प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Journey Wishes in Marathi

या लेखात प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश व Happy Journey Wishes in Marathi विषयी चर्चा करण्यात आलेली आहे.

मित्रांनो आयुष्य जरी एक प्रवास असला तरी या आयुष्याच्या या प्रवासात देखील अनेक प्रवास ठरलेले असतात. व प्रत्येकालाच आयुष्यात कधी न कधी प्रवास हा करावाच लागतो. मग तो प्रवास नौकरी साठी असो वा शिक्षणासाठी! पहिल्या प्रवासासाठी घराबाहेर टाकेलेले पाऊल हेच आपले घरातील शेवटचे पाऊल मानले जाते. यांनतर घरी परतणे ते काही वेळेसाठीच कारण सुट्टी संपल्यानंतर पुन्हा प्रवासाला निघायचे ठरलेले असतेच.

असा हा प्रवास सुखकर व्हावा, प्रवासाचा एकटेपणा जाणवू नये यासाठी प्रवासाच्या शुभेच्छा प्रियजन देत असतात. जर आपल्या कुटुंबात अथवा मित्र परिवारात कोणी प्रवासाला जात असेल आणि आपण त्यांच्यासाठी Happy Journey Wishes in Marathi म्हणजे प्रवासाच्या मराठी शुभेच्छा शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी नककीच उपयोग्यच ठरणार आहे. कारण या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम प्रवासाच्या शुभेच्छा एकत्रित केल्या आहेत. या शुभेच्छा प्रवास करणाऱ्या व्यक्तीसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. तर चला सुरू करूया..

Happy Journey Wishes in Marathi

Happy Journey Wishes in Marathi

निरुत्साही मनाला
मार्ग हवा असतो
स्वतः ला नव्याने
ओळखण्यासाठी
प्रवास हवा असतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

आज पाऊले टाकली घराबाहेर
हेच शिकवण देईल आयुष्यभर
प्रवासाच्या खूप शुभेच्छा….

आयुष्य वाहते आहे असं नदी शिकवते
पण प्रत्येकक्षात अनुभवण्यासाठी प्रवास करावा लागतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

ओंजळ आपली
रिती असते
आठवणींनी ती
भरायची असते
आणि त्यासाठी प्रवासी बनायचे असते
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

कित्येक प्रवासांनी
मिळून आयुष्याचा
प्रवास बनतो
कोमजलेले मनही
बहरून जाते
जेव्हा प्रवासाची संधि घडून येते
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

निसर्गाच्या सान्निध्यात
समाधान मिळते
प्रवासात माणसाला
जगण्याचे रहस्य कळते
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

एकट्याने केलेला प्रवास
मनात जपायचा असतो
हृदय उघडून प्रत्येकक्षणी
तो जगायचा असतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

मार्ग मिळत नसतो
तो शोधावा लागतो
अस्तित्व दिसत नसते
ते बनवावे लागते
आणि त्यासाठी प्रवासाला
जवळ करावे लागते
प्रवासाच्या शुभेच्छा…

कधीही सुरू न होणाऱ्या
प्रवासापेक्षा
उशीरा सुरू झालेला
प्रवास केव्हाही
चांगला असतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

वाटसरु मिळेल
वाटेवर प्रवासाच्या
नव्याने निघालेल्या
प्रवासाला खूप खूप शुभेच्छा…

प्रवास शुभेच्छा संदेश

आयुष्य सावरायला
किती राबतो माणूस
क्षणभर विश्रांतीसाठी
दूरवर जातो माणूस
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

आयुष्य जगले
जबाबदारी पार पाडत
दोघेही जगा आता
प्रवासात एकमेकांना
सांभाळत
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…
Happy Journey Wishes in Marathi

प्रवास सुरू होण्यासाठी
घराबाहेर पाऊले
नंतर पडतात…
आधी बाहेर डोकावतं
ते माणसाचं मन
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

एकट्याचा पहिला
प्रवास खास असतो
नव्या आरंभाचा
तो ध्यास असतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा….

आयुष्याच्या प्रवासात
भागीदार असतात
कित्येक हात
पण एकट्याच्या प्रवासात
माणूस डोकावून
पाहतो स्वतःच्या आत
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

आयुष्य म्हणजे भटकंती आहे
कधी इथे तर कधी तिथे
मुक्काम आहे
आठवणी बनवण्याची
ही तर संधी आहे
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

माणूस मुक्कामापेक्षा
प्रवासात जास्त जगत असतो
म्हणून प्रवास जगता यावा
प्रवासाच्या खूप शुभेच्छा….

प्रवास आवडणाऱ्या
माणसाला नवनिर्मिती
हवी असते..
त्यालाच आयुष्यासाठी
आठवणींची शिदोरी
हवी असते
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

स्वतःच्या प्रवासावर
प्रेम असणाऱ्यांनी
दुसऱ्याच्या प्रवासात
डोकावून बघायचे नसते
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश

प्रवासात कित्येक
चेहरे मिळतील नवे
तु पुस्तक म्हणून
वाच जितके तुला हवे
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

न ठरवता केलेला प्रवास
जास्त शिकवून जातो
न सापडणारे उत्तरे
देऊन जातो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

आयुष्य खेळ आहे
प्रश्न उत्तरांचा
हा तर वेळ आहे
सुंदर प्रवासाचा
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

खवळलेल्या मनाला
तो समुद्र समजू शकतो
म्हणून प्रवास करावा
त्या समुद्राला भेटण्यासाठी
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

प्रवास फक्त जगायचा नसतो
प्रवास फक्त फोटो कैद
करायचा नसतो…
त़ो जगायचा असतो अन्
नजरेत भरून आणायचा असतो
प्रवासाच्या खूप शुभेच्छा…

माणूस प्रवास करतो
स्वतःला भेटण्यासाठी
निसर्गाच्या सान्निध्यात
स्वतःला सामावण्यासाठी
प्रवासाच्या खूप शुभेच्छा….

काळ निघून जातो
पण आठवणी सोबत राहतात
प्रवास सुरू होतो
माणसं जगायला लागतात
प्रवासाच्या खूप शुभेच्छा….

ओढ असते मनाला
मनसोक्त भटकण्याची
गरज असते तेव्हा
खास प्रवासाची
प्रवासाच्या खूप शुभेच्छा

Happy Journey Wishes in Marathi

Happy Journey Wishes in Marathi

क्षितिज विस्तारत जाईल
जसे पाऊले बाहेर पडतील
आठवणीने आयुष्य
समृद्ध होईल
जसा प्रवास निरंतर चालत राहिल
प्रवासाच्या खूप शुभेच्छा

प्रवासाने उत्साहीत होते
मन आपले
भटकंतीने ओळखशील
तु स्वतःला जे आजवर जपले
प्रवासाच्या खूप शुभेच्छा

कधी कधी
एकटही निघावं माणसाने
या सुंदर प्रवासासाठी…
गर्दीतून बाहेर पडावं
थोड्या एकांतासाठी
प्रवासाच्या खूप शुभेच्छा

तर मंडळी हे होते काही उत्तम प्रवासाचे शुभेच्छा संदेश. आम्ही आशा करतो की हे Happy Journey Wishes in Marathi आपणास नक्की उपयोगी ठरले असतील. आणि ज्यांच्यासोबत आपण हे शेअर करणार त्यांच्यात देखील या द्वारे प्रवास करण्यासाठी नवउर्जेचा संचार होईल. आपणास हे प्रवासाच्या शुभेच्छा संदेश कसे वाटले आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा. आणि वाढदिवस, सण उत्सव, जयंती, लग्न समारंभ इत्यादि कार्यक्रमांचे शुभेच्छा संदेश Marathi Wishes प्राप्त करीत राहण्यासाठी आमच्या वेबसाइट WishMarathi ल भेट नक्की द्या.

Read More

Shares