आजोबा वर कविता, स्टेटस मराठी | Grandfather Quotes in Marathi

आजोबा वर कविता, स्टेटस, चारोळ्या, मराठी, आजोबा आणि नात/नातू कविता Grandfather Quotes in Marathi & Ajoba quotes in marathi

मित्रांनो जगात सर्वाधिक प्रेमाचे नाते जर कोणते असेल तर ते म्हणजे आजोबा आणि नात/नातू चे असते. आजोबा आणि नातू मध्ये मित्र प्रमाणे प्रेम संबंधी असतात. आणि मुले देखील आजोबा दिसता बरोबर आनंदाने भरून जात असतात. जर आपणही आपल्या आजोबांना सर्वांपेक्षा अधिक प्रेम करीत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी आजोबांवर कविता व मराठी स्टेटस (Grandfather Quotes in Marathi) घेऊन आलेलो आहोत. हे ajoba quotes in marathi आपण आपल्या आजोबांसोबत शेअर करू शकतात आणि त्यांचे विषयी चे प्रेम व आदर व्यक्त करू शकतात.

Ajoba/Grandfather Quotes in Marathi

वयाने जरी मोठ असलं,
तरी मनाने मात्र लहान असतं,
दोन पिढ्यांमधील अंतर म्हणजेच आजोबा आणि नातू असत.

पैशांच्या मागे पळणाऱ्या या जगात,
सर्वात मोठं धन हे प्रेम असतं,
मात्र हम दो और हमारे दो च्या नादात वृद्धाश्रमाच जाळ विणत,
आणि चिमुकलं ते पाऊल आजोबा नावाच्या घोडेस्वारीला मुक्त.

आजोबा आणि नातवाचं नातं हे निराळच असतं, कारण इथे कोण लहान कोण मोठा हे गणितच नसतं,
एक संपूर्ण आयुष्याशी झगडून बसत,
तर दुसरं त्याचं बोट धरून आयुष्याची वाट चालायला लागत.

खेळताना तुझ्यासवे
माझे मन अल्लड होते…
तुझ्या लडिवाळाता
सुरकुत्यांचेही बालमन होते…

आजोबा म्हणजे केवळ धाक नसुन कातळावरून ओलांडणारा शुभ्र मायेचा झरा आहे .

आवडते ते सगळे जे जे नातवाच्या मर्जीचे
बाकी सगळे फिके वाटते
इतके प्रेम आजोबांचेच असते .

दोन पिढ्यांची गम्मत न्यारी
दोघांनाही दोघे प्यारी …
करमत नाही एकमेकावाचून
दोघात सामावली दुनिया सारी…

नातं हे असच असत,
कधी गोड कधी तिखट,
मात्र या सगळ्यांच्या पल्याड एक गोडस नात आजोबा आणि नातवाच असत.

grandfather quotes in marathi

वडिलांच्या जागी असलेले दुसरे बाप आहेत ते
प्रेमाने माझ्या पाठीवर मारलेली थाप आहेत ते
स्वार्थी जगात खऱ्या प्रेमाची अन् अनुभवाची खाण,
माझे आजोबा आहेत ते

आपल्या खांद्यावर खेळवले
तुम्हीच मला आयुष्य जगणे शिकवले
खरंच भाग्यवान आहोत आम्ही मुले
ज्यांना तुमच्यासारखे आजोबा मिळाले..!

वाचा> आजोबांना वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

जगातलं सगळ्यात निरागस नातं म्हणजे आजोबा आणि नातवंडांचं. जिथे फक्त प्रेमाचा ओघ असतो .

चिऊकाऊच्या गोष्टी
कधी दंतकथा ही सांगितल्या …
आजोबांनी माझ्यासाठी देवाकडे
सुखाच्या चांदण्या मागितल्या …

आजोबा म्हणजे बालमनाचा अनुभवी मित्र .
संस्कार ही रुजवतात आणि आयुष्य जगायलाही शिकवतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अनुभवाचं गाठोडं असलेली शिदोरी
नातवांची काळजी आणि १ रुपया खाऊला देण्यापालिकडचं प्रेम
सच्चा आणि अनुभवी मित्र म्हणजे आजोबा☺️

नातवंड म्हणजे आजोबांच्या सुखाची नांदी .
त्या थकल्या हातांना पुन्हा जगण्याचं बळ देणारा स्पर्श म्हणजे नातवाचं अंगाखांद्यावर खेळणं…

इतरांना धाक वाटेल असे आजोबा आपल्या नातवाला डोक्यावर घेऊन मिरवतात .

आयुष्यात सुख म्हणजे आजोबांचा सहवास …
मनांची मंदिर होतात असं व्यक्तीत्व म्हणजे आजोबा …
ना कसली अपेक्षा ना उपेक्षा … निव्वळ प्रेमाचा पाझर .

आयुष्यात मनाची श्रीमंती समजायला आजोबांचा सहवाह लाभायलाच हवा .

आयुष्यात एकच स्वप्न आहे…
आयुष्य आजोबांसारखं जगता यावं…
कर्म आणि मर्म या दोघांच्या बळावर .

वडिलांच्या मारापासून आई वाचवते
आणि आईच्या मारापासून तुम्ही वाचवतात
खरंच खूप भाग्यवान असतात ते नातू
ज्यांना तुमच्या सारखे आजोबा मिळतात…

Grandfather Quotes in Marathi

आजोबा वर कविता

आजोबा वर कविता

धुडधुडणा-या पावलांच्या मागे,
थरथरणारा शरीर धावतो,
थकलेल्या जीवाची परवा न करता,
त्या चिमुकल्या सोबत पुन्हा नव्याने बालपण जगतो.

एका थकलेल्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे हळूच मिशा ओढणार ते इवलुस चिमुकल असत.

आजोबांच्या मनातला हळवा कोपरा जो कधीच कठोर होत नाही तो नातवाचा असतो.

बालपण समृद्ध करणारी ,
वैचारिक बुद्धी घडणारी ,
चांगल्या वाईटाची पारख देणारी व्यक्ती
म्हणजे आजोबा.

जगाच्या पाठीवर कुठे ही जा ,
सच्चा दोस्त एकच… ते म्हणजे … आजोबा ..!

मी गायली कधी ओवी त्या सावळ्याची
ऐकली होती कापऱ्या आवाजात तुमच्या…
मी पाहिली छबी त्या सावळ्याची
आजोबा गाताना आवाजात तुमच्या…

दुःखी तर इथे प्रत्येक जणच असतो,
मात्र उतरत्या काळात कोणीतरी आधार असावा वाटतो,
आणि त्याचीच भरपाई की काय म्हणून आजोबा आणि नातवाच नात बनत.

दुधापेक्षा दुधावरची साय गोड असते,
आणि त्याचीच परिभाषा म्हणजे आजोबा आणि नातवाची जोड असते.

आजोबा माझ्या आयुष्यातली तुम्ही सर्वात बोबडी आणि गोड कविता आहात,
माझ्या पहिल्या हास्याची माझ्या पहिल्या बोबड्या बोलाची साक्ष देणारा माझा सर्वात प्रिय मित्र आहात.

तुम्ही सांगितलेली ती कासवाची आणि सशाची गोष्ट,
आजही मुखात माझ्या जिवंत आहे,
आजोबा तुमच्या कित्येक गोष्टी ऐकूनच मी या आयुष्याशी दोन हात करतो आहे.

यशाची हाव नको सत्याची भुक ठेव,
वाईटाची संगत नको सत्याने तू वार कर,
प्रवासात या थकलास जरी कुठे तू,
तर आजोबा नावाच्या या मित्राची आठवण ठेव.

बाळा तू माझा शेवटचा मित्र झालास ,
म्हातार्‍याची या काठी झालास,
या उतरत्या काळात पोटचीही परक

Grandfather Quotes in Marathi

ajoba quotes in marathi

शेवटच्या या टप्प्यात मज जवळ कुठली संपत्ती नव्हे आयुष्याचे चार धडे आहेत,
अडखळलास जर कुठल्या वळणावर तर आजोबाचे हे बाहू तुझ्यासाठी आजही सक्षम आहेत.

आजोबा म्हणजे एक थकलेले शरीर एक असलेला एक थरथरणारे व्यक्तित्व मात्र एका हाकेत हे सगळं विसरून नातवासाठी गुडघा टेकवत गोड स्वारी देणारे निस्वार्थ प्रेम….

किती आठवणी सोबत आहेत
ज्या जागल्या आपण सोबत.
नातवासोबत नाही आजोबा
मित्र म्हणून दुसरे कोणी शोभत.

प्रत्येक परिस्थितीमध्ये मनमोकळ करण्याचं हक्काचं नातं म्हणजे आजोबा नातवंडांचं…!

उतरत्या वयात ही
पुन्हा तरुण व्हावे
भिजण्या सुखात आजोबा
नातवाने हर्षवरून व्हावे …

बालपण पुन्हा जगावे
असे वाटते तेव्हा
जेव्हा आजोबा एकटाच
चौकटीत हसत राहतो …

कवयित्री: साक्षी कांबळे (बीड) & स्नेहल चव्हाण

तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम आजोबा वर कविता व स्टेटस शायरी स्वरूपात शेअर केलेत. आम्ही आशा करतो की आपणास हे सर्व Grandfather Quotes in Marathi आवडले असतील. आपण या लेखातील Ajoba Quotes in Marathi आपल्या आजोबां सोबत शेअर करावेत. हे सर्व शायरी संदेश आपण सोशल मीडिया जसे फेसबूक, व्हाटसप्प, instagram इत्यादीद्वारे शेअर करू शकतात. आजोबा quotes, आजोबा वर कविता, आजोबा आणि नात कविता आणि Ajoba Quotes in Marathi वाचल्याबद्दल आपले धन्यवाद..

Read More

Shares