लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | First Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे सुंदर शुभेच्छा संदेश – First Marriage Anniversary Wishes in Marathi मित्रांनो लग्न हे फक्त दोन मनांचे मिलन नसून दोन कुटुंबांचे मिलन असते. जर आपल्याही कुटुंबात अथवा मित्र परिवारात नुकतेच कोणाचे लग्न झालेले असून त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यात असेल, तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. जर आपण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश शोधत असाल आणि आपल्या प्रिय व्यक्तींना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर हा लेख शेवट पर्यन्त नक्की वाचा.

या लेखात काही उत्तम आणि युनिक असे First Marriage Anniversary Wishes in Marathi देण्यात आलेले आहेत. तर चला सुरूवात करूया..

Note: अतिशय अल्पदरात लग्न वाढदिवस शुभेच्छा देणारे सुंदर बॅनर बनवण्यासाठी पुढील whatsapp क्रमांकावर संपर्क करा. 👇

First Marriage Anniversary Wishes in Marathi

बंध तुमचे प्रेमाचे
धागे विणले आनंदाचे
नाते तुमचे आपुलकीचे
पहिल्या लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहून सुंदर तुमचं जगणं
सुंदर आपलं नातं आणि नात्याहून सुंदर वागणं
एकमेकांना एकमेकांची साथ अशीच जन्मोजन्मी राहो
तुम्हा दाम्पत्यांना सगळं सुख मिळत राहो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

अनमोल नात्याची अनमोल विन
सुंदर क्षणांची गुंफली रिबीन
नात्यात तुमच्या असाच बहर वाढत जावो
लग्न वाढदिवस आपल्याला आनंदाचा जावो लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

प्रेमाचं नातं आपलं असंच वाढत जाईल
आनंदाच्या सरिता आयुष्य तुमचं भिजत राहील
सुखाचा सडा सदा अंगणी उत्कर्षाचे गीत गाइल
तुम्हाला एकमेकांची साथ साथ जन्मो जन्मी घडो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

नातं तुमचं जन्मोजन्मीचं असंच फुलत राहो
प्रेमाच्या गाठीचं नातं असंच बहरत जावो
सर्व इच्छा तुमच्या पूर्णत्वाला जावो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

लग्न वाढदिवस तुमचा आनंदात जावो
तुम्हा दोघांच्या जीवनात सुख आणि समाधानी येवो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

वैवाहिक जीवन तुमचा आनंदात जावो हीच मागणी देवाकडे
आपले जीवन बहरत जावो अंगणी पडो सुखाचे सडे
लग्न वाढदिवसाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा

तुम्हा दोघांमधला आनंद सतत वाढत राहो
हेच देवाकडे मागणं आमचं
आनंदाच्या क्षणांनी भरून जावं जीवन तुमचं
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा

तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य असच फुलत जावं
दोघांना एकमेकांच्या साथीने प्रत्येक सुख मिळत जावं
येणारा प्रत्येक दिवस तुम्हा दोघांना आनंदात जावो
देवाकडे मागणी हीच तुम्ही आनंदात राहो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

माझ्या जीवनातील खास व्यक्तीमध्ये सर्वात वरती तुम्ही आहात
तुम्हा दोघांच्या आनंदात आम्ही सामील आहोत
तुमचं प्रेम असच दिवसेंदिवस वाढत राहो हीच इच्छा
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

First Marriage Anniversary Wishes in Marathi

First Marriage Anniversary Wishes in Marathi

स्वप्नांसारखे जीवन तुमचे
तुमच्यासारखे स्नेही म्हणजे भाग्य आमचे
तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

अशीच मिळावी तुम्ही एकमेकांना एकमेकांची सात जन्माची साथ
आयुष्याच्या अनंत पर्यंत राहो एकमेकांच्या हातामध्ये हात
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुम्ही असंच सोबत राहा एकमेकांच्या हीच इच्छा
सगळी तुमची स्वप्न पूर्ण हो तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सुखाची भरती येवो तुमच्या सागरा
आनंदाचे वारे वाहो तुमच्या दारा
उत्कर्ष तुमचा पोहोचवो उंच उंच नभी
साथ तुमची राहो अशीच जन्मोजन्मी
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभ

एकमेकांना आयुष्यभर अशीच साथ द्या
सुखात आणि दुःखात एकमेकांना आधार द्या
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

लग्नाच्या बिडी ने बांधलेले बंधन असंच जन्मोजन्मी टिकावं
तुम्हा दाम्पत्यांना जीवनात सगळे सुख मिळावं
दरवर्षी असाच तुमचा लग्न वाढदिवसात आम्ही शुभेच्छांच्या रूपानं सोबत राहावं
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

ऐश्वर्याचे लेणं तुमच्या जोडीला असंच मिळावं
प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळून जगणं उत्कर्षाकडे जावं
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वर्ग सुखासारखं फुलावं तुमचं जीवन
सुगंधी साड्या प्रमाणे सुवासिक हो तुमचे जीवन
अशीच दोघं सोबत राहून जगावं तुम्ही तुमचं जीवन
लग्न वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
First Marriage Anniversary Wishes in Marathi

बंध तुमचे रेशमाचे
लग्न नात्यात गुंफले जीवन तुमचे
लाभो आयुष्य तुम्हाला भरभराटीचे
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

प्रेम तिथे जगणं आहे
अशा प्रेमळ व्यक्तीसाठी एक मागणं आहे
सगळं सुख तुम्हाला मिळो हीच प्रार्थना आहे
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा

क्षणाक्षणाला आठवणींची गोडी
सगळ्यात साजरी तुम्हा दोघांची जोडी
सुखाच्या किनाऱ्याला लागो तुमच्या जीवनाची होडी
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

First Marriage Anniversary Wishes in Marathi

तुमच्या प्रेमाला सुखाची पालवी फुटू दे
तुमचा आनंद गगनाला भिडू दे
तुमच्या नात्याची वीण अजून घट्ट होऊ दे
तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तुमच्या जगण्याला सुखाची पालवी फुटू दे
मागितलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू दे
लग्न वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आकाशातला चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्यातलं नातं असं टिकून राहो
आज सारखे अनेक लग्न वाढदिवस तुमचे आनंदात जावो
लग्न वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुम्हा एकमेकांना एकमेकांची मिळो
आयुष्य जगत असताना सगळी सुख वार्ता तुम्हाला कळो
सगळ्या दुःख तुमच्या जीवनातून दूर दूर पळो
लग्न वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सुंदर सुंदर जीवनात जोडीदार तसाच हवा
जगणं शेवटपर्यंत एकट्याने शक्य नाही कोणी सोबती हवा
धकाधकीच्या आणि धावपळीच्या जगण्यात प्रेमाने विचारपूस करणारा जोडीदार हवा
कुणाची सोबत मिळो अथवा न मिळो विश्वासाने साथ देणारा साथीदार हवा
लग्न होऊन तुम्हाला तसा साथीदार मिळाला
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

लग्न वाढदिवस म्हणजे जीवनातल्या प्रेमळ आठवणींचा दिवस
लग्न वाढदिवस म्हणजे सुंदर नात्यांची सुरुवात झालेल्या आठवणींचा दिवस
लग्न वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

तुमच्या प्रेमाचा वटवृक्ष असाच बहरत जावो
जोडीदार म्हणून एकमेकांची साथ अशीच मिळत राहो
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

First Marriage Anniversary Wishes in Marathi

नाती तुमची जन्मोजन्मीची
नाती तुमची अपार प्रेमाची
नाती तुमची रेशमाची
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

लग्न म्हणजे नातं भांडणाचं
लग्न म्हणजे नातं रुसण्याचं
लग्न म्हणजे नातं हसण्याचं
लग्न म्हणजे नातं प्रत्येक परिस्थितीत एकमेकांच्या सोबत असण्याचं
अशा या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा
ईश्वर तुम्हाला दीर्घायुष्य आणि आरोग्यपूर्ण जीवन देवो

रुसल्यानंतर समजून घेणार एक नातं असतं
जीवनातल्या खडतर प्रवासात आपल्याला सावरणारं एक नातं असतं
जिथे सगळं जग तुमची साथ सोडत तिथं आपल्या सोबत हक्काने उभा राहणार एक नातं असतं
ते नातं लग्नाच्या बेडीने अधिक घट्ट होत असतं
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

अगणित तार्‍यात शुक्रासारखा दुसरा चकाकणारा तारा नाही
अनेक व्यक्ती आमच्या जीवनात आहेत पण तुमच्यासारखी आपुलकीची दुसरी माणसं नाहीत
प्रेमळ माणसास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवा आणि वात असते जसे एकमेकांचे सोबती
दिवस आणि सूर्य जसे एकमेकांचे सोबती
रात्र आणि चंद्र जसे एकमेकांचे सोबती
तसेच असावे तुम्ही एकमेकास सोबती
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

जीवनात सगळी नाती महत्वाची असतात
परंतु शेवटपर्यंत प्रेमाने साथ देणारा साथीदार महत्त्वाचा असतो
तो तुम्हाला मिळाला तो शेवटपर्यंत सोबत तुमच्या राहावा हीच इच्छा
लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

नातं असावं ऊन सावली सारखं
नातं असावं दिवस आणि रात्री सारखं
नातं असावं जमीन आणि आकाशासारखं तसंच नातं तुमचं एकमेकांचं
लग्न वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

First Wedding Anniversary Wishes in Marathi

नव्या आयुष्याला सुरुवात
झाली होती सप्तपदीने
पाहता पाहता
वर्षंपुर्ती झाली प्रेमाने…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा💐

First Marriage Anniversary Wishes in Marathi

तुझ्या माझ्या संसाराला
…आणि काय हवे
कधी तू पुढे, कधी मी पुढे
असा करत वर्षा मागून वर्षं जावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

सुखी संसाराला दोन
प्रेमळ मन पुरे असतात
निरंतर या प्रवासात
एकमेकांचे हात हातात असतात
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

First Marriage Anniversary Wishes in Marathi
First Marriage Anniversary Wishes in Marathi

हॅलो , वरून सुरू झालेला
प्रवास….
अहो वर येऊन थांबला
अगं अगं म्हणत
लग्नाचा पहिला वाढदिवस आला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

प्रेमात होतो दोघे
भान नव्हते जगाचे
संसार सुरू झाला
मन जुळत गेले दोघांचे
अजून पुढे बरेच जायचे आहे
आता साजरे करू सुख
एका वर्षाचे….

तुझ्या संगतीने नव्या
आयुष्याला सुरुवात केली
समर्पण करून दोघांनी
संसाराची ज्योत वाढवली
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप 💐

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाची वर्षंपुर्ती
व्हायला लागत नाही वेळ
अनोळखी चेहरे
ओळखीच्या व्हायचा
असतो हा खेळ
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

तू दिलेले प्रेम
मी सहजतेने स्विकारले
कारण प्रेमाआधी तू
आदराने आयुष्यात आणले…
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

लग्नाचा तो दिवस
आज पुन्हा मला आठवला
दिवस खास होता तो
जो मी तुझ्या नावे केला
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

लग्न झाल्यावर
अस्तित्व स्वताचे
विसरायचे नसते
हातात हात देऊन
पुन्हा स्वतःला
भेटायचे असते
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

प्रेम तू ही केले होते
प्रेम मी ही केले होते
संसाराला आपल्या
सोबतीने सजवले होते
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोपं नसतं नव्या
घरात असे रमून जाणे
तू होता सोबतीला
म्हणून सहज
झाले हा संसार करणे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

प्रेमाला प्रेमाने बहरावयाचे असते
दोघांनी मिळून स्वप्न हे जगायचे असते
लग्न झाले ते मिळून जपायचे असते
असे कित्येक वर्षे साजरे करायचे असते
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

दोघांनी समजावून घेतलं
म्हणून घर आपले फुलले
माझ्या पाठीशी तू उभा होता
म्हणून एक वर्ष किती आनंदात गेले
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

थोडे माझे रूसणे
थोडे तुझे मनवणे
चालले वर्षभर
आज जसे आहोत
तसेच राहू आपण
जन्मभर…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

पाहता पाहता
बघं एक वर्ष झाले
नवरी म्हणून पाऊल
टाकले काल…
आता अर्धागिणी
म्हणून जंगले
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐

संसार दोघांनी मिळून
बहरावयाचे असते
कठिण प्रसंग आले
तेव्हा खंबीर उभे
राहून सामोरे जायचे असते

कित्येक गोड आठवणी
दिल्यात या वर्षाने
थोडं हसलो
थोडं रूसलो
तरी जगलो फार हर्षाने
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

क्षणोक्षणी असाच
गोडवा संसारातील
वाढत राहो…
शुभ लग्नाचा वाढदिवस
पुन्हा पुन्हा येत राहो

वचन घेतले होते सात जन्माचे
सोडणार नाही हातातला हात कधी
तू आली अलगद पावलांनी
जशी समुद्राला मिळते नदी
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

नाते हे विश्वासाचे
कधी तुटु नये
तुझ्या माझ्या संसाराला
नजर कधी लागू नये
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

प्रेमाचा धागा हा
कायम आपण टिकवू
स्वप्न दोघांचे
दोघांनी मिळून पुर्ण करु
आज पहिलाच वाढदिवस
आपल्या लग्नाचा…
पुढेही असेच वर्षानुवर्षे
साजरे करु
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

आपल्या संसारात
समर्पण दोघांचं असावं
प्रेमाचं उदाहरण
आपला संसार बनावं
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

सुख दुःखात
हात धरून राहू दोघांचे
स्वप्न डोळ्यातले
रंगवू आपल्या संसाराचे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

First Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अख्खं जग जरी सोबत नसले
तरी तुझी साथ पुरेशी आहे
कठिण प्रसंगात तु दिलेली
प्रेमळ हाक पुरेशी आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

अक्षदांच्या सरित नाहलो
तू माझी, मी तुझा झालो
प्रवास सुरू झाला जन्मभराचा
सोबतीने संसारात वाहतो

अनमोल आठवणींचा
दिवस तो खास होता
अतुट क्षणांच्या उधळण्याचा
लग्नांचा दिवस सुंदर होता
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

गाठ बांधली परमेश्वराने
दोन जीवांची
प्रेम भरुयात दोघे
वेचुयात फुले सुखांची
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

वाढदिवस लग्नाचा
आला आनंद घेऊन
एक वर्षाच्या
आठवणींना पुन्हा जगवू
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

मी विश्वासाने
हातात हात दिला
तू त्याच विश्वासाने
सहजच जपला
संसारात त्याग
संघर्ष दोघांनी केला
प्रेमरूपी संसार
छान बहरला…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

Also Read
👇👇

लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

तर मंडळी आशा करतो या लेखातील First Marriage Anniversary Wishes in Marathi आपणास आवडले असतील. आणि आपल्या प्रिय व्यक्तीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्यांच्यासोबत शेअर करण्यासाठी आपण उत्तम लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश शोधून काढल्या असतील. आपणास हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

Read More :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top