भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी | पुण्यस्मरण मराठी संदेश | shok sandesh in marathi

भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी : मित्रांनो जीवन मरण हे परमेश्वराच्या हातात असते. धरतीवर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीचा एक न एक दिवस मृत्यू होणारच असतो. नातेवाईक व जवळील व्यक्तीच्या मृत्यूनंतर शोक तर फार होतो. हा मृत्यू शोक शब्दात वर्णन करणे कठीण आहे. परंतु तरीही आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही shok sandesh in marathi घेऊन आलो आहोत. हे भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी आपण मृतकाच्या फोटो सोबत लिहू शकता तसेच हे भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश आजी, आजोबा, वडील, आई, मामा, भाऊ, इत्यादि तसेच प्रथम पुण्यस्मरण मराठी संदेश म्हणून वापरले जाऊ शकतात. तर चला सुरू करूया.

shok sandesh in marathi भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी

भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी

अजूनही होतो भास
तुम्ही आहात जवळपास
शांती लाभो तुमच्या आत्म्यास
हीच प्रार्थना परमेश्वरास


मुठीत मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती
इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती
जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती
तोल ढळता ढळता सावरून गेल्या स्मृती
समोर सावलीशी दिसली बावरून गेल्या स्मृती
तमाची छाया घनदाट उजळून गेल्या स्मृती
वियोगाचा वणवा उरी पेटवून गेल्या स्मृती
ती शेज शरांची होती जगवून गेल्या स्मृती
कोमजले होते आत काही, उमलून गेल्या स्मृती
साथ कधीही सोडणार नाही सांगून गेल्या स्मृती


एक दिवस असा आला,
अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,
सर्व काही ओळखीच्या वाटेवर
केवळ स्मृती ठेवून गेलात


पुण्यस्मरण मराठी संदेश shok sandesh in marathi

शुन्यामधूनी विश्व निर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवूनी
लोभ माया, प्रीती देवूनी, सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर झाला तुम्ही जीवनी


सुरु आहे वाटचाल तुमच्या आशीर्वादाने
जीवन पथावर चालत राहू तुमच्या आदर्श संयमाने
सदैव जपतो आम्ही तुमच्या आदर्श व स्मृतीला
आपल्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली


आपली शिकवण… हीच आठवण


shok sandesh in marathi

प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी
मनात येतात दाटूनी,
सदैव तुझ्या आठवणी
आत्म्यास शांती लाभो
हीच प्रभू चरणी विनवणी


भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश

तुमच असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते
आज सर्व काही असण्याची जाणीव आहे
पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे


समाजात एक प्रेमाचा, एक्याचा, देशसेवेचा, देश प्रेमाचा, बंधुभावाचा आदर्श प्रस्तापित करण्यासाठी जन्माला आलेले एक विनयशील व्यक्तिमत्त्व, (गावाचे नाव) या गावातील एक अनमोल रत्न म्हणजेच (मृतकाचे नाव) यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन


चंदनापरी देह झिजविला
कष्टातून संसार फुलवला
उरली नाही साथ तुमची आम्हास
आठवण येते क्षणक्षणाला


भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही
माणसे संपली तरी संबंध मिटत नाही
शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही
तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही


पुण्यस्मरण मराठी संदेश

“आपले निघून जाणे म्हणजे आम्ही पोरके होणे”!
आपली शिकवण आणि आपली आठवण आमच्या मनात चिरंतन तेवत राहील.


वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल,
चालता बोलता देव तुम्हास नेईन..
माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल,
त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..!


भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश

काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुमचे अचानक जाणे..
आजही घुमतो स्वर तुमचा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी..


हसतमुख उमदा चेहरा
अकाली काळाने हिरावून नेला
कर्तव्यपूर्तीसाठी चंदना प्रमाणे झिजावे
असा संदेश देऊन गेला
आजच्या या पुण्यस्मरणदिनी साश्रूपूर्ण
नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली


आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली


पवित्र स्मृतींची ज्योत तेवते,
अखंड आमच्या मनी,
सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी
आठवुनी अस्तित्व, दिव्य, तव वृत्ती भारावली
कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र श्रद्धांजली.


तो हसरा चेहरा,
नाही कुणाला दुखावले,
मनाचा तो भोळेपणा
कधी नाही केला मोठेपणा
उडूनी गेला अचानक प्राण,
पुनर्जन्म घ्यावा हीच आमची इच्छा


तर मित्रहो हे होते काही भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी आणि shok sandesh marathi आशा आहे की हे मराठी संदेश तुमच्यासाठी उपयुक्त ठरले असतील. धन्यवाद