Navardevache ukhane : आपल्या देशात लग्न म्हटले म्हणजे अनेक नवनवीन प्रथा आणि परंपरा केल्या जातात. लग्नातील एक परंपरा म्हणजेच नाव घेणे यालाच ‘उखाणे बोलणे’ म्हटले जातात. उखाणे नवरदेव आणि नवरी दोघांनाही घ्यावे लागतात. उखाणे घेतांना काही उखाणे प्रेमाचे, काही विनोदी तर काही स्मार्ट असतात. आजच्या या लेखात आम्ही नवरदेवाचे विनोदी आणि सोपे उखाणे घेऊन आलो आहोत. हे नवरदेवासाठी चे मराठी उखाणे आपण आपल्या पत्नीचे नाव टाकून वापरू शकतात.
हे Navardevache marathi ukhane आपण लग्नात बोलून इतरांना प्रभावित करू शकतात. या उखाण्या मध्ये विनोदी, प्रेमाचे, सोपे, डिजिटल व इतर सर्व प्रकारचे मराठी नाव घेणे समाविष्ट आहे. हे मराठी नवरदेवाचे उखाणे नवरदेव बनणाऱ्या सर्वच पुरुषांसाठी उपयोगाचे आहेत. तर चला पाहूया हे Navardevache ukhane मराठी उखाणे.
नवरदेवाचे उखाणे मराठी
हातात हात घेऊन सप्तपदी चालतो,
शतजन्माचे नाते …. सोबत जोडतो.
असावी नेहमी हसतमुख बोलणे असावे गोड
…. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
सोन्याच्या कप आणि चांदीची बशी
…. माझी आहे जणू उर्वशी.
दुधापासून बनते दही आणि तूप
…. आवडते मला खूप खूप.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम
…. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एसएमएस
…. आज झाली माझी मिसेस.
navardevache ukhane
हातात आला हात बांधताना कांकन
…. मुळे सुंदर झाले माझे जीवन.
लग्नाच्या स्टेशनवर सुरू आमचा जीवन प्रवास
…. ला भरवतो गुलाबजामचा घास.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने
…. गळ्यात बांधतो मंगळसूत्र पती या नात्याने.
भल्या मोठ्या समुद्रात लहानशी होडी
…. आणि माझी लाखात एक जोडी.
ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
…. समोर सोनं पण लोखंड.
2 अधिक 2 होतात चार
…. सोबत करीन सुखी संस्कार.
पाहून तिला भागते माझी डोळ्यांची तहान
…. माझी आहे रुपाची खाण.
लग्नातील उखाणे नवरदेवाचे
नात्यांच्या रेशमी बंधात डाव नवा रंगतो
…. ला आज मंगळसूत्र बांधतो
आजच दसरा आज दिवाळी
…. आज माझ्या घरी आली.
navardevache ukhane
रूप तिचे गोड नजर तिची पारखी
शोधूनही सापडणार नाही …. सारखी.
समुद्राचे पाणी लागते खूप खारे
…. साठी तोडून आणेल चंद्र आणि तारे
एसटी ला म्हणतात लोकं लालपरी
…. आहे माझी सोनपरी.
सुंदर तिचे रुप छाप सोडते मनी
…. आहे माझ्या स्वप्नांची राणी.
फोटो लावण्यासाठी बनवली चौकोनी फ्रेम
माझ्या लाडक्या …. वर करतो मी खरे प्रेम.
सोपे व विनोदी उखाणे
प्रेमाच्या ओलाव्याने दुःख कोरडी झाली
…. माझ्या जीवनी चांदणे शिंपीत आली.
पाहताक्षणी चढली प्रेमाची धुंदी,
…. मुळे झाले जीवन सुगंधी.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ
…. च नाव घेतो पुढचे नाही पाठ.
गोड गोड पुरणपोळी वर घ्यावे भरपूर तूप
…. वर माझे प्रेम आहे खूप खूप.
कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ,
…. नाव घेतो बंद करा तुमची टिव टिव.
शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
…. हात माझ्याच हाती.
एक होती चिऊ आणि एक होता काऊ
…. चे नाव घेतोय डोकं नका खाऊ.
निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे,
…. नाव घेतोय लक्ष द्या सारे.
navardevache ukhane
रुपयाचा लोटा सोन्याची झारी
…. माझी लईच भारी.
गुलाबी प्रेमाने बनला प्रेमाचा गुलकंद
…. नावातच समावलाय माझा आनंद.
चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती
…. च्या नुसत्या हसण्याने सारे श्रम माझे हरती.
Navardevache ukhane marathi
गालावर खळी डोळ्यात धुंदी
…. मुळे झाली आयुष्य सुगंधी.
आधी बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून व्हायचे जागरण,
आता मी खुश, पोटही खुश कारण …. आहे सुगरण
कृष्ण म्हणे राधेला जरा गालात हास,
…. भरवतो मी पेढ्याचा घास.
आकाशाच्या पोटात चंद्र, सुर्य, तरांगणे
…. चे नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
navardevache ukhane
पाच पांडव सहावी द्रौपदी सखी
…. मला पत्नी मिळाली देवाचे आभार मानू किती?
navardevache ukhane images
पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजिरा,
…. वर शोभून दिसतो सुगंधी मोगर्याचा गजरा.
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
…. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
एका वर्षात, महिने असतात 12
…. मुळे वाढलाय जीवनातील आनंद सारा.
चांगल्या गोष्टी घटित व्हायला लागतो समय
…. मुळे झालेय जीवन आनंदमय.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे राने
…. नाव घेतो ठेवून सर्वांचा मान.
संसार रुपी सागरात पतीपत्नीची नौका
…. नाव घेतोय सर्वजण ऐका.
चंद्राला पाहून भरती येते सागराला
…. ची उत्तम साथ मिळाली माझ्या जीवनाला.
तर मित्रांनो सॉरी नवरदेवांना हे होते Navardevache ukhane marathi अर्थात तुमच्या नवरी व इतर नातेवाईकांसमोर नाव घेण्यासाठी काही उखाणे तुम्हाला हे मराठी नाव घेणे / नवरदेवाचे उखाणे कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा.
READ MORE
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..