आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Birthday Wishes for Mother in Marathi

Happy Birthday Aai in Marathi & Birthday wishes for Mother in marathi: आई ही व्यक्तीचा पहिला गुरु असते. लहान मुलांसाठी ‘आई हीच गुरु आणि आई हीच कल्पतरू’ असते. आईची महती साधू संतापासून तर अनेक महान लोकांपर्यंत प्रत्येकानेच गायली आहे. साक्षात परमेश्वर देखील आईचे प्रेम प्राप्त करण्यासाठी प्रत्येक युगात जन्म घेत असतात. ज्या व्यक्तीला जगात आईचे प्रेम लाभत नाही तो व्यक्ति सर्वात अभागीच म्हणता येईल.

Aai Birthday wishes in Marathi मित्रहो अश्या या आईच्या वाढदिवसाला तिला उत्तम पद्धतीने शुभेच्छा देऊन आनंदित करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या आईला वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा- Birthday wishes for Mother in Marathi घेऊन आलो आहोत. ह्या happy birthday aai in marathi शुभेच्छा व मराठी कविता आपण आपल्या आईसोबत तिच्या वाढदिवशी शेअर करू शकतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई हे संदेश तुमच्या आईला खूप आवडतील अशी आशा आहे.

Birthday wishes for Mother in Marathi

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
Happy Birthday Aai

आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,
पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतो
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!

birthday wishes for mother in marathi

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
तशीच आई घरात असली की
घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

happy birthday aai in marathi
Birthday Wishes for Mother in Marathi

तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! जन्माजन्माची साथी

एकच मागणं आहे देवा
साता जन्मासाठी काही द्यायचं झालं
तर हीच आई लाभू दे मला
जीने आजपर्यंत काहीच
कमी पडू दिले नाही मला!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for Mother in Marathi

मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
Happy Birthday Mom 🎂🎉

आईने दिलाय जीवनाला आकार
आई माझ्या जगण्याचा आधार
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मंदिराचा जसा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
तशी माझी आई !
जन्म दीनी तुला खूप शुभेच्छा !

जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली !
अश्या माऊलीसाठी एक काय तर सात जन्म उदार
आई औक्षवंत हो

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सात जन्मासाठी काही मागणं असेल तर ते एकच असेल हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे
हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे आयुष्यवंत हो आई
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday aai in marathi

परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात
परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही
ती आहे तशीच राहते!
ती आपली आई असते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आज तुझ्या वाढदिवशी प्रार्थना माझी परमेश्वराला
आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि आनंदी लाभो तुला
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी हसत रहा बहरत रहा

तुझ्या असण्याने आयुष्य माझे सुंदर
काय सांगू उपकार तुझे,
तुझ्या मुळेच जीवनाला आनंदाची सर
Happy Birthday Aai

आपल्याकडे बोट करून बोलणार्या दुनियेचं दडपण येतं
परंतु आपला बोट धरून चालणार्या हाताचा मोठा आधार वाटतो.
तो हात आईचा असतो.
त्या हाताला आणि आईला चीर काल आयुष्य लाभो !
आई तुझा जन्म दिवस सुखाचा जावो

birthday wishes for aai in marathi

ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

जन्मोजन्मी हीच कुस मिळू दे
सर्व नाते बदलले तरी चालेल
परंतु पुढील सर्व जन्म मला
हीच आई मिळू दे !
आई तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो..

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

आपल्या जन्मापासून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई! अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण कितीही मोठे झालो तरी आईसाठी नेहमीच लहान असतो.
आई पुढे सगळे खुजे
आईपणा नेहमीच महान असतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

आईपेक्षा श्रेष्ठ कुणीही नसतं
आई पुढे देवपण ही नमन घेत असतं
आशा देवरुप आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for mother in marathi

Happy Birthday wishes for Aai in Marathi

 आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद शतगुनित व्हावा.
आईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
माझ्यासाठी तु आकाशात चांदणी आहेस.
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा मम्मी.

निसर्गासाठी, त्याच्या संरक्षणासाठी जितका ओझोनचा थर महत्त्वाचा असतो
तीतकचं कीबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं आपल्या डोक्यावर आईचं छत्र असतं !
त्या छत्राला त्रीवार वंदन! आयुष्यवंत होवो आई! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

मला वाटते आजचा दिवस
‘मी तुझा आभारी आहे’,
हे बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे.
! हॅपी बर्थडे मम्मी !

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. Happy Birthday Dear Mom…!

Birthday wishes for Mother in Marathi

Birthday wishes for Mother in Marathi

मला एक जवाबदार व्यक्ती बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद 🙏
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की
तुझे येणारे वर्ष व पुढील संपूर्ण आयुष्य
प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.

जगातला सगळ्यात अनमोल हिरा
ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही
ती असते आई!
आईला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

आई माझी गुरु
आई माझी कल्पतरू
आई जगण्याचा आधार
सर्वस्व माझं तू
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू
एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो!
इतकं आयुष्य लाभो तुला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!

Aai Birthday wishes in Marathi

Aai Birthday wishes in Marathi

सुंदरतेची काया,
ममतेची माया
आई सारखे ना या जगी कुणी
तीन्ही लोक आईचे ऋणी
खुप शतायुषी हो आई..

मुंबईत घाई
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
पण जगात भरी
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️

माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
Happy Birthday Aai

तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

happy birthday aai in marathi

आई तू जगातील सर्वात चांगली आई
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
हॅपी बर्थडे आई

नेहमी माझी काळजी घेणारी व
कधीही मला कंटाळा न येऊ देणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कोरोना लॉकडाऊन आणि बरेच काही
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!
Happy Birthday Aai

आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी
आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी
आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.

तुम्ही उंचावर गेल्यावर
तुम्हाला डोक्यावर घ्यायला सर्व जग असते
परंतु तुम्ही खचल्यानंतर सावरणारी ती आईचं असते!
आईच्या स्पेशल दिनाचा आनंद द्विगुणित होवो
आई तुला तुझा वाढदिवस मनाप्रमाणे जावो!

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

birthday wishes for mother in marathi

कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण
घराची काळजी वाहणारी
पावलो पावली लेकरांना समजून घेणारी
माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या

अप्सरेचं सौंदर्य कशाला
कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग
कितीही आणि कसंही फिरलं तरी
आईच्या पायाशीच असतो स्वर्ग
स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई !
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला

खरं तर माझ्या आयुष्याची सुरुवात
तुझ्यापासून अन् तुझ्यापर्यंत…👪 आई

जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली.
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली.
माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई

मोठ्यातला मोठा आनंद सामावुन
घेण्याला आईचं पुरते
सगळं जग तीच्या कुशीत असतं
ती सगळ्या जगाला पुरुन उरते
आई! जन्मदिन तुझा मी बाळं तुझा

birthday wishes for mother in marathi

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.

म्हणतात ना देवापेक्षा देवमाणसाच्या आशिर्वादात बळ असते
त्यात सर्वात श्रेष्ठ आपली आईचं असते.
देवतुल्य आईस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

जगातल्या सर्वच नात्याची आणि प्रेमाची जागा दुसरे नाते घेऊ शकते
परंतु आईची जागा कुणीचं घेऊ शकतं नाही.
अशा या आईला नमन आणि जन्मदिनाच्या शुभेच्छा

प्रत्येक पाखराला एक घरटं असावं
कितीही उंच आकाशी गेलं तरी परतण्यासाठी
तशीच प्रत्येकाला आई असावी
कुठुनही आलं तरी तीच्या कुशीत विसाव्यासाठी
मायेची प्रेमळ कुस असलेल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

birthday wishes for mother in marathi

Birthday wishes for Mother in Marathi

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई हीच याला अपवाद असते
आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले.

सुर्य डोंगराआड जरी असला तरी त्याचा प्रकाश दिसत राहतो.
जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो.
अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Aai in Marathi

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई नावाच्या प्रेमाला मर्यादा नसते.
अमर्याद प्रेमाचं व्यासपीठ आई!
कणा कणाणं तुझं आयुष्य वाढत राहो
हीच जन्म दिनी शुभेच्छा

जिथं प्रत्येक गुन्हाला माफी असते
जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं
आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं.
प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

#मृत्युसाठीखुप पर्यायआहेत परंतुजन्म घेण्यासाठीएकच
पर्याय आहे तो_म्हणजे 😘#आई😘

आईला वाढदिवसाचे भेट/गिफ्ट देण्यासाठी पुढील लिंक पहा:

तर मित्रहो ह्या होत्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश- Happy birthday wishes for Mother (aai) in marathi. आशा करतो की ह्या शुभेच्छा तुम्हाला आवडल्या असतील व छानश्या आपल्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही शोधून काढल्या असतील. या लेखात देण्यात आलेले Aai Birthday wishes in Marathi आणि Birthday wishes for Mother in Marathi आपण कॉपी करून आपल्या आईला व्हाटसप्प व सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. आम्हाला आशा आहे की आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता तुमच्या आईला खूप आवडतील आणि या शुभेच्छा मिळाल्याने तुमच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंदात देखील वाढ होईल.

Birthday wishes for Mother in Marathi व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई शिवाय इतर कोणासाठीही वाढदिवसाच्या शुभेच्छा व मराठी स्टेटस मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट च्या Birthday Wishes Marathi या सेक्शन ला भेट द्या. धन्यवाद.

READ MORE:

Shares