गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा – Gudi Padwa Chya Hardik Shubhechha : गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील व महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातील प्रमुख सण आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली जाते. मराठी नववर्ष आणि चैत्र महिन्याची सुरूवात गुढी पाडव्याने होत असते. यालाच हिंदू नवीन वर्ष देखील म्हटले जाते. गुडी पाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारून एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.
आजच्या या लेखात आपण गुढीपाडवा शुभेच्छा संदेश- gudi padwa shubhechha in marathi पाहणार आहोत, या Gudi padwa chya hardik shubhechha तुम्ही कॉपी करून आपले मित्र आणि नातेवाईक मंडळीना पाठवू शकतात. या पोस्ट मध्ये gudi padwa marathi shubhechha, message, quotes, wishes with images इत्यादींचा समावेश आहे. तर चला सुरू करूया..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

उभारून गुढी लावू विजय पताका
संस्कार संस्कृतीच्या विस्तारू शाखा
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांक्षा
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
संस्कृतीचं नववर्ष , परंपरेची कास,
गुढी पाडव्यापासून सुरू होणार्या नववर्षात सगळ्यांचा होवो विकास.
हे नववर्ष सर्वांना सुखा समाधानाचं जावो.
गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा .
प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ यावं गुढीतुन
प्रत्येक सुखाची सुरवात व्हावी गुढीतून
आपल्या यशाची पताका अशीच उडत जावो गुढीतून
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
साखरेच्या गाठीचा गोडवा, लिंबाच्या पानांचं आरोग्य
उलटा असलेल्या तांब्याचा नम्रपणा हे सगळं आपल्या जीवनात येवो
सर्वांना गुढीपाडवा व नववर्षानिमित्त मंगलमय शुभेच्छा .

घरोघरी शोभेल जशी उंच गुढी
तशीच तुमच्या आमच्या आयुष्यात येवो आनंदाची गोडी
नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
नवे संकल्प , नव्या आशा
नवी सुरुवात नव्या दिशा
सर्वांना हे नववर्ष सर्व संकल्पपूर्ती चे जावो हीच सदिच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
गुढी उभारू आपल्या स्नेहाची
गुढी मुळे आपल्या आयुष्यात सुरवात होवो प्रेमाची
गुढीच कारण होईल आपल्या समाधानाची
गुढीपाडवा आणि नववर्ष आपलं आरोग्यदायी जावो .
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
GUDI PADWA CHYA HARDIK SHUBHECHHA

वसंताची पहाट घेऊन आली
नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची
गुढी उभारू आला चैत्र पाडवा..!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
उंच आकाशी भिरभिरत राहो पक्ष्यांचे थवे
गुढीपाडवा ठरेल कारण आपल्या समृद्धीचे
सर्वांना आरोग्यदायी जावो हे वर्ष नवे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
आशा नवी
नको असलेलं विसरून जाऊ
गुढी सारखं उंच होऊन सुख वाहून नेऊ
नववर्ष भरभराटीचं जावो
हा पाडवा जीवनात आनंदाचं लेणं घेऊन येवो
मध पोळीच्या आत असतो जसा गोडवा
तसाच तुमच्या आयुष्यात मधुरता घेऊन येवो हा पाडवा
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबूच्या उंची सारखं यश लाभो आपल्याला
आणि खूप उंचावर राहूनही
पाय जमिनीवर राहण्याचं वरदान मिळो आपल्याला .
गुढीपाडवा आणि नववर्ष सुख समृद्धीचे जावो आपल्याला .
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

विचारांचं तोरण संकल्पाची उभारणी
गुढीपाडवा आणि येणारं वर्ष आनंदाचं जावो हीच ईश्वराकडे मागणी
गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
नवे रस्ते नवे स्वप्न साकार करण्याचा दिवस
नवी नाती नवी पालवी येण्याचा दिवस
सर्वांना हे मराठी नववर्ष इच्छापूर्तीच जावो
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गेल्या वर्षाचा शेवट झाला
आणि नववर्षाची सुरवात
हा गुढीपाडवा तुम्हाला आनंदात जावो
करू या नव्या संकल्पांची सुरवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गतवर्षाच्या सारून गोष्टी
सामोरं जाऊ या नव्या वर्षाला
घेऊन येवो सगळं सुख
मागणं घालूया गुढीला
गुढीपाडवा आणि नववर्ष अभिनंदन

सण नववर्षाचा जल्लोष आपल्या अस्मितेचा
यशाची तोरण लावू आणि गुढी उभारू
हाच गौरव मराठी मनाचा
गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .
गुढी असू द्या एकतेची
गुढी असावी सुखसमृद्धीची
गुढी असावी आनंदाची
गुढी आपली सुरूवात नववर्षाची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
Gudi Padwa Marathi Shubhechha
मराठी नवीन वर्ष, म्हणजेच गुढीपाडव्याच्या
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा
GUDI PADWA CHYA HARDIK SHUBHECHHA
गुढी आणेल आपल्या घरात आरोग्य
गुढीच आणेल सुखसमृद्धी
गुढी पासून सुरु होईल आपल्या यशाची कीर्ती
नववर्षानिमित्त आणि गुढी पाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आशेची पालवी, सुखाचा मोहर
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी
मराठी नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
तुमचे सर्व संकल्प तडीस जावो
नववर्षाचं काय मागणं अजून
सर्वांचं आयुष्य आरोग्यात जावो
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी नववर्ष सर्वांना आनंदात सुखसमाधानाचं जावो
मराठी सणामध्ये आहे विशेष स्थान
गुढीला सर्वात पुढचा मान
हिंदूच्या सणात गुढीपाडव्याला आहे गौरवाचे स्थान
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
आशा नववर्ष येण्याची
नवे नवे आव्हान घेण्याची
संकल्प आपले शेवटाकडे नेण्याची
ही गुढी ठरो सगळ्यांच्या विजयाची
गुढीपाडवा आणि नववर्ष आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .
घरासमोर असेल नक्षीदार रांगोळी
सुख भरून येवो आपल्या ओंजळी
गुढी मुळे सगळ्या दु खाची जावो काजळी
सुरूवात नव्या यशाची
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सोबत सर्वांना घेऊन चालत राहू
नव्या यशाची गाणी आनंदानं गाऊ
शंका साऱ्या ईश्वराच्या चरणी वाहू
नव्या वर्षाची वाट नव्या आशेने पाहू
नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .
चैत्राची सुरुवात झाली
साखरेच्या गाठीला आला गोडवा
यशाची गुढी उभारून
सर्वांना आनंदात जावो हा गुढीपाडवा
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा > गुढीपाडवा मराठी माहिती
गुडी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची
मराठी नववर्षाच्या शुभेच्छा शुभ गुढीपाडवा.
चैत्राची नवी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आनंद नवा विश्वास नव्या वर्षाची
हीच तर खरी सुरवात
गुढी पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा
स्वागत करूया नववर्षाचे उभारून उंच गुढी
भरुनी वाहो सूखांनी प्रथम मुहूर्ताची आनंदवडी.

निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी…
नवे वर्ष आले
घेऊन गुळ साखरेची गोडी
नववर्ष नवं चैतन्याचं
आशेचं आणि आरोग्याचं
सुख आणि समृद्धीचं
ऐक्याचे आणि एकात्मतेचं
गुढीपाडवा आणि नववर्ष सर्वांना आनंदाचं जावो हीच शुभेच्छा
बांबूच्या काठीवर कडुलिंबाचा मान
गुढी उभारून सिद्ध करतो
आहे आम्हाला संस्कृतींची जाण
मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळी रेखुया आपल्या दारी
गुढी मुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी येवो न्यारी
नववर्षांत पूर्ण होवो आपली मनोकामना सारी गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
समृद्धीच्या गुढी सोबत उभरुया, विश्वास आणि प्रेमाची गुढी,
मनातली काढुया अढी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi padwa hardik shubhechha in marathi

आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचे असो आगामी वर्ष ही सदिच्छा..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पुन्हा एक वर्ष नवं
सुख संपन्नतेच हवं
गुढी तून जगण्याला बळ यावं
संकट आपसूकच जीवनातून निघून जावं
गुढीपाडवा आणि नववर्ष आरोग्यपूर्ण जावो . गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाची नवी आशा
जगण्याला योग्यतेची मिळो दिशा
गुढीपाडवा म्हणजे मराठी अस्मितेची भाषा
नववर्ष अभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
हे नववर्ष आपल्याला आनंदच
सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि आरोग्यदायी होवो ही देवाकडे मागतो इच्छा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पाठी गेलं ते मागचं वर्ष
लोटला तो आज बनून काल
घेऊन येवो गुढी आपल्या आयुष्यात सुखाचं येणारं साल
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी नववर्ष सूर्योदय यासारखं आपलं आयुष्य प्रकाशमान होवो
या गुढी पाडव्यापासून आपला आनंद असाच कणाकणाने वाढत राहो
गुढीपाडवा व नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा
येवो आरोग्य तुमच्या अंगणी
वाढो सुखसमृद्धी तुमच्या जीवनी
आपल्याला आणि आपल्या संपूर्ण परिवाराला नववर्षाच्या आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी नववर्षाचे आनंदाने स्वागत करूया
आणि जुन्या स्वप्नांची आस नव्याने लावूया
नववर्षाभिनंदन व पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
उभारून आनंदाची गुढी दारी
जीवनात येवो रंगत न्यारी
पुर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा आकांशा
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा
नवी नवी माणसं नव्या उमेदीनं जोडू
संकल्प घेऊन त्या संकल्पनेप्रमाणे घडू
अनारोग्याची आणि संकटाची देणी सगळी गाडू
पुन्हा नव्या जोमानं नव्या आकाशाला भिडू
हे मराठी नववर्ष आनंदात जावो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडवा म्हणजे मराठी सणांचा स्पर्श
गुढीपाडवा म्हणजे चैतन्याचा हर्ष
गुढीपाडवा म्हणजे मराठी मनाचं सुरू होणारं नववर्ष
गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा
नववर्षाचं स्वागत करू
नव्या संकल्पाचं तोरण धरू
संस्कृतीची कास धरून प्रत्येक संकटातून तरु
नेहमी आनंदाच्या गुढीला स्मरू
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
अपयशातून यशाकडे जाण्याची सुरवात
नववर्ष म्हणजे आपल्या मराठी सणाची सुरूवात
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
रांगोळीची आखणी
गुढी दिसू दे देखणी
वरती साडी चोळी रेखणी
गुढीपाडवा आरोग्यपूर्ण जावो आणि हे वर्ष भरभराटीचं जावो गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
तोरणांनी दार सजले
गुढी पुढे लावून दिवे
आनंदाची करून वाटणी
सुख घेऊन आले साल नवे
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुढीपाडव्याचा सण
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

उभारू गुढी सुख-समृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची..
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नव आशेची
गेल्या वर्षातल्या चुकांना विसरून जावु
गुढीपाडवा आणि नववर्षांत आपण
सर्वांनी एकत्र आनंदात राहू
नव्या उमेदीनं प्रत्येक संकटावर मात करून
आनंदाची विजयी गाणी गाऊ
मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
गुलाबाची पाकळी ओली होते दवाने
गुढीपाडवा सगळे मिळून साजरा करूया आनंदाने
सुख ओसंडून वाहिलं भरभराटीने
मराठी नववर्ष सुरू करू नव्या उमेदीने
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
झाल्या गोष्टीला दाखवून पाठ
गुढीला नववर्षाचा देऊ पाट
नव्या नव्या गोष्टी घेऊन येवो ही नववर्षाची पहाट
गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
करू मराठी सण साजरा चंद्रकोर लावून भाळी
लावुन तोरणं दारी गुढी उभारु
तुमची कीर्ती जावो उंच आभाळी
गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
समृद्धी होऊ दे नवलाईची
पहाट फुलू दे आनंदाची
सुख पायाशी लोळण घेऊ दे
ही गुढी होईल भरभराटीची
गुढी पाडवा आणि नववर्ष अभिनंदन

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
उंच काठीवर जरीचे वस्त्र
त्यावर तांब्याचा लोटा
उभी करून गुढी
आनंदाने साजरा करुया गुढी पाडवा
नवं वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
फुलांची तोरणं लिंबाचा पानाचा मान
गुढीपाडवा म्हणजे मराठी संस्कृतीचा स्वाभिमान
हे नवं वर्ष आपल्याला सुख समाधानाचं आणि आरोग्याचं जाईल ही ईश्वरचरणी मनोकामना…
नुतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
भरभराटीची घेऊन मनी आस
सर्व सणातुन सण हा खास
स्वप्न सगळे पूर्ण होवो नको नुसता भास
गुढीपाडवा साजरा करु धरुन संस्कृतीची कास
गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
तर मित्रांनो हे होते गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी शुभेच्छा संदेश. आपण सर्वाना wishmarathi टीम कडून गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही आशा करतो की तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्राना पाठवण्यासाठी या लेखातून Best marathi Gudi Padwa wishes शोधून काढल्या असतील. जर तुम्हाला हे Gudi Padwa Chya Hardik Shubhechha मेसेज कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद..
हे पण वाचा :