बेस्ट फ्रेंड कॅप्शन | Best Friend Captions in Marathi For Girl & Boys

मंडळी मैत्री ही अशी गोष्ट आहे जी जीवनात प्रत्येकाला हवीहवीशी वाटते आणि का नको? प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मित्र असावा ज्याच्या सोबत गप्पा गोष्टी करतांना वेळेचे भान हरपावे, जीवनातील सुख दुख ज्याच्या सोबत निसंकोच शेअर करता यावीत. अशी मित्र मैत्रिणीलाच बेस्ट फ्रेंड म्हटले जाते.

जर आपल्या आयुष्यातही असा एखादा बेस्ट फ्रेंड असेल ज्याला आपण कधीच विसरू शकत नाहीत तर आशा बेस्ट फ्रेंड साठी आम्ही या लेखात Best Friend Captions in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे Caption आपण आपल्या प्रिय मित्राला Instagram वर tag करू शकता अथवा आपण आपल्याला आवडेल त्या

Best Friend Captions in Marathi

Best Friend Captions in Marathi For Boys

मैत्रीचं नातं आपलं कायम बहरत राहील
वर्षानुवर्षे आपली मैत्री अशीच राहील
#मैत्रीतलप्रेम

आपली मैत्री कोणाला समजणार नाही
आणि एकदा समजली की कोणीही तिला विसरू शकणार नाही

मैत्री आपली चंद्र ताऱ्यासारखी
प्रत्येक वेळी सोबत राहणारी
एकमेकात जगणारी

जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ आहे
मला कशाची पर्वा नाही कारण तू माझा मित्र आहे

दूर आणि जवळ अशी मैत्रीला बंधने नाहीत
तुझ्या-माझ्या मैत्रीला जी किंमत आहे तितकी किंमत आयुष्यात कशालाच नाही

बेस्ट फ्रेंड म्हणजे आपण न बोलता आपल्याला समजून घेणारी व्यक्ती
#मैत्री_हेच_पद_मैत्री_हाच_धर्म

कितीही आनंदाचा क्षण असो मित्रांशिवाय त्यात मजा नसते
आणि जिथे मित्र असतो तेथे कशाचीच कमतरता नसते

हातावर मोजण्या इतके मित्र असले तरी चालतील
फक्त ते जिवलग हवेत

मैत्रीचा आपला हा बंध जगावेगळा आहे
तू माझा आणि मी तुझ्या काळजाचा तुकडा आहे

फुलाला सुगंध जसा लागतो
तसाच प्रत्येक क्षणात मला माझा मित्र सोबत हवा असतो

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी किंमत कळत जाईल
मैत्री काय असते हे सगळ्या जगाला आपल्याकडे बघून समजत राहील

आयुष्य निर्धास्त करणारी मैत्री प्रत्येकाला मिळत नाही
ती तुझ्या रूपात मला मिळाली
समुद्र आणि लाटेची जशी सोबत असते
तशीच तुझी माझी मैत्री मला भासते

शब्दांनी कळण्या इतकी आपली मैत्री सोपी नाही
तुझ्या मैत्रीशिवाय माझ्या आयुष्याला मजा नाही

आपली प्रत्येक गोष्ट ज्याला माहित असते तो आपला बेस्ट फ्रेंड असतो

रक्ताचं नातं नाही आपलं पण रक्ताच्या पलीकडचं नातं आहे आपलं
माझा बेस्ट फ्रेंड

जीवनात अनेक नाती असतात त्यात मैत्री ही सर्वश्रेष्ठ नातं आहे

आपल्या सुखात अनेक सोबतीला असतात परंतु आपल्या दुःखात आपल्याला सावरायला एक हक्काचा मित्रच लागतो

बेस्ट फ्रेंड शिवाय जगणं कसं काहीतरी अपूर्ण असल्यासारखं भासतं
मैत्रीतच खरं जीवनाचं गुपित दडलेलं असतं

आपल्या सुखात अनेक सोबतीला असतात परंतु संकटाच्या वेळी भक्कमपणे साथ निभावतो तो खरा मित्र

या सगळ्या समस्येवरचा उपाय म्हणजे आपला जिवलग मित्र असतो

जीवनात एक खास मित्र हवाच असतो
तो प्रत्येक परिस्थितीत आपली साथ न मागता देत असतो

परिस्थिती कशीही असो विना संकोच आपली साथ निभावतो तोच खरा आपला मित्र असतो

मैत्री आपली जन्मोजन्मीची
जीवनाच्या शेवटपर्यंत वचन देतो ती निभवण्याची

हजारो लोकात आपल्याला आपला मित्र जवळचा वाटतो
आपल्यासाठी शेवटपर्यंत निष्ठावंत राहणारी व्यक्ती म्हणजे आपला बेस्ट फ्रेंड

आपल्या शब्दाला कधी तोडणार नाही
आपली मैत्री अशी आहे की ती कधीच तुटणार नाही

मैत्रीतला आणि प्रेमातला फरक काय
प्रेम असेपर्यंत व्यक्ती सोबत असते
आणि मैत्रीत व्यक्ती जिवंत असेपर्यंत प्रेम असतं

येणाऱ्या प्रत्येक दिवसात मैत्री आपली घट्ट घट्ट होत राहील
आपलं मैत्रीचं नातं अतूट बंधन म्हणून गणल जाईल

मित्र आणि त्याची मैत्री म्हणजेच जीवन असतं

वयाचं ज्याला बंधन नसतं रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं सर्वश्रेष्ठ असतं

अनेक मैत्रिणी असल्या तरी एक जण खूप खास असते
तीच आपली बेस्ट फ्रेंड असते

जी आपलं नाराज होण समजून घेते तीच खरी आपली मैत्री असते

जीवनात ज्या व्यक्तीच्या असण्यामुळे आपण कधीच एकटे पडत नाही ती व्यक्ती म्हणजे आपली बेस्ट फ्रेंड

मित्र म्हणजे एक विश्वास आयुष्य जगण्याची एक आस जी मला तुझ्या रूपाने भेटली

लाखो नातेवाईकांपेक्षा एक खास असतो
तो म्हणजे आपला बेस्ट फ्रेंड असतो

मैत्री असा प्रकाश आहे ज्याचा कधीही अंत होत नसतो
माझा लख्ख प्रकाश म्हणजे माझा मित्र

हजारो नकारात्मक विचारात एक मैत्रीचा सुगंध नेहमी दरवळत राहतो
जगण्याची उमेद घेऊन तयार असलेला माझा बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत नेहमी राहतो

मैत्रिणीसाठी इंस्टाग्राम कॅप्शन – Best Friend Captions in Marathi For Girl

बेस्ट फ्रेंड च्या रूपाने मला एक अनमोल साथ तुझी मिळाली
जीवनाच्या शेवटपर्यंत ती मी अशीच जपत राहील

पैशापेक्षा मनाने श्रीमंत आहे माझा मित्र
आनंदापेक्षा अडचणीत नेहमीच सोबत असतो माझा मित्र

बेस्ट फ्रेंड एखादाच असतो
आणि तोच आपला जीव असतो

जीवनात खूप फ्रेंड मिळाले परंतु तू सगळ्यात स्पेशल आहे
म्हणून तूच माझा बेस्ट फ्रेंड आहेस

जी निस्वार्थपणे तुमची कायम सोबत करते
ती मैत्री सगळ्यांच्या पलीकडे असते

माझी अखंड सावली बनून माझी मैत्रीण माझ्यासोबत असते
नुसती थंडाव्यात नाही तर उन्हात सुद्धा माझी सावली बनून उभी असते

आपला बेस्ट फ्रेंड आपल्याला कधीच भरकटू देत नाही दिशादर्शक असतो एक चांगला मित्र

खरी मैत्री कधीच आपल्याला जज करत नाही
ती विना तक्रार आपली सोबत करत असते

बेस्ट फ्रेंड म्हणजे आपला आधार असतो
तो माझ्यासोबत प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा असतो.

एक अनमोल व्यक्ती मला बेस्ट फ्रेंड च्या रूपाने मिळाली
ती व्यक्ती म्हणजे तू
तुझी माझी मैत्री अजून घट्ट होत जावो
तुझ्यासारखा बेस्ट फ्रेंड मला जन्मोजन्मी मिळत राहो

जिथे सगळ्यांची साथ सुटते
तेथे भक्कमपणे माझ्यासोबत असतो मित्र

आनंदात नव्हे तर माझ्या संकटात तु सोबत आहे
म्हणून तूच माझा जिवलग आहे

तर मित्रहो या सुंदर लेखात आम्ही आपल्यासोबत मैत्री Instagram कॅप्शन – Best Friend Captions in Marathi शेअर केलेत. हे captions आपण Best Friend Captions in Marathi For Girl & Boys दोघांसाठी वापरु शकतात. आणि मुलगा असो वा मुलगी दोन्ही बेस्ट फ्रेंड्स सोबत शेअर करू शकतात. आम्ही आशा करतो आपणास हे quotes आवडले असतील. याशिवायही आमच्या या वेबसाइट वर विविध प्रकारच्या चारोळ्या आणि शायरी उपलब्ध आहेत. आपण त्यांना देखील वाचू शकतात.

Read More

Shares