आपल्या हातात घड्याळ घालतात. म्हणून जर आपणही आपल्या बहिणीला तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून काही गिफ्ट देऊ इच्छिता तर आपण ही उत्तम डिझाईन असलेली घड्याळ देऊ शकतात. ही घड्याळ खरेदी करण्यासाठी ची लिंक खाली देण्यात आली आहे..
Also read> Happy Birthday wishes in Hindi
हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायर
हेअर स्ट्रेटनर व ड्रायर अश्या गोष्टी आहेत ज्यांची प्रत्येक मुलीला नितांत आवश्यकता असते. जवळपास प्रत्येक मुलीला आपल्या केसांशी प्रेम असते म्हणून जर आपण आपल्या ताईला वाढदिवशी काही भेट देऊ इच्छित असाल तर हेअर स्ट्रेटनर आणि ड्रायर चा हा सेट आपल्याला उपयोग ठरेल. या दोन्ही वस्तू कॉम्बो मध्ये खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
पर्स
तुमची बहीण जॉब, शिक्षण किंवा घरकाम काहीही करीत असेल, तरी सर्व कंडीशन मध्ये आपण आपल्या बहिणीला पर्स अथवा हंड बॅग भेट देऊ शकतात. या पर्स मध्ये तुमची बहिण आपला मोबाईल, मेकअप चे लहान मोठे समान, रूमाल इत्यादी वस्तू ठेवू शकते. आपण पुढील लिंक वर क्लिक करून उत्तम क्वालिटी ची 3 पर्स मात्र 500 रुपयात खरेदी करू शकतात..
तर मित्रहो हे होते बहिणीसाठी काही उत्तम गिफ्ट आयडियाज. आशा आहे की हे सर्व भेट आयडिया आपणास आवडले असतील आणि आपण आपल्या बहिणीला देण्याकरिता योग्य गिफ्ट शोधून काढले असेल.
READ MORE
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..