महाराष्ट्र वर्धापन दिन, दरवर्षी 1 मे ला साजरा केला जातो. 1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. हा दिवस अंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आजच्या या लेखात महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश देण्यात आले आहेत. ह्या शुभेच्छा फोटो आणि टेक्स्ट दोघी रूपात उपलब्ध आहेत तर चला सुरू करूया.
Maharashtra Day Wishes in Marathi

महाराष्ट्राची यशोगाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरणी मातेच्या चरणी माथा
जय महाराष्ट्र
1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे आम्हास,
महाराष्ट्रीय असण्याचा
गर्व आहे आम्हास,
मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी.
रुजवू मराठी फुलवू मराठी
चला फक्त बोलू मराठी
अभिमान मराठी असण्याचा
महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा…!

महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
जेथे पंचवटी राम सीतेची,
लक्ष्मणाचे मंदिर आहे तपोवनात.
पाच पाच ज्योतिर्लिंगाची,
सुंदर छठा आहे पर्वतात.
अभिमान आहे की जन्म घेतला,
या पवित्र महाराष्ट्रात.
जय जय महाराष्ट्र माझा
गर्जा महाराष्ट्र माझा
1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे महान
या महान राष्ट्राचे आम्ही गातो गुणगान
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
Maharashtra Day Wishes in Marathi

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
अभिमान आहे मराठी असण्याचा
जय महाराष्ट्र…
अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मान आहे भाषेचा आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास 1 मे महाराष्ट्र दिनी
दगड झालो तर सह्याद्रीचा होईल
माती झालो तर महाराष्ट्राची होईल
तलवार झालो तर भवानी मातेची होईल
आणि पुन्हा मानव झालो तर मराठीच होईल
जय महाराष्ट्र

ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र
ज्ञान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र
जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र
Maharashtra Dinachya Hardik Shubhechha
कपाळी केशरी टिळा लावितो
महाराष्ट्र देशा तुला मी वंदितो
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी बसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जतो गर्जतो महाराष्ट्र देशा
गर्जा महाराष्ट्र माझा.
महान संतांची जन्मभूमी,
विज्ञानाने जेथे केली प्रगती
प्रेम, आदर, स्नेह आणि माणुसकी
हीच आहे आमची संस्कृती.
जय महाराष्ट्र जय भारत
माझ्या सर्व मराठी बंधू आणि
भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

शिक्षणाचे माहेरघर,
उद्योगधंद्यांची जेथे आहे भरभराट
असा हा माझा
महाराष्ट्र आहे महान…🚩
तर मित्रहो ह्या होत्या महाराष्ट्र दिन शुभेच्छा. आम्ही आशा करतो की या लेखातील सर्व शुभेच्छा संदेश आपणास आवडले असतील. ह्या शुभेच्छा कॉपी करून व्हाटसअप्प आणि इतर सोशल मीडिया वर शेअर करा किंवा status म्हणून ठेवा. धन्यवाद … जय महाराष्ट्र
READ MORE :

मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..