वि. स. खांडेकर यांचे विचार मराठी | v s khandekar quotes in marathi

वि स खांडेकर विचारv s khandekar quotes in marathi : विष्णु सखाराम खांडेकर अर्थात वि. स. खांडेकर म्हणून प्रसिद्ध असलेले हे साहित्याकर मराठी भाषेतील प्रसिद्ध लेखाक व विचारवंत आहेत. विष्णु सखाराम खांडेकर यांना त्यांच्या अजरामर लेखनासाठी 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना भारत शासनाद्वारे पद्मभूषण सन्मान देखील देण्यात आलेला आहे.

वि. स. खांडेकर यांनी आपल्या लेखनातून अतिशय मार्मिकपणे जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. म्हणूनच आजच्या या लेखात आपण वि. स खांडेकर यांचे विचार पाहणार आहोत. या मध्ये विष्णु सखाराम खांडेकर यांच्या पुस्तकांमधील प्रसिद्ध ओळयांचा सामावेश करण्यात आलेला आहे. तर चला आजच्या लेखाला सुरू करूया..

V S KHANDEKAR QUOTES IN MARATHI

माणसाच्या शक्तीला आवाहन देणारं,
त्याच्या साऱ्या शक्तींना पुरून उरणार भव्य,
उदात्त असं एखाद काम जर त्याच्यापुढे उभे राहिले
तर त्याला शरीरसुखाचा देखील विसर पडतो.
– जळलेला मोहर

“माणसाचं मन हे विमानासारखं आहे!
त्याला विशाल पोकळीतच उडता येतं.
मग ती पोकळी भूतकाळाची असो नाहीतर भविष्य काळाची!”
– जळलेला मोहर

त्यागाची पुराणे देवळात ठीक असतात
पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे.
– ययाति

संशयाइतका जलद वाढणारा
दुसरा विषवृक्ष नाही जगात ! – रिकामा देव्हारा

माणूस हा झाडासारखा आहे,
तो सुखासुखी वठत नाही
तो ओलावा शोधत राहतो
त्याच खर प्रेम असत – जीवनावर
मग ते जीवन कितीही विद्रूप
कितीही भयंकर असो!
कारण मृत्युनंतरच्या अंधारात
कुठलीही चांदणी चमकत नाही
हे तो मनोमन जाणतो..!

एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला
कधी पुरतेपणी कळतो का ?
छे! आकाशाचा अंत एक वेळ लागेल
पण माणसाच्या हृदयाचा?

“परक्या जागेत माणसाला
लवकर झोप येत नाही!”
-पाहिले प्रेम

अंधारात मनुष्याला नुसती
आकाशातली रहस्य दिसतात असे नाही!
मनुष्याच्या मनातली रहस्यही
त्याला याच वेळी कळतात.
-पाहिले प्रेम

छाया नि प्रकाश यांच्या मिश्रणातून
जसे सुंदर चित्र निर्माण होते,
त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री
यांच्या भावनांच्या मिळणीतून
संसाराचे सुख उत्पन्न व्हायला हवे.
-पहिले प्रेम

वि स खांडेकर विचार

पहिले प्रेम हे एक विचित्र अर्धसत्य आहे
आणि अर्धसत्ये ही दर्शनी मोहक
पण परिणामी दाहक असतात.
हा अनुभव जगात कुणाला आलेला नाही?
-पाहिले प्रेम

रंगभूमीवर रंगून आलेल्या नटनटी
मोठ्या सुंदर भासतात.
त्यांचे खरे स्वरूप आपल्याला तिथे कुठे दिसते?
माणसाच्या विचारांचेही तसेच आहे.
जगात प्रत्येक मनुष्य तत्वज्ञान सांगत असतो
पण ते सांगतांना त्याचा हेतू
सत्य शोधण्याचा नसतो; उलट, सत्य लपवण्याचा असतो.
माणसाचे तत्त्वज्ञान म्हणजे त्याने
स्वतःच्या दुबळेपणावर घातलेले पांघरून!
-पाहिले प्रेम

“कुठलाही दुःखाची तीव्रता केवळ तत्त्वज्ञानाच्या शब्दांनी कमी होत नाही हेच खरं.”
-सोनेरी स्वप्ने भंगलेली.

स्वतःच्या पूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने आंधळी आणि हृदयाने बहिरी होतात.
-ययाति

आपल्या प्रिय माणसांप्रमाणे जो बदलत नाही तो खरे उत्कट प्रेम करूच शकत नाही.
-हिरवा चाफा

या स्वप्नातून जागं होण्याचा एकच मार्ग आहे- मृत्यू
-दोन ध्रुव

विषाच भय वाटलं म्हणून अमृताचा
मोह कुणाला सुटला आहे का.
-क्रोंचवध

आईचे हृदय हे जगातील सर्व तत्वज्ञानाचे माहेरघर असते.
-ययाति

प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात सापडतो
नाहीतर भावनेच्या पुरात वाहत जातो.
नुसतं प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहू शकतो.

या जगात उपभोगा पेक्षाही श्रेष्ठ आनंद असू शकतो तो म्हणजे “त्यागाचा”…
-ययाति

प्रेम म्हणजे माणसाला घटका
अर्धा घटका देहभान विसरायला लावणार
शरीरसुख नव्हे…
प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीवरून आपले प्राण
हसत मुखाने ओवाळून टाकणारी मनाची उत्कटता..!
-ययाति

मानवी अंतकरण ही अनंत आकाशापेक्षाही विशाल आणि अद्भुतरम्य अशी चीज आहे.
-चंदेरी स्वप्ने

निद्रा आणि प्रीती यांच्या जादूने मूर्तिमंत कठोरताही कोमल होते.
-क्रोंचवध

अलिप्तता हा सुखाचा राजमार्ग आहे.

तर मित्रहो या लेखात आपण वि स खांडेकर विचारv s khandekar quotes & Suvichar in marathi पाहिलेत, यामध्ये आम्ही आम्हास सापडलेल्या व्यवडलेल्या ओळयांचा समावेश केलेला आहे. जर आपणास याव्यतिरिक्त खांडेकर यांचे दुसरे विचार माहीत असतील तर आम्हास व इतर वाचकांना कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद ..

Shares