30 मराठी कटु सत्य वचन | Katu Satya in Marathi with images

Katu Satya in Marathi: आजच्या या लेखात मराठी कटू सत्य वचन देण्यात आले आहेत. हे कटू सत्य तुम्हाला जीवनाची सत्यता समजावतील. katu satya vachan सोबत katu satya images in marathi देखील देण्यात आले आहेत. ह्या फोटोस ला आपल्या मित्रांसोबत शेअर करून आपण त्यांनाही प्रेरणा देऊ शकतात.

Katu Satya in Marathi

Katu Satya in Marathi

लोकांना वाटते की तुम्ही चांगले करावे,
परंतु हे देखील सत्य आहे की
त्यांच्या पेक्षा चांगले करावे हे त्यांना मान्य नसते.

गरीब व्यक्ती जमिनीवर बसला
तर ती त्याची औकात म्हटली जाते.
आणि श्रीमंत व्यक्ती जमिनीवर बसला
तर तो त्याचा मोठेपणा मानला जातो.

जोपर्यंत मनात खोटं आणि हृदयात पाप आहे,
तोपर्यंत निरर्थक सर्व मंत्र आणि जप आहेत.

शब्द कितीही काळजीपूर्वक वापरा
ऐकणार त्याच्या सोयीनुसारच अर्थ लावतो.

हजारो किलोमीटर च्या प्रवासाची सुरुवात
एका छोट्या पावलाने होते…
कठीण परिस्थितीतही मार्ग काढणारा
मनुष्यच श्रेष्ठ असतो.

मराठी कटु सत्य वचन

लोकांना ऐकवण्यासाठी आपला
आवाज उंच करू नका,
आपले व्यक्तित्व येवढे उंच करा की लोक तुमचा
आवज ऐकण्याची ईच्छा व्यक्त करतील.

कटु सत्य वचन

पोटात गेलेलं विष एका व्यक्तीलाच मारते,
परंतु कानात गेलेले विष अनेकांना मारते.

नशीबवान तो नाही ज्याचे नशीब चांगले आहे,
परंतु तो आहे जो आपल्या नशिबाने खुश आहे.

आयुष्यभर साथ देणारी माणसे कमवा,
काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटतात.

शिक्षक आणि मार्ग दोघी एक सारखेच असतात
स्वतः जिथे आहेत तिथेच राहतात,
परंतु इतरांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवून देतात.

Katu Satya in Marathi

संधीची वाट पाहणारा व्यक्ती साधारण असतो,
असाधारण व्यक्ती संधी निर्माण करतो.

पैसा नसेल तर माणसाची किंमत देखील नसते.

आपलेपणा तर सर्वच दाखवता
पण आपले कोण आहे हे फक्त वेळ सांगते.

स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी
एका छोट्या अपमानाची आवश्यकता असते.

पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडतो,
त्याप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची आणि आनंदाची वाट सापडते.

कटु सत्य विचार मराठी

आपण सर्वांकडे समान कौशल्य नाही,
पण ते कौशल्य विकसित करण्याची
समान संधी मात्र नक्कीच आहे.

सुख आणि दुःख दोघी
प्रत्येक व्यक्तीला सारखेच मिळते.

“पुण्य” छप्पर फाडून देते.
“पाप” थाप मारून घेते.

जवळ राहून परक्यासारखे वागणारी
आपलीच माणसं असतात.

मराठी कटु सत्य वचन

खोटे बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच आवडतात,
खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात.

मराठी माणूस पैशाने मोठा झाला की,
मराठी बोलायला फार लाजतो.

आग लावणार यांना कुठे माहीत असतं,
जर वाऱ्याने दिशा बदलली तर ,
त्यांची सुद्धा राख होणार आहे.

तर मित्रहो हे होते कटु सत्य सुविचार मराठीkatu satya in marathi. आशा करतो आपणास हे सुविचार आवडले असतील. सत्य वचन मराठी हे सुविचार आपण व्हाटसअप्प व इतर सोशल मीडिया वर शेअर करू शकतात.

अधिक वाचा :

Shares