आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या गोष्टी शिकून निरंतर प्रयत्न करणे आवश्यक असते. आणि नेहमी प्रयत्न करीत राहण्यासाठी व्यक्तीला कोणतीतरी प्रेरणा आवश्यक आहे. आपण ही प्रेरणा, हे मोटिवेशन मराठी सुविचार (marathi suvichar short) द्वारे प्राप्त करू शकतात. या मधील आजचा सुविचार मराठी तुम्ही दररोज वाचावेत.
या लेखात तुम्हाला Marathi short SUVICHAR देण्यात आलेले आहेत. हे आजचा सुविचार मराठी तुम्हाला नेहमी प्रेरित करीत राहतील. शालेय परीपाठात आपण short suvichar in marathi हे आजचा सुविचार मराठी म्हणून वापरू शकतात.
Marathi Suvichar Short
जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो.
वाचाल तर वाचाल.
राजाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आधी गुलामाप्रमाणे मेहनत करावी लागते.
अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.
शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो.
जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच जगात किंमत.
प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याचे अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करा.
ध्येयावर पोहोचता न येणे ही शोकांतिका नाही.., तर पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.
पैसे कमवणाऱ्याला ‘इज्जत’ फ्री मध्ये मिळते.
माणसाकडे हरण्याची ताकद पाहिजे, जिंकता कधी ही येते.
प्लॅन असलेला मूर्ख हा प्लॅन नसलेल्या हुशार माणसाला हरवू शकतो.
जो पर्यँत तुमच्यावर कोणी तरी जळत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत आहात हे कळत नाही.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा.
एकावेळी खूप गोष्टींचा विचार करत बसू नका सुरुवात लहान करा पण स्वप्न मोठे ठेवा.
उघडून वाचल्याशिवाय पुस्तक कळत नाही आणि समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही.
यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागते.
स्वप्ना शिवाय जीवन हे अर्थ नसलेले जीवन आहे.
दुसऱ्याच्या राजवाड्यात गुलामी करण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत राज्य केलेले कधीही चांगले.
Short suvichar in marathi
स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं.
चांगले दिवस पाहायचे असतील तर आधी वाईट दिवसांचा सामना करायला तयार राहा.
जर तुम्हाला सूर्यासारखा चमकायचे असेल तर प्रथम त्याच्यासारखे जळावे लागेल.
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटतं असला तरी तो दगाबाज कधीच नसतो.l
Also Read> Suvichar in Gujarati
गरूडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.
वेळ वाया गेला याचे दुःख करण्यात वेळ घालवणे म्हणजे अजून वेळ वाया घालवणे होय.
तुमच्या आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो.
काट्यावरुन चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल.
यशाचे कोणतेही गुपित नाही यश म्हणजे कठोर परिश्रम आणि अयशस्वी होण्यापासून शिकण्याचे परिणाम आहे.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त रहा.
‘कष्ट’ ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.
आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव म्हणजेच… ‘संस्कृती’.
आयुष्यात मिळालेल्या अनुभवामुळेच चांगले निर्णय घेता येतात.
पाण्यात पडणे धोकादायक नाही पण हात पाय न मारणे धोकादायक आहे.
दिव्या सारखे जगा. जो राजाच्या महालात आणि गरीबाच्या झोपडीत सारखाच प्रकाश देतो.
प्रत्येक उद्दात कार्य स्वतःसाठी योग्य स्थान निर्माण करूनच घेते.
मन स्थिर असेल तर विचार भरकटत नाहीत आणि स्थिर विचार यशाचा रस्ता चुकत नाही.
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.
आजचा सुविचार – Aajcha suvichar
आपली सावली निर्माण करायची असेल तर ‘ऊन’ झेलण्याची तयारी असावी लागते.
विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण तेच शक्तीचे उगम स्थान आहेत.
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
उद्योगप्रियता, बुद्धिमत्ता आणि सातत्य यामुळे कीर्ती आणि सद्भावना लाभते.
नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे भेटलेली माणसे.
स्वतःच्या अंतरात्मा च्या आवाजा नुसार वर्तन केल्यास कीर्ती सहजतेने प्राप्त होते.
श्रीमंतीचा मंत्र शाळेतून नाही तर अनुभवातून मिळतो.
घोळक्यात चालायची सवय असणाऱ्यांना स्वतःच्या आयुष्याची दिशा कधीच ठरवता येत नाही.
आजचा सुविचार मराठी या पोस्ट मध्ये आम्ही सर्व वाचक मित्रांकरीता काही उत्तम marathi suvichar short मध्ये घेऊन आलो आहोत. आशा आहे या लेखातील मराठी सुविचार आपणास आवडले असतील व या मधून तुम्हाला चांगले मोटिवेशन देखील मिळाले असेल.
यापैकी आजचा सुविचार मराठी – marathi suvichar short आपणास आवडले असतील तर आपण यांना आपले मित्र मंडळी सोबत शेअर करू शकतात व त्यांना देखील योग्य प्रेरणा देऊ शकतात. धन्यवाद
READ MORE:
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..