संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी | Sankashti Chaturthi Wishes in Marathi

भगवान गणेश हे भोळे शंकर आणि देवी पार्वती यांचे लहान पुत्र आहेत. श्री गणेश यांना विनायक, गजानन, गणपती, लंबोदर, गजमुख, वक्रतुंड इत्यादि अनेक नावांनी संबोधले जाते. भगवान गणेशांना त्यांचे वडील अर्थात भगवान शंकरांकडून प्रत्येक पूजा आणि शुभ कार्यात प्रथम पूजनीय स्थान प्राप्त झालेले आहे.

मराठी आणि हिंदू कॅलेंडर नुसार महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकट चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी भगवान गणेश यांची विधिवत पूजा केली जाते. आणि श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी व्रत, उपवास देखील ठेवला जातो.

पुढील लेखात आम्ही आपल्यासाठी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी संदेश व sankashti chaturthi wishes in marathi घेऊन आलेलो आहोत. ह्या संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आपण गणेश भक्तांना पाठवू शकतात.

संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा पाहण्याआधी आपण संकष्टी चतुर्थी चे महत्व काय आहे या विषयी थोडी माहिती प्राप्त करून घेऊया.

संकष्टी चतुर्थी चे महत्व

संस्कृत भाषेत संकष्टीचा अर्थ संकट अथवा बाधा हरण करणे असा होतो. हिंदू धर्मीय समाजामध्ये संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त संकष्ट चतुर्थी चे व्रत व उपवास ठेवतात. या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा केली जाते. या जेवढे भगवान गणेश भक्तांना प्रसन्न होऊन त्यांना सुखमय जीवन प्रदान करतात. संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा आणि उपवास केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि म्हणून या दिवसाचे महत्व भरपूर आहे.

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

बाप्पा शोधल्यावर नाही तर, त्यांच्यात हरवल्यावर सापडतात

sankashti chaturthi wishes in marathi

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ।
संकट चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

गौरीपुत्रं गणेश
त्यांचे वडील महेश
गणेशाची करा भक्ती
आयुष्यात येईल नेहमी यश

संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा

एक दंत दयावंत चार भुजाधारी
माथ्यावर टिळक शोभतो मुषकाची स्वारी

सर्व गणेश भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

महादेव स्टेटस <<पहा येथे

सुखद शी गणेशाची साथ
प्रत्येक संकटात असते त्यांची साथ
जो पण त्यांना प्रेमाने बोलवतो
त्यांचे दुःख दूर होतात आपोआप

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

भक्तीचे नाम श्री गणेश
शक्ती चे नाम श्री गणेश
आनंदाचे नाम श्री गणेश
सुखाचे धाम श्री गणेश

भगवान गणेश आपणास आनंदाची प्राप्ती करून देवो. आपले जीवन अनेक सुख समृद्धीची रंगांनी भरून जाओ हीच प्रार्थना संकष्टी चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा

हे गणेशा आमच्या दुखाश्रू ना दूर करून, डोळ्यात सुखाश्रू भरून द्या. हीच आपणास प्रार्थना

श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…! आजच्या या मंगल दिनी आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होवो हीच प्रार्थना..

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या शुभ दिवशी भगवान गणशांना प्रार्थना आहे त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व तुमच्या कुटुंबावर राहो.

संकष्ट चतुर्थीला सकाळ सकाळी घ्या विनायकाचे नाम, सिद्ध होतील आपले सर्व काम.

sankashti chaturthi wishes in marathi

जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते.

संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी

श्री गणेशांपासून सुरू होते जीवन,
भगवान गणेश करतात सर्वांचा उद्धार
ध्यान करा भगवंताचे
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची गणेशाला
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

sankashti chaturthi wishes in marathi

संकष्टी प्रेम आहे, संकष्टी आनंद आहे
संकष्टी उत्साह आहे, संकष्टी नवीन प्रेरणा आहे
आपण सर्वांना संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा

आनंद वर्षाव करीत भगवान गणेश येईल
सर्वांचा उत्साहाने ही संकष्ट चतुर्थी साजरी होईल

संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा
sankashti chaturthi shubhechha marathi image

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.❤🙏🏻

कोरोनाचे संकट टळून तुम्हा सर्वांचं आयुष्य आधीसारखे होवो ही मनापासून सदिच्छा !
संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा

वरील पोस्ट मध्ये आम्ही खास संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा संदेश एकत्रित केले आहेत. आपण हे sankashti chaturthi wishes in marathi आपल्या प्रिय गणेश भक्तासोबत शेअर करा आणि त्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा द्या. sankashti chaturthi shubhechha आपणास कश्या वाटल्या आम्हाला नक्की कळवा.

READ MORE:

Shares