मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा | New Born Baby Girl Wishes in Marathi & Mulgi Zali Abhinandan Shubhechha

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा | New Born Baby Girl Wishes in Marathi & Mulgi Zali Abhinandan Shubhechha | मुलगी झाली शुभेच्छा संदेश – mulgi zalya baddal abhinandan sms in marathi

मित्रांनो घरात नवीन बाळाचा जन्म होणे की कुटुंबियांसोबतच, मित्र परिवार आणि नातेवाईक मंडळींसाठी देखील आनंदाची बाब असते. आणि जर घरात कन्या रत्नाची प्राप्ती झाली असेल तर मग गोष्टच निराळी. आजच्या काळात मुलगी जन्माला येणे म्हणजे लक्ष्मीचाच जन्म होणे होय. अशा या मुलीच्या जन्माबद्दल तिच्या आई वडिलांना योग्य शुभेच्छा पाठवणे व त्यांना अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या लेखात आम्ही आपल्यासाठी मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहोत. या लेखातील New Born Baby Girl Wishes in Marathi आपण मुलगी झालेल्या दाम्पत्याला पाठवू शकतात आणि त्यांच्या आनंदात आणखी वृद्धी करू शकतात. तर चला सुरू करूया..

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – New Born Baby Girl Wishes in Marathi

Mulgi Zali Abhinandan Shubhechha

आईच्या गर्भात अशा स्वर्गात
अर्भक म्हणूनी जगते ती…
कन्यारत्न म्हणूनी मायेच्या
कुशीत नीजते ती…

चैतन्याचे रुप तुळशीवृंदावन
पावित्र्याचे अलंकार पेलते ती…
पावसाची सर आनंदी मृदगंध
मनामनात पेरते ती…

ऋतुंसारखी बहरते ती
सुमनासारखी फुलते ती…
वंशाचा घट्ट धागा ती
नात्यांची विण ती…
निसर्गाची सुंदर निर्मिती

स्वर्ग ही फिका आहे
या सुखापुढे
लेक घेऊन आनंदी
आनंद चोहीकडे

अहो भाग्य हे आमचे
नशिबी लेक दिली
इवल्या पावलानी
सोनपरी आली

सुखाची ओंजळ भरली
आज धन्य झाली
भाग्य थोर उजळले
मला मुलगी झाली

वाचा> मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

Mulgi Zali Abhinandan Shubhechha

मुलगी होणं म्हणजे आयुष्याचे सार्थक आहे. तिचे सोबत असणे म्हणजे कळ्यांचे हसणे जणू.

मागच्या जन्माचे पुण्य म्हणावे
की अहो भाग्य माझे
माझ्या नशिबी लिहिले देवाने
निखळ हास्य तुझे

आयुष्याची गोड सुरवात म्हणजे मुलगी
जगण्याची परिकथा होणं म्हणजे मुलगी

New Born Baby Girl Wishes in Marathi

आजी सोनियाचा दिनु
जसे चांदणे हे खुले
घरी आली लक्ष्मी
अंगणी पारिजाती फुले

बापाचे मन हळवे होते
मयुराचे पान होते
लेकीच्या सहवासात
आयुष्याचे गाण होते

जेव्हा तिचे अल्लड हसणे
घरात निनादते
लेकीच्या पावलानी
घराचे गोकुळ होते

सुख माझे गगनात मावेना कारण आज माझी लक्ष्मी माझ्या घरी आली. आज माझे मन भरून पावले.

हे सुख अनुभवणे म्हणजे स्वर्गीय आहे. आपल्या ओंजळीत असलेले हे नाजूक फुल सदा बहरते राहावे.

गोंडस तुझे रूप
डोळे लुकलुकणारे
परी माझी सौख्य
जसे गगनातले तारे

परीकथा आज माझी
पूर्ण तू केली बाळा
लेक माझी आहे
अवघा मायेचा लळा

लेकीचा जन्म म्हणजे आयुष्यातला सुखद क्षण.
देवाचे दान हे आजन्म जपणार आहे .

मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा

आज घर हे माझे भरले आहे
परीच्या येण्याने गोकुळ झाले आहे.

तार्‍यांचे तोरण करावे
की फुलांची व्हावी वर्षा
आनंदाचे उधाण परी
कारण माझ्या हर्षा

लेकीचे असणे म्हणजे
देवाचे दान आहे
पुण्याईने लाभले हे
लक्ष्मीचे वाण आहे

Mulgi Zali Abhinandan Shubhechha

ऋतुंसारखी बहरते ती
सुमनासारखी फुलते ती…
वंशाचा घट्ट धागा ती
नात्यांची विण ती…
निसर्गाची सुंदर निर्मिती …
म्हणजे मुलगी..!

तर मित्रहो या लेखाद्वारे आही आपल्यासोबत काही उत्तम असे मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा संदेश शेअर केलेत. आशा आहे आपणास हे New Born Baby Girl Wishes in Marathi आवडले असतील. या पैकी आपले आवडीचे mulgi zalya baddal abhinandan sms in marathi आपण शेअर करू शकतात. वेबसाइट ला भेट दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार…

Read More

Shares