New Home Wishes in Marathi : स्वतः च हक्काच घर असणे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्वप्न असते. व यासाठी प्रत्येक व्यक्ति मेहनत घेतो. वर्षानुवर्षे मेहनत करून, पैसे जमवून ज्यावेळी घर बांधले जाते तेव्हा तो आनंद वेगळाच असतो. जर आपल्या मित्र कुटुंबात अथवा नातेवाईक मंडळी मध्ये कोणी नवीन घर घेतले असेल तर आजच्या या लेखातील नवीन घराच्या शुभेच्छा संदेश आपणास उपयोगात ठरतील. या लेखात देण्यात आलेले New Home Wishes in Marathi आपण नवीन घर घेणाऱ्या व्यक्तीला पाठवू शकतात आणि नवीन घरच्या शुभेच्छा देऊ शकतात.
तर चला गृहप्रवेश नवीन घराच्या शुभेच्छा व New Home Wishes in Marathi ला सुरूवात करूया..
New Home Wishes in Marathi
घर म्हणजे विटांचं काम नसत नुसतं
घर पहाटेचे सुंदर स्वप्न असतं
घर नात्यांचे रेशमी बंध असतं
आपणास नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलंही एक घरटं असावं
आणि त्या घरट्यात आपलं कुटुंब सुखात राहावं
आज ते स्वप्न तुमचे पूर्ण झाले, ही देवाचीच इच्छा..
नवीन घराच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
घर हे घर असतं नसतात नुसत्या भिंती
ते नात्यांनी फुलतं माणसाच्या सुखांती
नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
घर आपलं छोटसं
पण रुबाबात थाटलेलं
सगळ्या नात्यांच्या बंधनात एकत्र बांधलेलं
नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
घर असावे पक्ष्यांच्या घरट्यासारखे
नको नुसता देखावा
प्रेम आणि आपुलकीच्या राशी असाव्यात
घर म्हणजे आनंदी चित्राचा रेखावा
चित्राप्रमाणे थाटलेल्या घराच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक तरी घर असावं
जेथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं
दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं
या रखरखीच्या जगण्यात वावरतांना
उमेद देणार डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं
तुमचं ऊर्जा स्थान बनलेल्या नवीन घरानिमित्त हार्दिक शुभेच्छा
हे पण वाचा> सेवानिवृत्ती शुभेच्छा मराठी
New Home Wishes in Marathi
घर तुमचे माणसात गुंफलेले
सिमेंटने नव्हे तर माणसाच्या एकतेवर रचलेले
सुखदुःखात एकमेकांच्या सोबतीत जगलेले
असे घर उभारले आपण त्या घराच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
येणारी प्रत्येक संकटे त्याच्या ताकदीपुढे नमतील
घरातल्या माणसाच्या सुखासाठी माणसं एकत्र झटतील
स्वप्नमय आणि सुंदर हे जगणं आपलं
सुंदर, सुरेख घर आपलं
नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
घर बनते मायेने, तेथे असते मायेची ऊब
संकटकाळी संरक्षण करते
घरासाठी झटणाऱ्या माणसाला ते जगवते
नवीन वास्तू च्या हार्दिक शुभेच्छा
दिवसभराच्या गर्दीत लुप्त होताना
अपसुक पावलं वळण्यासाठी एक टुमदार घर असावं
आपलंसं मानणारं एक विसाव्याच ठिकाण असावं
सगळा बाहेरचा व्याप सोडून जिथं तुम्ही समाधानाने जगावं
असं घर तुम्ही उभारले त्या घरानिमित्य हार्दिक शुभेच्छा
New Home Wishes in Marathi
घरात आपल्या नांदो सुख आणि शांती
घर आपुलकीने बनतं नसतात नुसत्या भिंती
घरात माणसाच्या प्रेमाचा बंध असावा
आपल्या नवीन घरातला प्रत्येक माणूस समाधानात असावा
नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
घर आपलं सोनेरी क्षणांनी नटलेलं
घर म्हणजे स्वप्नपूर्ती हुन पुढे भेटलेलं
साजऱ्या घराच्या हार्दिक शुभेच्छा
गृहप्रवेश नवीन घराच्या शुभेच्छा
घर असते दगड व विटांचं पण ते त्यातील नात्यांनी बनतं
कितीही विस्कटलं तरी पुन्हा माणसाच्या धाग्यांनी विणतं
अशा माणुसकीच्या धाग्यांनी विणलेल्या घराच्या हार्दिक शुभेच्छा
घरात देव्हारा आणि अंगणात तुळस
घरातील माणसं हीच घराचा कळस
नवीन घरा निमित्त हार्दिक शुभेच्छा
घर असावं हसऱ्या आठवणींचं
दुःख वाहून नेणारं आणि सुखमय साठवणीचं
घर असावं मनात रुजणारं
आणि प्रेमाच्या ओलाव्यात भिजणारं
नवीन वास्तू च्या हार्दिक शुभेच्छा
best wishes for new home in marathi
घराला घरपण येतं माणसांच्या असण्यानं
घराचा आनंद वाढतो तेथील लोकांच्या हसण्यानं
घराचं वृक्ष वाढतं घरातली माणसं जगण्यानं
स्वप्नपूर्ती घराची आणि स्वप्नपूर्ती जीवनाची
नवीन घराच्या हार्दिक
घर असते रेशमी स्वप्नाने विणलेलं
नसानसात आपल्या माणसांच्या प्रेमाने भिनलेलं
घर नात्यात गुंतलेलं
आपुलकीने जपलेलं
अशा आपुलकीच्या घर उभारणीच्या हार्दिक शुभेच्छा
मांगल्याचे दुसरे रूप असते एक घर
संस्कारांची शिदोरी असते एक घर
त्या संकल्पपूर्ती च्या हार्दिक शुभेच्छा
घर बनतं संस्कारानं तिथल्या माणसांनं
घराच स्वरूप मंदिरा सारखे होते,
घरातल्या माणसांना पुजल्यानं
नवीन घराच्या हार्दिक शुभेच्छा
घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
इथे असावा प्रेम, जिव्हाळा नकोत नुसती नाती
नवीन घराच्या आपणास अनेक शुभेच्छा
घर मोठं किंवा छोटं आहे हे महत्वाचं नाही तर तिथल्या माणसांची मनं किती मोठे आहे याला महत्त्व आहे
मोठ्या मनाच्या माणसाचं स्वतः च घर आज पूर्ण झालं त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा
तर मंडळी या होत्या गृहप्रवेश व नवीन घराच्या शुभेच्छा संदेश. आम्ही आशा करतो की या लेखातील New Home Wishes in Marathi आपणास आवडल्या असतील. या शुभेच्छांना आपण नवीन घर विकत घेणाऱ्या आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकतात. आणि आयुष्यातील पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊ शकतात.
हे पण वाचा
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..