गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा – Guru purnima quotes in marathi : मित्रांनो प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी न कधी गुरुचा सहवास लाभलेला असतो. गुरूंच्या कृपा आशीर्वादानेच जीवन जगण्याची कला अवगत होते. गुरुपौर्णिमा हा दिवस आध्यात्मिक तसेच जीवन जगण्याची कला शिकवणाऱ्या सर्वच गुरूंच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो. आशा या शुभदिनी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश पाठवून आपण आपल्या गुरूंचे आभार व्यक्त करू शकतात.
2024 साली गुरुपौर्णिमा ही 3 जुलै ला साजरी केली जाणार आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी गुरुपौर्णिमेला पाठवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (guru purnima quotes in marathi) घेऊन आलो आहोत. हे guru purnima status in marathi आपण सोशल मीडिया वर शेअर करावेत व आपल्या गुरूंना देखील पाठवावेत. तर चला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश सुरू करूया..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश
जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुपौर्णिमा संदेश मराठी
गुरुजी तुमच्या कृपेने आमचा झाला आहे उद्धार
आज जे काही आहोत आम्ही हे तुमचेच आहेत उपकार
नेहमी असू द्या तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हावर
हीच प्रार्थना चरणी आपल्या गुरूवर…!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
काळोखाची रात्र असावी त्यात साथ कंदिलाची मिळावी
देव्हाऱ्यात वात तैवत राहावी
माझ्या सार्या गुरूंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी….
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी नाव विठ्ठलाचे मुखी चिरकाळ राहो…
प्रथमसी आई वडील माझे गुरू त्यानंतरच माझे आयुष्य सुरू
देहाची या तिजोरी नको त्यात पापाचा ठेवा
मला ज्यांनी जन्म दिला त्यांना सुखी ठेव देवा….
फुलात जाई
सर्वात प्रेमळ माझी आई
किती गाऊ तिचे गुणगान
तिच्या ऋणातून होई न उतराई…
पदरी पुण्य असावे आणि रुप आई-वडिलांचे दिसावे
त्यांच्या चरणी मस्तक ठेवूनीया सार्थक जन्माचे करावे.
जे जे आपणासी ठावे,
ते ते दुसऱ्यासी देई,
शहाणे करून सोडी सकळ जन…
तोची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा…
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
Guru Purnima Quotes in Marathi
अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी गुरुपौर्णिमा
पुस्तकातले धडे गुरूकडून शिकावे
आणि आयुष्याचे धडे आई वडिलांकडून शिकावे
अनुभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळावी
तेथेची मज पंढरी घडावी.
जिथे स्वतःचं विस्मरण होते
तिथं गुरूंचे स्मरण होते
जय गुरुदेव
गुरु पूर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
गतजन्मीचे पुण्य सार्थकी लागावे अन् विठ्ठल रुक्माई च्या रूपात मज आई वडील लाभावे
चरणाशी पंढरी त्यांच्या पायीचे ते तीर्थ चंद्रभागा व्हावे.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरूचे आशीर्वाद लाभावे
ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे…..
भारतीय संस्कृतीत गुरुंचे स्थान
अत्यंत आदरणीय आहे.
गुरु तो सेतू असतो जो ज्ञान आणि
विद्यार्थ्याला जोडण्याचे कार्य करतो.
सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरुजी आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
हॅप्पी गुरुपौर्णिमा
Guru purnima quotes in marathi
Guru purnima wishes in marathi
गुरुपौर्णिमा शुभेच्छा फोटो
आई वडिलांनी जन्म दिला
परंतु गुरूंनी जगणे शिकवले आहे
ज्ञान, चरित्र आणि संसार चे
शिक्षण आम्ही मिळवले आहे.
हॅपी गुरुपौर्णिमा
हातात छडी असणारा म्हणजेच गुरु नव्हे
कळत नकळत कित्येक गुरू भेटतात
चालती फिरती शाळा करुन आयुष्याचे धडे शिकवतात…..
चित्ती गुरूचे रूप असावे मुखी तयाचे नाम पर्वतां मधूनही रस्ते निघतात
त्यासाठी प्रयत्न मात्र प्रामाणिक लागतात….
करूनीया पाप जगी स्वर्ग कोणास न मिळे
पाप-पुण्य एक होऊनी जिथे स्वर्ग दिसे
त्यासी आई-वडीलांचे चरणश्री समजावे…..
गुरुची या ठाई गोडी मनास लागे
कोण बोले अज्ञानी प्रत्येकामध्ये
मज माझे गुरूच जणू भासे…….
गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
Happy Guru purnima
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया…
हॅप्पी गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा – Guru Purnima Quotes in Marathi
गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
चला या गुरुपौर्णिमेला
करुया आपल्या गुरूंना प्रणाम
हॅपी गुरुपौर्णिमा
तुमच्या चरणांमधून एक ऊर्जा मिळते
वाटते नेहमी तिथे नतमस्तक व्हावे
या जगण्याच्या अथांग सागरात
गुरुदेव तुमच्याच नावानेच माझी होळी तरते
गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
लहान असो वा मोठा प्रत्येकात एक गुरु असतो
अनुभवायचे धडे देऊन डुबणारी नौका सावरत असतो…..
Guru purnima quotes in marathi
गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे
मोल आयुष्याचे जाणून घ्यावे
गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे
चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे…..
जगण्याचे अर्थ सारे गुरूंकडून जाणावे
देवाचे रूप हे गुरूमध्येच पहावे
डोंगराच्या पायथ्याशी राहून जणू काही विश्व अनुभवावे…..
शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘गुरु’ होय.
अश्याच प्रिय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगरघाट
गुरूविण कोण दाखविल वाट..!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
GURU PURNIMA STATUS IN MARATHI
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
Happu GuruPornima
Guru Purnima Quotes in Marathi
अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकाशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या.
शांतीचा शिकवला पाठ
अज्ञानाचा मिटवला अंधकार
गुरूंनी शिकवले आम्हास
नफरत वर विजय आहे प्यार
Happu GuruPornima
ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई हे निस्वार्थ दान
गुरु त्यासी मानावा
देव तेथेची जाणावा
गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!
guru purnima chya hardik shubhechha
आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार – सर्वाना सुखदा पावे…
अशी आरोग्य, संपदा, कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये, हीच ईश्वर चरणी प्रार्थना…
गुरु पौर्णिमेच्या माझ्या पहिल्या गुरूस अनेक शुभकामना!
तर हे होते गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश – guru purnima quotes in marathi. आम्ही आशा करतो की हे संदेश आपणास आवडले असतील ह्या Guru purnima quotes, status, msg, wishes in marathi ला आपण सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. व आपल्या गुरूविषयी सन्मान व्यक्त शकतात. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश वाचल्याबद्दल धन्यवाद..
Read More
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..