50+ बहीण स्टेटस व शायरी मराठी फोटो | Sister Quotes in Marathi

बहीण स्टेटस व Sister Quotes in Marathi : मित्रांनो बहीण भावाचे किंवा बहीण बहिणीचे नाते हे जरी वरून पाहिल्यास भांडण आणि एकमेकांना त्रास देणारे दिसले तरी या नात्यात प्रेम खूप असते. एक मोठी बहीण ही आई प्रमाणे तर लहान बहीण प्रिय मैत्रिणी प्रमाणे मानली जाते. अनेकदा मानलेली बहीण देखील सख्खी बहीण प्रमाणेच किंवा त्या पेक्षाही अधिक प्रेम लावते.

अशा या बहिणी विषयी शायरी मराठीबहीण स्टेटस मराठी जर आपण शोधत असाल तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही खास Sister Quotes in Marathi घेऊन आलेलो आहोत. यात तुम्हाला भाऊ बहीण स्टेटस मराठी व बहीण बहीण स्टेटस मराठी दोघी देण्यात आलेले असल्याने आपण आपल्या आवडीचे शायरी संदेश काढू शकतात आणि शेअर करू शकतात.

Sister Quotes in Marathi

Sister Quotes in Marathi

सोबतीने बालपण जगलो
जगायचे आहे आता आयुष्यही
सोबतीने इतके घडलो
जपायचे आहे आता सारे काही…

सुखात हसायला
ती असते सोबत
दुःखात सावरायला
ती असते जवळ
बहीण असून
मैत्रीणीसारखी
ती असते कायम….

भाऊ बहीण स्टेटस मराठी
Sister Quotes in Marathi

लहान असो वा मोठी
बहीण हवी एक तरी पाठिशी
प्रेमळ असो वा थोडी चिडकी
बहिण असतेच नेहमी हवीशी

रंग नसलेल्या आयुष्यात
कधी रंग बनून येते ती
भाऊ नसलेल्या राखीत
हक्काचं मनगट बनते ती

तीच्या प्रेमळ मायेला
तोड नाही कशाची
तीच्या काळजीरूपी जिवाला
सर नाही कशाची

Sister Quotes in Marathi

आवडीच्या मिठाईचा
एक भाग ठेवते ती मजसाठी
आयुष्यातले काही स्वप्न
सहज त्यागते ती मजसाठी

बहिण मिळणे
किती सुखद असते
हे बहिण मिळाल्या शिवाय
कळत नाही…

काही किस्से
फक्त दोघींचे होते
आणि काही स्वप्ने दोघींनी
पाहिले होते… आता
सासरी निघाली ती ओलांडून उंबरा
थांबवावं वाटतंय या वेळेला जरा

तुझा जन्म जणू
उन्हात गारवा घेऊन आला
तुझे येणे जसे
जिवना सुखद बनवून गेला

बहिण नसली कि
आयुष्याचे काही भाग
जगायचा राहते
सारं आयुष्य जगूनही
मग रिते रिते वाटते….

आम्हाला बोलायला
शब्दांचा खेळ नसतो
हसणं रडणं झाले तरी
सोबतीने दोघी उभे असतो

राग तिच्या नाकावर आहे
तरी त्रास द्यायला मी असते पुढे
जगू कि थोडं हसत हसत
आयुष्याचे गिरवित कठीण धडे…

बहिणीचं प्रेम
हृदयात जपायचे असते
तीने केलेले त्याग
स्मरणात ठेवायचे असते

बहिणीचे प्रेम भाग्यानेच मिळते
आणि ज्याला बहीण नसते
त्यालाच त्याची खरी किंमत कळते..

बहिणी विषयी शायरी मराठी

तीला नदिसारखं
जगायचं असते
संथ आणि हळूहळू…
मला मात्र समुद्र
व्हायचं असतं
अथांग आणि खळखळाट
पण किनारा
असतो साक्ष द्यायला
दोघींच्या अतुट बंधनाची ….
आमच्या ऋणानुबंधाची

लहानपणी भांडलो इतके
तरी हात सुटला नाही आजवर
वाटेवर धडपडलो किती आपण
तरी पोहचलो सोबतीने इथवर

दुःखाचे काटे येऊ देत कितीही
तुझं सोबत असणं हवे मला फक्त
संकटे घेरेल जेव्हा आयुष्याला
तुझे आशावादी शब्द हवे मला फक्त

समुद्रात हरवलेल्या नावेला
किनारा हवा असतो…
हळव्या जिवाला
बहिणीचा हात हवा असतो

आई नसली तरी
काळजी असते तिच्यात…
जखमेवर फुंकर
घालायची ताकद असते तिच्यात…
हक्काचं स्थान द्यावं तिला
बहिण वसली असते तिच्यात…

जिच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवायला
अहंकार मध्ये येत नसतो
ती बहिणच असते
जीला जिवापाड जपत असतो

आपुले नाते युगानुयुगे बहरत जावे
जसे फुलांनी आयुष्य सजवत जावे
थोडे तु चालावे थोडे मी चालावे
चालता चालता क्षणही सुखाचे वेचत जावे

भाऊ बहीण स्टेटस मराठी

दोघातले वाद
मोठे होऊ द्यायचे नसते
बहिण भावाचे नाते
प्रेमाने जपायचे असते

लग्न होऊन सासरी
जाणारी ताई बघून
डोळे भरून येतात…
आजवर जगलेले क्षण
नजरेसमोरून अलगद
निघून जातात

गोडवा आपल्या
नात्यातला टिकावा
आयुष्यभर…
दोघी जपू
रोपटे प्रेमळ बंधाचे
जन्मभर..

तू साद घालशील जेव्हा
या जिवाला…
ठाम उभे राहण्याचे
कर्तव्य आठवेल या बहिणीला

बोबड्या बोलात ‘ताई’ अशी
दिलेली पहिली हाक आठवते मला
अलगद येऊन मजपाशी
आठवणींचा पाऊस भिजवते मला…

आई उगाच नाही म्हणत
“मी नसली कि काळजी घेईल ताई”
तिलाही माहित असते
कधी कधी बहिण सुद्धा बनते आई….

बहिणींचे किस्से
भन्नाट असतात…
सूर्यास्ताला बघत
ते आठवायचे असतात

जवळ असल्यावर
भांडणे आपली कमी
होतं नाही….
दुर गेल्यावर मात्र
आसवांची रेलचेल
थांबत नाही

तिने बनवलेल्या पदार्थाला उगाच
नाव ठेवायचं…
ती चिडल्यावर आपणचं
तिला हाताने भरवायचं…

Sister Quotes in Marathi

दोघींच्या भरभरून हसण्याला
निमित्त कधीच लागलं नाही
तु जवळ असल्यावर
कुणाचं रितेपण वाटलं नाही

आपल्याला हौस होती
मनसोक्त जगण्याची
दोघीच नडलो
पण
वाट धरली स्वप्नांची….

बहिणीच्या प्रेमाला नाकारायचे नसते
लाभली असेल एक तर
तिला दूर करायचे नसते

मला शब्दांशी खेळायला आवडते
तिला अबोला राहायला आवडते
ऋणानुबंधच आहे तो
जो या दोन किनाऱ्याला जोडते….

बहिणी बहिणीचे प्रेम स्टेटस मराठी – Sister – Sister Quotes in Marathi

बहिणप्रेम भाग्याने मिळत असते
ज्याला नसते त्यालाच
जास्त किंमत असते….

बहीण स्टेटस मराठी

खंत वाटत नाही
भाऊ नसल्याची
जेव्हा साथ लाभते
राखण करणाऱ्या बहिणीची

बहिणींचे नाते
जगावे तितके कमी असते
बालपणापासून मोठ्या
आनंदाने दोघीने जपले असते

बहीण स्टेटस मराठी

तुझ्यासारखी बहिण
मिळायला भाग्य लागते
उगाच नाही मी तुझी
प्रत्येक वेळी नजर काढते

बहिणीच्या सुखात
सुख शोधता यावे
तिच्या दुःखातून
अश्रू वजा करता यावे
तिने केलेल्या
कर्तव्याची जाण
ध्यानी ठेवावे

लाभली नसती तर का बहिण
मुकले असते सुंदर नात्याला
संगतीने जगलो आजवरी जसे
फुलवूया असेच आपल्या नात्याला

माझ्या सामानाला हात
लावायची नाही…असं
ठणकावून सांगणारी
बहीण असते
आणि काही लागलं तर
हातात तीच गोष्ट ठेवणारी
सुद्धा बहिण असते

ओढ लावते
नाते बहिण भावाचे
गोडव्याने भरून आहे
बंध हे रेशमाचे

Sister Quotes in Marathi

तर मंडळी या लेखात आपण काही सुंदर बहीण स्टेटस मराठी पाहिलेत. आशा आहे आपणास हे Sister Quotes in Marathi आवडले असतील. व आपल्या बहिणीला देखील ही संदेश नक्की आवडतील. बहिणी विषयी शायरी मराठी मध्ये भाऊ बहीण स्टेटस मराठी व बहीण बहीण स्टेटस मराठी दोन्ही देण्यात आलेले आहेत. आमच्या पोस्ट ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद..

हे पण वाचा

Shares