मैत्री शायरी मराठी – Friendship quotes in marathi : मित्रांनो रक्ताच्या नात्या पलीकडे असते ते मैत्रीचे नाते. मैत्रीला, मैत्रीच्या अस्तित्वाला शब्दात वर्णन करणे कठीणच आहे. खरी मैत्री ही फक्त दोन व्यक्तींची मैत्री नसून दोन आतम्यांची व त्यांच्या हृदयांची मैत्री असते. मैत्रीला प्रेमापेक्षाही उच्च स्थान देणे आलेले आहे.
म्हणूनच wishmarathi.com च्या ह्या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी आजच्या या लेखात मैत्री शायरी मराठी, कविता व मराठी स्टेटस म्हणजेच friendship quotes in marathi घेऊन आलेलो आहोत. या मैत्रीच्या मराठी कविता वाचून आपणास एक सुखद आनंद प्राप्त होईल. मैत्री शायरी आपण स्टेटस म्हणून देखील ठेवू शकतात. तर चला जास्त वेळ न घेता वेड लावणाऱ्या मैत्रीवरील कवितांना सुरू करूया..
मैत्री शायरी मराठी
मैत्री आमची समजायला
थोडा वेळ लागेल
आणि जेव्हा समजेल ना
तेव्हा वेड लागेल.
प्रेम आणि मैत्रीत खूप अंतर असते
प्रेमात शब्दांना आवरा, तर
मैत्रीत शब्दांना मोकाट व्हावे लागते
प्रेमालाही हेवा वाटावा
अशी आहे आमची मैत्री
दुःख कितीही मोठे असो
मित्रांच्या मैफिलीत सर्व विसर पडतो
मैत्री ही कर्णा सारखी कट्टर असावी
पण मित्राच्या अधर्माला प्रोत्साहित करून
मित्राच्या विनाशाचे कारण ठरणारी नसावी
जेथे दिखावा संपतो
तेथे खरी मैत्री सुरू होते
तुमच्या सोबत कीती आहेत याला महत्त्व नाही.
तुमच्या बाजूने कीती आहेत याला महत्त्व आहे.
ती खरी मैत्री!
खरी जोडी मैत्रीचीच असते.
दुसरं कुणी शेवटपर्यंत साथ निभावत नसते.
मैत्रीत ना दिवस असतो ना रात्र
मैत्रीत काहीच नसतं ना जात ना गोत्र
खुप कमी ठिका असतात तिथं माणूस मोकळं होतं.
मैत्रीशिवाय कोणतंही मन अबोलचं राहतं.
गर्द जंगलातील ती वाट नागमोडी
मैत्री शिवाय अपूर्ण असतात जीवनातील घडामोडी.
सगळ्यांच्याच मनात एक कप्पा असतो.
मैत्री शिवाय कुणाकडेही तो व्यक्त होत नसतो.
काही गोष्टींना ना आरंभ असतो ना अंत
मैत्री शिवाय जगणं म्हणजे मनाची खंत
आपलं बरोबर असणं सगळं जग समजून घेतं
परंतु आपलं चुकीचं नसणं समजून घेणारी खरी मैत्रीच असते.
कुणी कुणाचं कीती आहे
याला मोजमाप एकच… विश्वास
आणि विश्वासाचं दुसरं रूप मैत्री!
चांदण्यांच्या प्रकाशाचं महत्त्व अंधार्या रात्री शिवाय कळत नाही.
खर्या मैत्रीसारखी साथ मागूनही कुणाला मिळत नाही.
मैत्री/जीव/जिव्हाळा
प्रत्येक वळणावर साथ देणार्यांची सोबतीची गणती होतं नाही.
खरी मैत्री मातीसारखी असते
मातीशिवाय पणती होतं नसते.
मैत्रीत काय असतं विचारणार्यांना
मैत्रीत काय नसतं हे सांगावं…
Friendship Quotes in Marathi – मैत्री मराठी स्टेटस
आयुष्यातील रखरखी पासून
आपल्याला अल्हाददायक जगात घेऊन जाणारी
दोस्तीतील दुनियादारी
माझ्या प्रत्येक विजयात सामील दुसरे
हारल्यानंतर बघीतलं तर मैत्री सोडून नव्हते तिथे कुणी तिसरे
वळणावळणावर अखंड साख देणारी मैत्री…
माणसाच्या जीवनात खरं मैत्रीत स्वातंत्र्य असतं
तिथंच खरं जगायला मिळतं नाही तर आयुष्यभर माणसाच्या जगण्यात पारतंत्र्य असतं
हाजारोंच्या विरोधकांत एक आस दिसून येते.
जिथं सगळं जग विरोधात जातं तिथं खरी मैत्रीच साथ देते.
जगातल्या सर्वात कठीण ह्रदयाला ही पाझर मैत्रीत फुटतो
विश्वातील सगळ्या भावना व्यक्त होण्याचं एक ठिकाण असतं.
आणि मैत्रीत ते ठिकाण सफखोल बसतं.
मैत्री मधाहून ही गोड असते.
तीथं कशालाच तोड नसते.
मनाच्या उंबर्याचं तू दार
माझ्या जगण्याला मैत्रीचा आधार
लोपले आकाश जरी
तरी उंच झेप मी घेईल
माझ्या प्रत्येक संकटात तू आणि
तुझ्या गरजेत साथ मी देईल
मैत्रीत जगणं!!!
जीवनात मोल असते खळखळून बागडण्याला.
मैत्रीण सोबत असेल तर बळ येतं झगडण्याला.
मैत्री आपलेपणाचा भास देते.
नुसता भास नाही जगण्याची आस ही देते.
माझ्या चांगुलपणाची दरवेळी साक्ष होते.
जगण्याचं गाणं माझ्यासोबत दरवेळी गाते.
प्रत्येक घराला एक खिडकी असते
मोकळा श्वास घेण्यासाठी
तसंच प्रत्येकाला मीत्र/मैत्रीण असावेत
भावना व्यक्त करण्यासाठी!
तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी होडी असते.
तसेच या अथांग मनाच्या किनार्याला गवसणी घालण्यासाठी मैत्रीणीची जोडी असते.
धकाधकीच्या जीवनात जगण्याला आजकाल कंटाळा येतो.
मे च्या उन्हाळ्यात ही मैत्री नावाचा गारवा वेगळाचं थंडावा देतो.
लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो
फरक फक्त एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात
आणि आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो
प्रत्येक मुलाच्या तुटलेल्या हृदयाला
जोडणारे त्याचे मित्रच असतात.
मैत्री शायरी मराठी – Friendship quotes in marathi
प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते
मर्यादेबाहेर गेलेली गोष्ट त्रास देते
मग ते प्रेम असो वा मैत्री
सहज म्हणता म्हणता त्याला मी
सगळं सांगत गेलो
भाव माझ्या मनाचे
असे मी मांडत गेलो.
#मैत्री
आयुष्याला नवीन वळण देणारी
खूप काही गोष्टी नव्याने शिकवणारी
आई वडिलांनंतर सर्वात जवळची वाटणारी
ती म्हणजे – “मैत्री”
अडचणीच्या काळात सल्ला नको असतो
हवी असते की साथ – मैत्रीची
तिमिरात असते साथ त्याची,
आनंदात त्याचा कल्ला असतो
अनुभवी आणि निरपेक्ष असा
माझ्या मित्राचा सल्ला असतो..!
मैत्री – एक नाते रक्तापलीकडचे
कुंडली न जमवता आयुष्यभर
साथ देणारे नाते म्हणजे मैत्री
जग कितीही सुंदर असु दे
आमच्यासाठी आमची मित्रच जग आहेत.
चुका होतात आमच्या मैत्रीत पण,
विश्वासघात कधी होणार नाही…
maitri quotes in marathi
आपल्या मैत्रीची आरसा पारदर्शक भासतो
मी पाहता आरश्यात मला तुझा चेहरा दिसतो
इतक्या वर्षात झालीच नाही तू तू मैं मैं असं नाही
पण त्यामुळे नातं झालं घट्ट याचा झाला फायदाही
काय चालले आहे माझ्या मनी तुला अचूक कळते
माझ्या मनाचे मोकळ होण्याचे ठिकाण तू असते
दोन क्षणाचा विसावा
दोन आत्म्याचा आरसा
दोन मन जुळती जेथे
तेथेच मैत्रीचा भरोसा
मैत्रीतले प्रेम आणि
प्रेमातील मैत्री कधीही गमावू नका
friendship quotes in marathi
अनोळखी अनोळखी म्हणत असतांनाच
एकमेकांची सवय होणे म्हणजेच मैत्री.
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण
निरंतर राहते ती मैत्री.
( फ़क्त मैत्री ✍ )
प्रेमालाही हेवा वाटावा अशी आहे आमची —- मैत्री
माझी लाडकी मैत्रीण
मला फक्त याच जन्मी नव्हे तर
प्रत्येक जन्मी तूच मैत्रीण
म्हणून हवी आहेस
मैत्रीच्या पलीकडे माझ्या मैत्रिणीचे गाव
पलीकडे असले तरी त्याला ‘मैत्री’ च नाव
चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
मैत्री शायरी मराठी
मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना
ओठांवर हसू आणेन
तुला विरोध करणाऱ्या
प्रत्येकाशी माझे भांडण असेल.
मैत्रीण..
आहेस जरी तू बुद्धीने मंद
झालीस तरी तू हृदयातून बंद
शतजन्म टिकू दे आपले हे ऋणानुबंध
दरवळू दे सदैव हा मैत्रीचा निशिगंध
जिथे आपल्या भावना व्यक्त करता येतात
जिथे आपली दुखे मानमोकळेपणाने स्वीकारली जातात
ते हक्काचे स्थान म्हणजे मैत्रीण
नखरे करण्यात दोन लोक कधीच सुधारणार नाहीत
एक ‘मी’ आणि दुसरी ‘माझी मैत्रीण’ ??
मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी
वाटेल कधी न कोसळणारी
पण नात्याला कायम साथ देणारी
सगळ्या भावनांना जिथे मोकळ्या मनाने
स्वीकारल जातं ते नातं आमच्या मैत्रीच…
friendship quotes in marathi
तर मित्रहो हे होते मैत्री शायरी मराठी व friendship quotes in Marathi. आशा करतो मैत्री स्टेटस मराठीत देण्यात आलेले मैत्री शायरी आपणास आवडल्या असतील. हे friendship status in marathi आपण व्हाटसअप्प, फेसबूक व सोशल मीडिया वर स्टेटस म्हणून वापरू शकता. मैत्री शायरी मराठी आपण आपल्या प्रिय मित्राला देखील पाठवू शकतात. हे संदेश वाचून तुमच्या मैत्रित आणखी वाढ नक्की होईल. धन्यवाद
अधिक वाचा :
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..