50+ साई बाबा स्टेटस व शायरी मराठी | Sai Baba Quotes in Marathi

गुरु, संत आणि एक फकीर असलेले शिर्डीचे साई बाबा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे समर्थक आणि पूजक होते. “सबका मालिक एक” हे त्यांचे प्रमुख वाक्य. साईबाबांनी हिंदू आणि मुस्लिम एकतेवर अधिक भर दिला. आज भारतासह जगभरात साईबाबांचे लाखो करोडो भक्त आहेत. व दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिर्डीमध्ये साईभक्तांची गर्दी देखील पहावयास मिळते. साई भक्तांनुसार सांगितले जाते की साईबाबांची पूजा करणाऱ्यांना साई योग्य फळ देतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

आजच्या या Sai Baba Quotes in Marathi लेखात आम्ही आपल्यासाठी साईबाबा स्टेटस मराठी (Sai Baba Status Marathi)साईबाबा शायरी मराठी संदेश घेऊन आलेलो आहोत. हे शायरी संदेश तुम्ही सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया..

Sai Baba Quotes in Marathi

संपूर्ण जगाचे सूख एकीकडे आणि बाबा तुमच्या चरणांवरील समाधान एकीकडे
तुमच्याकडं येणं संतुष्ट करते मला

Sai Baba Quotes in Marathi

साई माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दे
आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे
💐💐ॐ साई राम !!💐💐

Sai Baba Quotes in Marathi

माझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा
तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे साईबाबा
ओम साईराम

बाबा तुमच्या प्रार्थनेने बळ येतं
जगणं कितीही अवघड झालं तरी तुमच्याकडे पाहून चेहऱ्यावर स्मित येतं

जगण्याच्या व्यापात रडणाऱ्यालाही हसवतात तुम्ही बाबा
रडण्यातुनही कसं हसू फुलवावं हे मला तुम्हीच शिकवता बाबा

Sai Baba Quotes in Marathi

sai baba quotes marathi

रागाला संयमानं घेण्याची शिकवण म्हणजे साई
दुःखात ही हसता येतं हे दाखवतात माझे साई
जय साईराम

कधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक
साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”

Read>> महादेव मराठी शायरी संदेश

स्वतःला कधीही एकटे समजू नका साई नेहमी असतात सोबत
एका हाकेवर धावणारे असतात बाबा मग हवी कशाला कुणाची सोबत

तुझ्या शिर्डीत येण्यासाठी अडवत नाहीत
माझ्या आयुष्यातील कूरबूरी…
खरंच बाबा शिर्डीत येऊन तुझ्या मुर्ती कडे बघितलं
तर कळतं कशाला म्हणता श्रद्धा आणि सबुरी

वेळोवेळी तुझेच नाव यावे बाबा माझ्या मुखात
साई विना कसं जाईल माझं जगणं सुखात
साईबाबा

साई बाबा स्टेटस मराठी – sai baba status marathi

sai baba status marathi

सगळं ऐश्वर्य झुकतं कसं बघावं माणसानं,
अखंड ब्रह्मांडाचा बाबा फकीर होऊन फिरतो गावागावांनं
मनाचा गाभा म्हणजेच माझे साईबाबा

जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर शिर्डी हे स्थळ येतं,
तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं
उर्जा आणि शक्ती फक्त साईबाबा आणि माझी भक्ती

मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल
साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल

मनात साईनाथ तुमचाच वास
माझ्या प्रत्येक प्रवासात तुमचा सहवास
अनाथांचे नाथ साईनाथ

हा क्षण असाच थांबून रहावा
साई तुझा सहवास मला असाच लाभावा

Read>> आई स्टेटस व शायरी

Sai Baba Quotes in Marathi

बाबांच्या सोबतीने माझ्या जगण्यात नवा रंग यावा
साई माझं जगणं तुमच्या चरणाशी येऊन जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा

जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं
तेव्हा मन साई तुमच्या चरणांकडं धावायला लागतं
ओम साई राम

या मनाचा एकचं आसरा
जेव्हा खचल्यासारखं वाटेल तेव्हा आठवा साईचा चेहरा
माझं ऊर्जा स्थान साईबाबा

बाबांना तुम्ही स्वतः आपले समजा
साईबाबा तुम्हाला सर्वस्व समजेल
तुमच्यासारखा मार्गदर्शक लाभला तर बाबा अंधारातही नवा सूर्य निघेल

माझ्या जीवनात मला स्वप्नांचा आधार हवा
आणि त्या स्वप्नांना साई तुमचा आशीर्वाद हवा

बाबा तुम्ही सोबत असल्यानंतर जगाच्या नाराज होण्याची भीती वाटत नाही
सगळे सोबत असो अगर नसो तुमची सोबत माझं मन सोडत नाही

नुसतं ऐकून घेणारे सगळेच असतील
समजून घेणारे फक्त साईबाबाच मिळतील
जगण्याचे प्रेरणा स्थान साईबाबा

माझा प्रत्येक रस्ता आता शिर्डी कडे जायला लागला
तिथे मला हरण्याची धास्ती लागते तिथे मनाला साईचा धावा लागलाय

काही गोष्टी शब्दानेही व्यक्त होता येत नाहीत
जशी माझी बाबा तुमच्या वर श्रद्धा आहे

आणि तुम्हाला माझी काळजी
साईनाथ सदा दे माझी साथ

साई बाबा शायरी मराठी – sai baba shayari, caption marathi

sai baba caption marathi

जेव्हा जेव्हा एकटं वाटायला लागतं
सगळं धुसर दिसायला लागतं
तेव्हा तेव्हा साई तुमचाच आधार वाटायला लागतो
तुमच्याशिवाय असाह्य होयला लागतो

मनाला नेहमी उभारी देते साई बाबा तुमची भक्ती
तुमच्या नुसत्या प्रार्थनेने आम्हाला शक्ती
शक्ती दाता भाग्यविधाता साईनाथ

Sai Baba Quotes in Marathi

जिथं जिथं माझं मस्तक झुकतं
तिथं तिथं बाबा तुमचे पाया असावेत
या जगण्यात अजून काही नको माझ्या प्रत्येक क्षणात साई तुम्हीच माझ्यासोबत असावेत

साई बाबा तुमच्या विना आयुष्य अधुरच आहे माझं
या स्वार्थी लोकात तुमच्या शिवाय कोणी नाही माझं

साईबाबा तुमच्यावरच माझी आस आहे
सगळ्यापेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास आहे

साई प्रयत्नांना माझ्या साथ दे
अजून काय मागु सगळ्या क्षणात तू मला साथ दे

साईबाबा तुमच्या विना माझी कहाणी अधुरी आहे
माझ्या जगण्यात मला फक्त तुमची जरुरी आहे

सुख आणि आनंद सोबत मिळवणं आहे
शिर्डीला साईबाबा सोबत जाणं आहे

अंधार झाला तर उजेड तुम्ही करणार
मला साईबाबा तुम्हीच प्रत्येक वेळी तारणार

प्रत्येक माणसात साईबाबा तुम्हीच दिसावं
जिथे जिथे मी जावं ते धाम शिर्डी असावं

लिहिण्यात ही साईबाबा माझ्या तुम्हीच, वाचण्यात ही बाबा तुम्ही
विचार तुमचा साई,
माझ्या प्रत्येक प्रार्थनेत बाबा फक्त तुम्हीच

माझा प्रत्येक रस्ता साई तुमच्या कडे जावा
मी न मागताही तुम्ही आशीर्वाद द्यावा

माझ्या अंतर्मनाचा प्रकाश तू बाबा
माझी सगळी आशा आणि अपेक्षा तूच साई बाबा

माझ्या भक्तीचे गीत साई मी तुझ्यावरच गाईल
माझा विश्वास तुझ्या चरणाशी राहीलं

एका सर्वे नुसार सांगितले जाते की शिर्डी मध्ये दरवर्षी 75 लाख च्या जवळपास भाविक येतात व यामध्ये 2 लाख च्या आसपास भक्त हे विदेशी असतात. वरील Sai Baba Quotes in Marathi लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम साईबाबा शायरी आणि स्टेटस हेर केलेले आहेत. आम्ही आशा करतो की आपणास हे संदेश आवडले असतील. आपण यांना साई बाबा स्टेटस मराठी म्हणूनही वापरू शकतात आणि आपल्या सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. याशिवाय वरील लेखात लहान 2 ओळी मध्ये sai baba caption marathi देखील देण्यात आलेले आहेत, त्यांचा देखील उपयोग आपण करू शकतात. आमच्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद…

इतर पोस्ट वाचा :

Shares