2023 धनत्रयोदशी चे शुभेच्छा संदेश | Dhantrayodashi Wishes in Marathi

Dhantrayodashi Wishes in Marathi : मित्रांनो भारतीय सणांमध्ये दिवाळी च्या सणाचे विशेष महत्व आहे. दिवाळी चा सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी चा पहिलं दिवस धनत्रयोदशी चा असतो. यालाच हिन्दी भाषेत धनतेरस म्हणूनही संबोधले जाते. धनत्रयोदशी च्या दिवशी सोने व सोन्याची दागिने खरेदी करण्याचे विशेष महत्व मानले जाते. याशिवाय या दिवशी देवी लक्ष्मी सोबत, भगवान धन्वंतरी आणि कुबेर ची पूजा केली जाते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी धनत्रयोदशी चे शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. हे धनत्रयोदशी चे शुभेच्छा संदेश आपण आपले कुटुंबीय आणि मित्रमंडळी सोबत शेअर करून त्यांना धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..

Dhantrayodashi Wishes in Marathi

धन मातीत रूजावे
धन धन्याचे वाढावे…
धन ओवीत गुंफावे
धन नित्याने पुजावे …
धनत्रयोदशीच्या आपणास शुभेच्छा

Dhantrayodashi Wishes in Marathi

आज धनत्रयोदिशीच्या सांजेला
उजळत्या क्षितिजासारखी
आयुष्याची वृद्धी व्हावी
अन् घरोघरी समृद्धी वसावी….
हीच प्रार्थना धनत्रयोदशीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

कष्टांचे फळ बा
अमृताचे गोडी
धन समजले त्याला
सुकर्मे आवडी…

पुजावे धनधान्या
विद्या कलेसही पुजावे
जपावे धन परी
आधी ज्ञानास जपावे
धनत्रयोदशी च्या शुभेच्छा

जिथे समाधान असते तिथे लक्ष्मी वास करते…
आपल्या ओंजळीला लाभलेल्या धनाचा ईश्वरासम आदर केला तर समृद्धीचा वावर अनुभवास येतो.

रत्न माणिकांच्या घागरी पुजते कोणी
कोणी पुजती सोन्या चांदीच्या माळा
शेतकरी पुजतो ऐवज देखणा
ज्याने बहरतो त्याचा मळा

उजळावे सुख बहरावे चैतन्य
निरामय रहावे आयुष्य
अखंड हर्षाने निरंतर
समृद्ध व्हावे भविष्य

सुखशांतीच्या घागरी
आकंठ भरून रहाव्या
धनधान्याच्या राशी
गरजू ओंजळीत वहाव्या

तुमचे आयुष्य अशक्य समृद्ध क्षणांनी श्रीमंत व्हावे…
हर्षप्रहरांनी अंगणी तुमच्या आनंदाचे गाणे गावे …
याच शुभेच्छा..!

मनाची श्रीमंती अनंत वृद्धींगत होत रहावी अन् माणूसकीची, नात्यांची माणिक रत्ने आजन्म तुमच्या सोबत रहावी .
Dhantrayodashi Wishes in Marathi

धनत्रयोदशी शुभेच्छा

धनत्रयोदशी शुभेच्छा

मनोकामना पुर्ण करो
ही पहाट तेजाळणारी
लक्ष्मी घरी वास करो
नित्य पाठीशी उभी रहाणारी

समृद्धीला उधाण यावे
धनधान्याची भरभराट व्हावी
कष्टास फळ यावे
अन् लक्ष्मी हसत रहावी

आपल्या ओंजळीतले धन आपण जपायचे. त्येक धनमोत्याचा आदर राखायचा , सन्मान करायचा अन् त्याची पूजा करायची … कारण तो आपल्या कष्टांचा हक्काचा ऐवज असतो .

समर्पनाची भावना असेल तो ओंजळ कधीच रिती रहात नाही…

जिथे सत्य आहे तथ्य आहे
कर्म तिथे फळते
कष्टांचे सोने होऊन
घागर भरून पावते

तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे
रित्या बाजू लयास जाव्यात अन् नव्या पूर्वेची नवी आकांक्षा समृद्धीने पावन व्हावी

Dhantrayodashi Wishes in Marathi

Dhantrayodashi Wishes in Marathi

माणूसकी चे धन मोठे
आजन्म जपता यावे
मनाच्या श्रीमंतीस
आधी पुजता यावे

प्रसन्न व्हावे हर्ष सोहळे
लक्ष्मी तुमच्या घरची हसरी रहावी
सानवी चैतन्यमयी अशीच
त्येक पहाट साजरी व्हावी

धनधान्याच्या राशी
अखंड वाढत राहती
समाधानी असेल मन
तर लक्ष्मी हसत राहती

तुमच्या मनपर्णात उमटणाऱ्या त्येक अमूल्य स्वप्नांना पुर्तीचे बळ यावे याच शुभेच्छा…!

तेजाळत्या पूर्वदिपासम तुमच्या ललाटीचे सौभाग्य हसरे रहावे अन् ओंजळीचे बहर कधीच रिते न व्हावे

तर मंडळी वरील लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम धनत्रयोदशी शुभेच्छा – Dhantrayodashi Wishes in Marathi शेअर केल्या आहेत. आशा करतो की आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील. या लेखातील धनत्रयोदशी चे शुभेच्छा संदेश आपणास कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. आपण सर्वांना तसेच wishmarathi च्या सर्व वाचकांना धनत्रयोदशी आणि दिवाळी च्या अनेक शुभेच्छा.

Shares