मराठी कोडी व उत्तरे | ओळखा पाहू कोडी | riddles in marathi with answers

मराठी कोडी व उत्तरे – riddles in marathi with answers : मित्रहो आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी ओळखा पाहू मराठी कोडी घेऊन आलो आहोत. कोडीचा खेळ खेळल्याने आपापसातील संवाद तर वाढतोच परंतु विचार क्षमतेत वृद्धी होऊन बुद्धी देखील तल्लख होते.

आजकाल मोबाइल व इंटरनेट च्या युगात मराठी कोडी खेळण्याचा खेळ खूप कमी झाला आहे. म्हणूनच या लेखातील ओळखा पाहू कोडी मराठी (marathi kodi) वाचून आपण आपले मित्र व कुटुंबीयांना प्रश्न करू शकतात आणि पुन्हा एकदा Marathi Kodi चर्चेत आणू शकतात. तर चला सुरू करूया..

मराठी कोडी व उत्तरे | riddles in marathi with answers

riddles in marathi with answers

1) अशी कोणती वस्तू आहे जिच्यात खूप सारे छिद्रे असतांनाही पाणी भरता येते.
उत्तर: (Sponge)


2) वर्षातील कोणत्या महिन्यात 25 दिवस असतात.
उत्तर: सर्वच महिन्यामध्ये


3) वडिलांनी मुलीला एक वस्तू दिली आणि सांगितले की भुख लागली तर खाऊन घे, तहान लागली तर पिवून घे आणि थंडी वाजली तर जाळून घे. ही वस्तू कोणती असेल?
उत्तर: नारळ


4) काळा घोडा पांढरी स्वारी, एक उतरवला तर दुसऱ्याची पाळी.
उत्तर: तवा आणि पोळी


5) असे काय आहे जे नेहमी तुमच्या पुढे असते परंतु तुम्ही त्याला पाहू शकत नाहीत.
उत्तर: भविष्य


मराठी कोडी व उत्तरे

6) अशी कोणती वस्तू आहे की पावसात कितीही भिजली तरी ओली होत नाही.
उत्तर: पाणी


7) माझा भाऊ मोठा शैतान, बसतो नाकावर पकडून कान. ओळख पाहू कोण?
उत्तर: चष्मा


8) डोळे आहेत पण पाहू शकत नाही, पाय आहेत पण चालू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही. सांगा पाहू मी कोण?
उत्तर: बाहुली


9) जगभराची करतो सैर, जमिनीवर ठेवत नाही पैर (पाय). दिवसा झोपतो रात्री जागतो. सांगा पाहु की कोण?
उत्तर: चंद्र


10) एवढासा गडी त्याला पाहून प्रत्येकजण रडी.
उत्तर: कांदा

मराठी कोडी व उत्तरे

marathi kodi

(11-20)

11) आकाशातून पडली घार, तिला केले ठार. मास खाऊ मटामट रक्त पीयु गटागट.
उत्तर: नारळ


12) दोन बहिणी एकच रंगाच्या, घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर दुसरी कामी न येते.
उत्तर: चप्पल


riddles in marathi with answers

13) वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम, कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव.
उत्तर: चष्मा


14) अशी कोणती गोष्ट आहे जी पाणी पिता बरोबर नष्ट होते.
उत्तर: तहान


15) ना अन्न खातो न पगार घेतो, पण तरही पहारा दिवस रात्र देतो. सांगा बरं कोण?
उत्तर: कुलूप


16) अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.
उत्तर: गरम मसाला


17) कंबर बांधून घरात राहते, सकाळ संध्याकाळ कामी येते.
उत्तर: झाडू


18) निकेत च्या वडिलांची चार मुले आहेत. 1) रमेश 2) निलेश 3) गणेश चौथ्या चे नाव सांगा.
उत्तर: नीकेत


19) काळी आहे पण कोकिळा नाही. लांब आहे पण दांडी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. सांगा पाहु मी कोण?
उत्तर: वेणी


20) एका राजाची अद्भुत राणी, दमादमाने पिते पाणी.
उत्तर: दिवा


ओळखा पाहू मी कोण

(21-30)

मराठी कोडी व उत्तरे

21) ऊन पाहता मी येतो, सावली पाहता मी लाजतो. वाऱ्याच्या स्पर्शाने मी नाहीसा होतो. ओळख पाहू की कोण?
उत्तर: घाम


22) दोन भाऊ शेजारी भेट नाही जन्मातरी
उत्तर: दिशा


23) असे काय आहे जे आले तरी त्रास होतो आणि गेले तरी त्रास होतो.
उत्तर: डोळे


24) पाटील बुवा रामराम, दाढी मिश्या लांबलांब. भाजून खाती, लाह्या खाती, उड्या मारती लहानसहान.
उत्तर: मक्याचे कणीस.


riddles in marathi with answers

25) आठ तोंड, जीभ नाही
तरी सुंदर गाणे गायी.
उत्तर: बासरी


26) अटांगण पटांगण लाल लाल वाणी, बत्तीस राजांची एकच राणी.
उत्तर: जीभ


27) वीज गेली आठवण आली, मोठी असो वा लहान. तिच्या डोळ्यातून वाहे पाणी. वातावरण होते प्रकाशमान.
उत्तर: मेणबत्ती


28) उंच वाढतो रंगाने हिरवा. जमिनीत थोडे पाणी मुरवा. प्रदूषण करतो मी कमी, निरोगी आयुष्याची देतो हमी
उत्तर: झाड


29) एक अंगठा, चार बोटे पण नसांमध्ये रक्त नाही
लोक म्हणतात बेजान मला, पण नेहमी उपयोगी मी राही.
उत्तर: हात मोजे


30) तीन जण वाढायला, बारा जण जेवायला
उत्तर: घड्याळ

31) अशी कोणती वस्तू आहे की चालता चालता थकली की तिची मान कापून टाकली जाते. आणि मान कापल्यानंतर ती पुन्हा चालायला लागते.
उत्तर: पेन्सिल

32) असे काय आहे जे तुम्ही झोपल्यावर खाली पडते आणि तुम्ही उठल्यावर परत वर येते?
उत्तर: तुमची पापणी

33) अशी कोणती वस्तू आहे जी जितकी जास्त वाढली तितकीच कमी होते?
उत्तर: वय

34) एक व्यक्ती आयुष्यात सर्वात जास्त वेळा काय ऐकतो?
उत्तर: स्वतः चे नाव
मराठी कोडी व उत्तरे

35) अशी कोणती वस्तू आहे जी पंख नसतांनाही उडते?
उत्तर: पतंग

36) ते काय आहे जे तुम्ही काहीही बोलले की तुटून जाते?
उत्तर: शांतता

37) ते काय आहे के मे मध्ये नाही पण डिसेंबर मध्ये आहे, आग मध्ये नाही पण पाण्यात आहे?
उत्तर: उष्णता

38) डोळ्यातून टपकते तिच्या पाणी, ती आहे रात्रीची राणी. ओळख पाहू नाव कोण आहे ती ?
उत्तर: मेणबत्ती

39) सांगा पाहू आफ्रिकेत जन्मलेल्या मुलाच्या दाताचा रंग काय असेल ?
उत्तर: जन्मलेल्या मुलाला दात पाहिलेत का कधी ?

40) सांगा पाहू की सतत 2 दिवस पाऊस का येत नाही?
उत्तर: कारण मध्येच रात्र येऊन जाते

तर मित्रांनो हे होते काही ओळखा पाहू मी कोण मराठी कोडी व उत्तरेriddles in marathi with answers. आशा आहे. की तुम्हाला ह्या मराठी कोडी व उत्तरे आवडले असतील. व यानंतर आपण कोणालाही मला कोड सांगा म्हणून request करणार नाहीत. याशिवाय जर आपणास आणखी काही Marathi kode with answers माहीत असतील तर आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. धन्यवाद…

Shares