मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश | Marathi bhasha Din Quotes, shubhechha, Wishes

मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा संदेश व मराठी भाषा दिन शुभेच्छा – Marathi Rajbhasha Din

Marathi Dinachya Shubhechha : आपल्या देशात दरवर्षी मराठी राजभाषा दिवस 27 फेब्रुवारी ला साजरा केला जातो. मराठी ही आपली मायबोली आहे हीचा सन्मान व संवर्धनासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. आजचे मराठी चे स्वरूप फार बदलले आहे. महाराष्ट्रात राहूनही अनेक मराठी लोक मराठी ला दुय्यम दर्जाची भाषा समजतात. मराठी चे हे बदललेले स्वरूप पाहता मराठी च्या पुनः उत्थानसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

आजच्या या लेखात आपण मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा चारोळ्या संदेश – Marathi bhasha dinachya hardik shubhechha पाहणार आहोत. हे मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश आपण आपले नातेवाईक व मित्रमंडळींना सोशल मीडिया वर पाठवून मराठी दिवस साजरा करू शकतात तर चला सुरू करूया.

Marathi bhasha dinachya hardik shubhechha sandesh

मराठी भाषा दिन शुभेच्छा

माझ्या मराठीची कास
तिला नावीन्याची आस
तिच्या अस्तित्वाचा भास
काय वर्णावे..!

मराठी माझी जात!
मराठी माझा धर्म!
मराठी माझी माती!
मराठी माझं रक्त!
मराठी माझी शान!
मराठी माझा मान!
मराठी माझा राजा!
जय शिवराय

माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी

मराठी भाषा दिन शुभेच्छा

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मंदाध तख्त फोडते मराठी
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

MARATHI BHASHA DINACHYA HARDIK SHUBHECHHA

माय मराठीचा आम्हास असे अभिमान
सर्वांना दिले तिने शब्दांचे अमोघ दान
कधी न विसर पडो तिचीया वांङमयाचा
सदैव निनादत राहो गजर मराठीचा

खिडक्या हवेत बांधता येत नाहीत
त्यासाठी आधी घर बांधायला हवं.
मुलांना इंग्रजी जरूर शिकवा,
शिकवायलाच हव पण त्यांचा मराठीशी,
मायभाषेची असलेला संबंध तोडू नका.
तो तुटला तर ती देशात
राहूनही परदेशी होतील
-कवी कुसुमाग्रज

Marathi Dinachya Shubhechha

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रुजवू मराठी फुलवू मराठी
चला बोलू फक्त मराठी
मराठी दिनाच्या शुभेच्छा

मराठी
जिने आपल्याला घडवले
आता तिचे अस्तित्व टिकवणे
आपल्या हातात आहे
आग्रहाने मराठी चाच वापर करा..!

जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी दिनाच्या शुभेच्छा

मराठी भाषा दिन शुभेच्छा – marathi bhasha din wishes

Marathi bhasha dinachya hardik shubhechha

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Marathi Bhasha gaurav din shubheccha

माय मराठी! तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी,
क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय
Marathi bhasha dinachya hardik shubhechha

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्रीयांचा अभिमान मराठी
भारताची आहे शान मराठी
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी आमची बोली
अथांग तिची खोली
काय वर्णू तिची गोडी
अमृतासमान
नव्या रक्ताला
देऊन अनुभवाची जोड
जगात नसेल माझ्या
मराठीला तोड
आज सर्वासंगे चालतेय
प्रगतीची वाट
उद्या सूर्य उगवेल घेऊन
नव्या जगाची पहाट

माझा मराठी चा बोल कौतुके।
परि अमृताते हि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।।१४।।

मराठी भाषा दिन शुभेच्छा

Marathi bhasha dinachya hardik shubhechha

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अभिमानाने बोलूया मी मराठी
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्व
महाराष्ट्रीयन जनतेला हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र जय मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
मराठी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

Marathi Rajbhasha din quotes

मराठी भाषा दिन शुभेच्छा

भाषेचा गोडवा साखरेहूनी फार,
मऊ मखमली असली तरी
शब्दांना तिच्या धार,
वळवावी तशी वळते
सहज सगळ्यांना कळते.
भाषेची आमच्या श्रीमंती अपरंपार

माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्र्यात आहे, भविष्याचे वरदान
महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्ञानोबांची तुकायची मुक्तेशांची जनाईची,
माझी मराठी गोडी रामदास शिवाजीची

Marathi bhasha dinachya hardik shubhechha

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी असे आमची मायबोली जरी आज
ही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे.

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

marathi rajbhasha din

आपला मान मराठी
आपली शान मराठी
जगण्याचा ध्यास मराठी
महाराष्ट्राचा श्वास मराठी

श्वासातील झिंग मराठी
जगण्याचा थाट मराठी
या संस्कृतीच्या पदराचा
जरतारी काठ मराठी

जगण्यासाठी जिंकण्यासाठी
इतर भाषांची गरज असेलही जरी
पण ठेच लागल्यावर ‘आई ग’
म्हणतो तीच असते आपली भाषा खरी.
Marathi bhasha dinachya hardik shubhechha

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी मातीला नका म्हणू हीनदीन
स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान
मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी भाषा दिन शुभेच्छा

माझी माय मराठी
खास आहेस आमच्यासाठी
जितकी गोडी तुझी वाटावी
तितकी नाती तू जोडावी
ताकत ही तुझ्या मधील
अवर्णनीय आहे
संपूर्ण जाणले तुला तरी
ओढ तुझी कायम आहे

Marathi bhasha dinachya hardik shubhechha

मान आहे भाषेचा आपल्या मनी,
शुभेच्छा तुम्हास मराठी भाषा दिनी

दरी-खोर्‍यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी…मी मराठी!
मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी आहे आपली शान
चला वाढवू तिचा मान
मराठी आहे आपल्या श्वासात
ठेऊ तिला जीवनाच्या ध्यासात
हिंदी इंग्रजी आहे भविष्याच्या गरजा
त्यात कमी न होऊ देऊ मराठीचा दर्जा

marathi bhasha din charolya

मराठी भाषा दिन शुभेच्छा

मराठी आमची वेदना, मराठी आमचे गान
मराठी आमची चेतना वाणी चे शुभ वरदान

विश्वाच्या पटलावरती
डौलात फडके पताका मराठी
मायभूमीच्या अस्मितेची,
पालखी वाहतो स्वाभिमान मराठी

मन मराठी.. भावना मराठी,
जग जिंकण्या बाणा मराठी..
ओळख मराठी.. रक्त मराठी
वंदावी नित्य राजभाषा मराठी
जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा

मराठी भाषा दिन शुभेच्छा

पानिपत

विश्वास पाटील लिखित मराठे – दुराणी साम्राज्यात झालेल्या उद्धाची
चित्तथरारक ऐतिहासिक कादंबरी- पानिपत

या लेखात आपण मराठी भाषा दिन शुभेच्छा संदेश संदेश पाहिले. हे Marathi bhasha dinachya hardik shubhechha संदेश आपणास आवडले असतील अशी आशा आहे. आपण हे शुभेच्छा संदेश कॉपी करून आपले मराठी भाषिक मित्र व प्रियजणांना शेअर करून मराठी भाषा दिन शुभेच्छा देऊ शकतात. या शुभ दिवशी आपल्या द्वारे शेअर करण्यात आलेले marathi bhasha din wishes, शुभेच्छा संदेश व चारोळ्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नक्की प्रयत्न करतील आशा आशा व्यक्त करतो. धन्यवाद..

READ MORE

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Shares