पाऊस कविता मराठी चारोळ्या – Rain Poems in Marathi : पावसाच्या धारा चराचरात आनंद पसरवण्याचे कार्य करीत असतात. आणि जेव्हा पावसाळ्यातील पहिला पाऊस येतो तेव्हा तर तो आनंद अतिशय वेगळाच असतो. अनेक कवी, शायर, गझलकार पावसाचे वर्णन वेगवेगळ्या सुंदर शब्दांमध्ये करीत असतात. पाऊस आल्याने चारही बाजूंना हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्याचे साम्राज्य निर्माण होते. जर पाऊस पडला नाही तर हे सर्व सौन्दर्य अनुभवण्यास कधीही येणार नाही.
पुढील लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम पाऊस मराठी कविता (rain shayari in marathi) आणि चारोळ्या घेऊन आलेलो आहोत. या लेखातील सर्व Rain poems in marathi wishmarathi च्या कवींद्वारे लिहिण्यात आलेले आहेत. आपण पावसाचे बरसणारे पाणी आणि गरमा गरम चहासोबत या कवितांच्या आस्वाद घेऊ शकता. सोबतच या कवितांना आपण सोशल मीडिया द्वारे शेअर देखील करू शकतात. तर चला rain quotes in marathi सुरू करुया..
Rain Poems in Marathi
आसवांपरी ढग बरसूनी यावे,
मनाच्या काळोखात जणू चांदणेच फुलावे,
भिरभिरणाऱ्या वा-यासवे गीत नवे प्रीतीचे गावे,
आसवांपरी ढग सारे ओसंडून यावे…..
या पावसांच्या सरी पाहता आजही ती जिवंत आहे,
चंद्र जरी लपला नभात तरी सौंदर्य तिचे निखळ आहे,
पाण्याच्या प्रवाहात या प्रतिबिंब तिचेच दिसत आहे,
मनरम्य वा-यात जणू लपला तिचाच स्पर्श आहे…..
जगण निरर्थक आहे,
यात कुठला अर्थ आहे,
शोधुनी बघ तु जरा,
विश्वात पावसाळा अजून जीवंत आहे……
Rain Poems in Marathi
मनाच्या गाभाऱ्यात जणू ऋतूंचे मेळेच भरावे,
स्वर्गाचे सुख सारे या भूमीवरी उतरावे,
नभीचे चांदणे सारे पाऊस येता लुप्त व्हावे,
चांदण्यांच्या विरहात जणू चंद्रानेही अश्रू बरसवावे…..
दुःखातील दुःखेल्याला पाऊस जणू सखा सोयराच आहे,
कोण म्हणतं पाऊस फक्त प्रीतच बरसवतो,
विरहातील कित्येकांच्या अश्रुंचे जणू तो किनारेच तोडतो,
ओसंडून दुःख वाहायला टिपुसांचे कारणही देतो,
विरहातील कित्येकांच्या अश्रुंचे जणू तो किनारेच तोडतो…..
वाचा>> वि स खांडेकर यांचे विचार मराठी
पाऊस कविता मराठी
कौल पावसाचा साद मनी छेडतो,
झालेल्या जखमांवरी निसर्गाच औषध लावतो,
हिरवळीचे नजारे हे कोण भुमीवरी या पेरतो,
मंद झुळूकेच्या चाहूलीने मनाची स्पंदन छेडतो…..
थांबण्याचे तुला मी आग्रह करावे,
तेवढ्यात पावसाचे आगमन व्हावे,
वेड्या या प्रियकराला अजून काय हवे,
सोबतीचे आणखी चार क्षण तुझ्या सवे घालवता यावे……
rain quotes in marathi
मनाच्या दुष्काळात टिपूस पावसाचे पडावे,
उधाणलेल्या वा-यासवे मी ही बेभान व्हावे,
सुख, दुःख विसरून सारे,
अर्थ जगण्याचे निसर्गात शोधावे……
तु जर थांबणार असशील,
तर पाऊस मी ही झालो असतो,
वा-याच्या वेगात तुझ भोवती मी ही फिरलो असतो,
हृदयाचे थेंब करूनी प्रेमरूपी तुजवरी बरसलो असतो……
Rain Poems in Marathi
मन दुःखाने नहावे,
त्यात नभ हे बरसावे,
शब्द वेड्या या कवयित्री ने,
लिखाणास अजुन कुठले कारण शोधावे…
वाचा> प्रेम शायरी मराठी
रिमझिम सरीत या,
मन वेडे सुपीक व्हावे,
आनंदाचे भरघोस पीक,
या अंतःकरणावरी डोलावे…….
कष्टकरी देहाचे या,
मृदेमधी मिसळन व्हावे,
पावसाचे काही टिपूस मिळूनी,
मृदेवरी त्या वृक्ष फुलावे…..
पाऊस मराठी शायरी संदेश | rain shayari in marathi
पर्णांची हिरवळ ही,
नाचवते या वेड्या मनाला,
क्षण भंगुर आयुष्यात माझ्या,
नवे अर्थ देते जगण्याला…..
पाऊसाचे थेंब,
जणू मोतींचे हार,
धरतीवर पडतात,
आणि आनंद पसरवतात दिशा चार.
आज पावसात भिजून,
आठवणींना उजाळा दिला,
बालपणीचा तो आनंद
आज पुन्हा अनुभवला
Rain Poems, quotes & Shayari in Marathi
हलकेसे नभ बरसावे,
त्यात सुर्यनारायण प्रसन्न व्हावे,
अन् इंद्रधनुचे चित्र नभावरी उमटावे,
आयुष्याचे अर्थ सारे त्या सप्तरंगात पहावे…..
काळोखाचे नभ येता,
आनंदाच्या सरी बरसतात,
भिजवूनी अंगण सारे,
मनी प्रेमळ ओलाव्याची मुळ घट्ट करतात…..
वाचा> मैत्री शायरी मराठी
क्रोध येता पावसापरी बरसावे,
क्षण सरता झुळूकी प्रमाणे हळुवार लुप्त व्हावे,
मंद गार वा-यासवे सुमधूर गीत गावे,
निसर्गाच्या किमये सम सतत मानवाने फुलत रहावे…….
नात्यांच्या दुष्काळात या प्रेमाच्या सरी बरसाव्या,
कधी फुल, कधी पक्षी होऊनी सिमा सा-याच मोडाव्या,
असं अबोल्यात राहुन कोणाच भल झालं का?
कोरड्या रानाकडे सांगा पाखरू तरी आलं का??….
जीवंत असूनी मरणाच्या यातना नको,
दुष्काळाच्या क्षणी मात्र अतिवृष्टीचा पुर नको,
दोन्हीचे समतोल आयुष्य फुलवतात,
त्यात मुळीच वादळाचे भय नको…..
मैत्रीही नभ आणि पावसा सम असावी,
हृदय नभाचे दाटले की पावसाने येऊन ते मोकळे करावे,
विजेचे कडकडाट ही दोघांने हसत हसत सहन करावे,
जगावे तर असे जगावे ऋतूंसम चिरकाल अमर व्हावे…..
मी पाहिलंय कित्येकांना पाऊसात चालताना,
मनातील दुःख सारे पावसाशी बोलताना,
अश्रुंचे पुर सारे हास्यात चालाकीने लपवताना,
आयुष्यातील दुःख सारी विसरून पावसात मनसोक्त नाचताना…..
कवयित्री: साक्षी कांबळे.
Rain Poems in Marathi या लेखात खास आमच्या वाचकांसाठी काही उत्तम पाऊस कविता मराठी व पाऊस चारोळ्या समाविष्ट केल्या आहेत. आशा आहे आपणास हे सर्व कविता आणि शायरी संदेश आवडले असतील. Rain quotes in marathi आपणास कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. याशिवाय wishmarathi या आमच्या वेबसाइट वर विविध विषयांवरील कविता आणि शुभेच्छा संदेश आपणास मिळून जातील. यासाठी आमच्या साइट ला नक्की भेट देत रहा. धन्यवाद..
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..