वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Senior Old Person in Marathi

Birthday Wishes for Senior Old Person in Marathi : समाजात आपल्या सभोवताली अनेक वयोवृद्ध लोक असतात. मग ते आपल्या घरातील आजी, आजोबा असो अथवा बाहेरचे कोणी वृद्ध व्यक्ति… आपले कर्तव्य आहे की आपण कायम त्यांचा सन्मान करायला हवा. वृद्ध व्यक्ती हे जरी शरीराने वृद्ध असले तरी त्यांचे अनुभव अत्यंत शक्तिशाली आणि प्रत्येक क्षणी उपयोगी आणण्यासारखे असतात. जर आपणही आपल्या सोबत असणाऱ्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश पाठवू इच्छिता आणि आपल्या जीवनातील महत्त्व त्यांना शब्दांमध्ये व्यक्त करून दाखवू इच्छित असाल तर आजचा हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा आहे.

या लेखात Birthday Wishes for Old Person in Marathi चा समावेश करण्यात आलेला आहे. हे वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण वरिष्ट व्यक्तींना त्यांच्या वाढदिवशी पाठवू शकतात आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

Birthday Wishes for Old Person in Marathi

Birthday Wishes for Old Person in Marathi

तुमच्याकडे बघून नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते
कामासाठी वय नाही उत्साह लागतो
आणि उत्साह वयाप्रमाणे थकू देऊ नये
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच कणखरपणात येणारा प्रत्येक दिवस जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

अखंड आयुष्य ज्या व्यक्तींनं
स्वतःला परिपूर्ण घडवायला घालवलं त्या व्यक्तीचा वाढदिवस महत्त्वाचा आहे
इथं वय नाही उत्साह मोठा आहे
जन्मदिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा असंच आनंदीपणात आपलं आयुष्य जावो

येणारा प्रत्येक दिवस चैतन्याचं गीत गाईल
आनंदाने वय झालेलं शरीर सुद्धा तरुण होईल
या सुखाच्या क्षणी मन भरून जाईल
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जीवनात येणाऱ्या बऱ्या वाईट क्षणांना पार करून या वर्षात आपण पदार्पण केलत
असंच पुढे जगत रहा हीच ईश्वराकडे इच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आज सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे
आजचा दिवस सर्वांसाठी खास आहे
मोठ्या व्यक्तीचं जीवनातल स्थान विशेष आहे
तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा
ईश्वर तुम्हाला सुख समृद्धी आणि आरोग्य देवो

Birthday Wishes for Old Person in Marathi

वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात असंच मनसोक्तपणे जगत रहा
वयाची शंभरावी सुद्धां हसत हसत पहा
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य आरोग्यपूर्ण जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

कोणत्याही संकटाला न जुमानता
आपण स्वतःचं एक स्थान निर्माण केलं
जगण्याच्या या व्यापात सर्वांच्या मनात स्वतःचं अस्तित्व उभं केलं
तुमचं कार्य खरंच वर्णनीय आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमचं जीवन आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे
तुमचे विचार आम्हाला कायम योग्य मार्गावर ठेवतील यात शंका नाही
आज पर्यंतचा प्रवास जसा आनंदात झाला तसाच या पुढचाही होवो
तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

कामाला ऊर्जा वय नाही ते काम करण्याची इच्छा देत असते
तुमचं वय असून सुद्धा तुम्हाला तुमची इच्छा शक्ती थकून देत नाही
तुमचं असंच आयुष्य उर्जाशक्तीत व्यतीत करत राहो
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

मानानं मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला
वयानं मोठे असणाऱ्या व्यक्तीला
आणि कर्माने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला जन्म दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुमचं आयुष्य आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

तुमचं काम आणि उत्साह बघून तुमचं वय जाणवत नाही
प्रत्येक गोष्ट हाती घेतल्यानंतर ती पूर्ण होण्या वाचून राहत नाही
आपली ऊर्जा शक्ती आम्हाला प्रेरणादायी आहे
तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

तुमच्या ऊर्जादायी जीवनाकडे बघून अजूनही म्हणावसं वाटतं
व्हाव्यात आपणं दीर्घायुषी आणि शतायुषी
तुमच्यासाठी आनंद आणि सुख मागेन मी देवापाशी
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Seniors in Marathi

Birthday Wishes for Seniors in Marathi

मोठ्या व्यक्तीचा नुसता मस्तकावरचा हात जगायला आणि लढायला बळ देतो
तुमचा आशीर्वाद आम्हाला यशाकडे नेतो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच शेवटपर्यंत साथ आणि आशीर्वाद द्या

वाढणारा प्रत्येक दिवस वाढदिवसाप्रमाणे आनंददायी आणि आरोग्यदायी जावो
आपली यश, कीर्ती अजून भरभराटीला येवो
सुख समृद्धी संपूर्ण जीवन तुमचं व्यापून जावो
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मागून मागून देवाकडे तुमच्यासाठी काय मागावं
आमचं आयुष्य तुम्हाला लाभावं
आमच्या आनंदात तुम्ही स्वतःचं सुख शोधता
अजून खूप खूप वर्ष तुम्ही असंच सुखाने जगावं
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आयुष्यभर कष्टाने आणि मेहनतीने आपण सगळं कमावलं
आम्हाला कष्टाचं आणि मेहनतीचे महत्त्व शिकवलं
तुमचा वरदहस्त आमच्या मस्तकावर असाच राहावा
आणि येणारा प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जावा
जन्मदिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Old Person in Marathi : तर मंडळी हे होते काही उत्तम वरिष्ठांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश. आम्ही आशा करतो की या लेखातील Birthday Wishes for Senior Old Person in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील. याशिवाय कुटुंबातील आपण नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी चे शुभेच्छा संदेश आमच्या या वेबसाइट वर उपलब्ध आहेत. ते शुभेच्छा संदेश आपण Birthday wishes in Marathi या लिंक द्वारे प्राप्त करू शकतात.

Shares