2021 धनत्रयोदशी ची पूजन विधी व माहिती | dhantrayodashi information puja vidhi in marathi

धनत्रयोदशी ची माहिती – dhantrayodashi puja vidhi in marathi : हिंदू धर्मातील प्रमुख उत्सव दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी ने होते. धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. हा दिवस धन संपत्ती चे देवता कुबेर व देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची देखील पूजा केली जाते. आजच्या लेखात आपण धनत्रयोदशी ची मराठी माहिती (dhantrayodashi information in marathi) व पूजा विधी (dhanteras puja vidhi in marathi) जाणून घेणार आहोत.

dhanteras / dhantrayodashi puja vidhi in marathi

धनत्रयोदशी का साजरी केली जाते

या दिवशी भगवान धन्वंतरी यांना पूजापाठ द्वारे प्रसन्न केले जाते. शास्त्रानुसार यादिवशी समुद्रमंथन द्वारे श्री लक्ष्मी आणि धन्वंतरी देवता अमृतकलश हाती घेऊन प्रकट झाले होते. सृष्टीला आरोग्य आणि सुखी जीवन देण्याच्या उद्देशाने धन्वंतरी भगवान अवतरीत झाले. म्हणूनच या दिवसाला धन्वंतरी जयंती अथवा धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. भगवान धन्वंतरी अमृतकलश सोबत प्रकट झाल्याने या दिवशी लोक भांडे खरेदी करणे शुभ मानतात.

धनत्रयोदशी चे मुहूर्त

2021 साली धनत्रयोदशी चा सण 2 नोव्हेंबर ला साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशी च्या पूजेचे शुभ मुहूर्त सायंकाळी 06:18 PM ते 08:10 PM पर्यंतचे आहे.

धनत्रयोदशी पूजन विधि

अनेक लोकांना प्रश्न असतो की धनतेरस ची पूजा कशी करायची – dhanteras puja vidhi in marathi ? म्हणून येथे आम्ही आपल्याकरिता 2021 धनत्रयोदशी ची पूजा विधी देत आहोत ही पूजन विधी dhantrayodashi puja vidhi in marathi पुढीलप्रमाणे आहे.

  • धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान यम यांना समर्पित दिवे लावले जातात. या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य द्वारात व अंगणात दीपदान करावे. जर घराची गृहलक्ष्मी हे करत असेल तर याचे विशेष लाभ होतात.
  • यानंतर शुभमुहूर्तात घराच्या उत्तर दिशेला भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि धन संपत्तीची देवता कुबेर यांची प्रतिमा स्थापित करावी.
  • यानंतर या प्रतिमांसमोर तुपाचा दीपक व धूप बत्ती लावावी.
  • दीपक लावल्यानंतर सर्व देवतांना कुंकू चा टिळा लावावा. व हाच टिळा कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील लावावा.
  • आता भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची दिव्याने आरती करावी.
  • धन्वंतरी यांना पिवळी मिठाई, देवी लक्ष्मीला कमलगट्टा व कुबेर यांना पांढरी मिठाई अर्पण करावी.
  • पूजे दरम्यान ॐ ह्रीं कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा. यानंतर भगवान धन्वंतरी यांचे धन्वंतरी स्तोत्र पठण करावे.
  • सर्वात शेवटी पूजा समाप्त झाल्यावर दोन्ही हात जोडून काही चूक झाली असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी.

धनत्रयोदशी चे महत्व

भारतात दिवाळीदरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते. धनत्रयोदशी ते भाऊबीज दरम्यान संपूर्ण भारतात वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी व भगवान कुबेर यांची पूजा व आराधना केली जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी घरात नवीन वस्तू आणण्याची परंपरा फार आधीपासून चालत आली आहे. जिचे अनुसरण आजही केले जाते. असे मानले जाते की या दिवशी घरात आलेल्या वस्तू आपल्या सोबत धन लाभ देखील घेऊन येतात. धनत्रयोदशी च्या दिवशी महाराष्ट्रासह देशातील इतर काही क्षेत्रांमध्ये साथ धान्याची पूजा केली जाते, ज्यामध्ये गहू, तांदूळ, उडीद, मठ अशा वेगवेगळ्या डाळींचा समावेश असतो. या दिवशी जुन्या वस्तूंची स्वच्छता केली जाते व घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आळस दूर केला जातो. संध्याकाळच्या वेळी घराबाहेर अनेक दिवे लावून दीप दान केले जाते.

तर मित्रहो ही होती 2021 धनत्रयोदशी ची माहिती – dhantrayodashi information in marathi. आशा आहे की हा लेख वाचल्यानंतर धनतेरस ची पूजा कशी करायची या विषयी ची मराठी माहिती आपणास मिळाली असेल. dhantrayodashi puja vidhi in marathi dont forget to share with others also.

Shares