आई वडील शायरी स्टेटस मराठी | Aai Baba Quotes in Marathi

आई वडील शायरी मराठी : मित्रहो व्यक्तीच्या आयुष्यात दोनच लोक असे असतात ज्यांच्यावर, ज्यांच्या निर्णयावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो आणि ते म्हणजे आपले आई वडील. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आशा या आई वडिलांचा आदर करून त्यांच्या प्रत्येक आज्ञाचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.

wishmarathi.com च्या सदर लेखात आम्ही आपल्यासाठी आई वडील शायरी व मराठी स्टेटस घेऊन आलेलो आहोत. हे Aai Baba Quotes in Marathi आपणास फोटो आणि टेक्स्ट दोन्ही रूपात देण्यात आलेले आहेत. म्हणून आपण आपणास आवडणाऱ्या aai vadil status ला डाउनलोड करू शकतात आणि आपल्या सोशल मीडिया वर इतरांसोबत शेअर करू शकतात.

आई वडील शायरी मराठी

aai vadil status in marathi

नको धडे विश्वासाचे
आपलं आपलं म्हणता
आपलंच सुत्रं फसतं..
माय-बाप सोडून या जगात
कुणीचं कुणाचं नसतं..!!

होऊ द्या वाटोळं तुमचं कितीही
कोण कुणाची कदर करतो का?
सांगा गड्यांहो आई गेल्यावरती
आईचा पदर मिळतो का…??

घराचं घरपण जाव अन् बागेच ओसाड रान व्हाव
मनाच्या ठाई दुष्काळाचं काहूर उठावं
आणि या सगळ्याची भरपाई म्हणून एका मुलीचा बाप व्हाव..!

आई वडील शायरी मराठी

आई वडील शायरी मराठी

बेभान होऊन जगल्यावरती
सत्य आपल्याला दिसत नाही.
सगळं मिळतं जगात ह्या…
आई-बाप पुन्हा मिळत नाही.

तुम्ही हजार तत्व सांगा
त्याला ममत्व भारी पडेल.

वाचली असतील पुस्तकं
म्हणून ज्ञानी झालास काय
ना वाचले कधी गणिताचे पाढे
ना म्हटली कधी अ, आ, ई
तरी आयुष्याच्या प्रवासात
आणि संसाराच्या गणिता
कधीच चुकली नाही…
माझी माय..!!

बिघडली थोडी तब्बेत तुझी
थोडा आला जरी ताप…
रात्रभर झोपत नाही
त्याला म्हणतात बाप.!!

aai baba quotes in marathi

आई वडील शायरी मराठी

तळपत्या उन्हात अनवाणी चालतांना
माय तुझा हुंदका कधी च दाटला नाही.
फाटक्या संसाराची धुरा सांभाळतांना
तुला कधी च त्रागा वाटला नाही…
पोट भरलं म्हणून उपाशी झोपतांना
तुझा संघर्ष कळला नाही..
तुझ्या सारखा योद्धा माय मी
आजवर कुठं पहिला नाही..!!

आपले सर्वस्व लेकरांच्या सुखासाठी अर्पण करून जगणारे
थोर व्यक्ति म्हणजेच आई वडील..!

Aai Baba Quotes in Marathi

aai baba shayari in marathi

बाप म्हणजे कोण असतं?
हरवलेल्या पाखराचं छत्र
अन् बिथरलेल्या आवाजाचं
पत्रं असतं..!!

लिहावे गीत माय तुझ्यावर
गुणगुणावे सदा ओठी…
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा
माय तुझ्या पोटी..!!

हुंदका दाटून आल्यावर
माय-बाप आठवतात आधी.
थोडा जरी साधला संवाद
दूर होतात व्याधी…!!

आयुष्यभर…
लढतो, झिजतो बाप माझा.
त्याची कुणास कदर आहे.
ढाळत नाही अश्रू कधी
त्याला कुठं पदर आहे..!!

कैसे झाले वैरी सत्याचे
झाकल्या मुठीची नीती वाटते.
खरं सांगतो आई आता
मला जगाची भीती वाटते..!!

पाहिली चाखून चव जगाची.
नेहमी नेहमी सारखं सारखं
बाबा तुमचं मला टोकत राहणं
अजिबात चुकीचं नव्हतं..!!

आई वडील मराठी स्टेटस – aai vadil status in marathi

आई वडील शायरी मराठी

दिसतो स्वर्ग आपणाला
स्वतः मेल्यावरती…
कळतो संघर्ष बापाचा
बाप झाल्यावरती..!!

असते काळजी म्हणून
नेहमी टोकत असते.
माय म्हणजे गुरु आपली
आयुष्यभर शिकवत असते.

ज्याला…
आई-बापाच्या कष्टाची
जाणीव असते. ती व्यक्ती
आयुष्यात कधीही…
अपयशी ठरत नाही.!!

आई वडील स्टेटस – aai vadil status in marathi

‘आई ‘
म्हणून…
‘बाई ‘ चा
पुनर्जन्म होत असतो.

aai baba quotes in marathi

जगातली…
सगळ्यात मोठी प्रेरणा
‘आई-बापाचं’ कष्ट असतं.

ज्याला ‘आई’ कळली
त्याला ‘बाई’ सुद्धा
कळली पाहिजे..!!

किती आखली गणितं
तरी सुद्धा चुकता माप.
चुकला नाही संघर्ष त्याला
म्हणून पुन्हा पुन्हा…
लढतो बाप..!!

लेकराच्या भाकरीसाठी
तो अहोरात्र झटतो…
आपल्यासाठी आपला बाप
आयुष्यभर खपतो..!!

aai vadil status in marathi

aai vadil status in marathi

माय म्हणजे…
नारळाचं पाणी..!!
आणि बाप म्हणजे नारळ.
ते असल्यावर आयुष्याला
नाही पडत कोरड…!!

पाठीवर
बापाचा हात आणि आईची
प्रेमळ ममता असतांना
जगण्याला आपोआप…
बळ येतं..!!

उपाशी असून सुद्धा ज्यांचं
नेहमी पोट भरलेलं असतं.
त्यांना माय-बाप म्हणतात.

जशी कळते किंमत घराची
घर सोडल्यावर…
तशी कळते किंमत आईची
आई नसल्यावर…

नाही येत…
सर अनुभवाची चुकल्याशिवाय
कोण म्हणतं चुकत नाही.
पण बाप नावाचं वादळ हे
संकटांपुढे झुकत नाही..!!

लाख शोधला अर्थ तयाचा
मर्म तयाचे दिसणार नाहीत.
आई तुझे उपकार गं…
ह्या जन्मी फिटणार नाहीत.

लेखक : अविनाश पाटील

आई वडील शायरी मराठी

तर मित्रहो हे होते काही उत्तम आई वडील शायरी मराठी संदेश. हे आई वडील मराठी स्टेटस आपण डाउनलोड करावेत आणि आपल्या सोशल मीडिया द्वारे इतरांसोबतही शेअर करावेत. आपणास या लेखातील Aai Vadil Status in Marathi कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा. Aai Baba Quotes in marathi आपल्या आई वडिलांना पाठवा आणि या quotes द्वारे आपणास इतके सुंदर आयुष्य दिल्याबद्दल त्यांचे आभार माना. धन्यवाद

READ MORE :

Shares
Scroll to Top
Scroll to Top