100+ प्रेम शायरी मराठी | Marathi Shayari on Love

प्रेम शायरी मराठी – Marathi Shayari Love : प्रेमाचा स्पर्श सुखद अन् अल्हाददायक असतो. प्रत्येक व्यक्ति आपल्या आयुष्यात आणि विशेष करून तरुण वयात कधी न कधी प्रेमात नक्कीच पडतो. प्रेमात पडलेला व्यक्ति आपोआप प्रेम कविता व प्रेम शायरी करू लागतो. परंतु जर प्रयत्न करूनही आपणास कविता सुचत नसतील तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी काही उत्तम प्रेम शायरी मराठी (Marathi Shayari Love) घेऊन आलेलो आहोत.

या Prem Shayari आपण आपल्या पार्टनर सोबत तसेच सोशल मीडिया वर शेअर करू शकतात. ह्या प्रेमाच्या शायरी वाचून तुमचा पार्टनर पुन्हा एकदा नव्याने तुमच्या प्रेमात पडू लागेल. मराठी प्रेम कविता व प्रेम शायरी वाचून आपल्या प्रेमात नक्की वृद्धी होईल अशी आशा आहे. तर चला marathi shayari love ला सुरुवात करूया…

marathi shayari love

Writer : हरिश गोसावी

प्रेम शायरी मराठी फोटो

सखे सावरून घे तुझ्या हळव्या मनाला
सुरुवात करतोय मी आज
त्या प्रत्येक क्षणास हेरायला..!

माझ्या हृदय स्पंदनांनी
हेरल्या त्या आठवणी…!
ज्या येई वेड्या मनी
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी

सखे, पाणावतात गं डोळे क्षणा क्षणाला..!
अन् पाणी घालतात
त्या आठवणीच्या वृक्षाला..!

Marathi Shayari on Love image

आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!

पाहुनी तुझ्या नशेल्या नजरेचा इशारा
नकळतच वाढल्या तुझ्या घरापुढच्या चकरा

तुझ्याशी बोलताना माझे मी भान राखू लागलो
प्रेमाचा गुलकंद फुलवण्यासाठी
आणखी जवळीक साधू लागलो..!

रूप तुझे पाहता राधे,
वेडे मन झाले दंग
साथ तुझ्या प्रेमाची
मला देशील का सांग?

Marathi Shayari on Love image

झाली एकदाची मैत्री
अन् भावना जुळल्या
गुलाबाच्या पाकळ्या दोघांनी
एकमेकांना दिल्या
Marathi Shayari on Love

मी प्रेम केले तुझ्या अंतकरणावर
मी प्रेम केले तुझ्या भोळ्या भाबड्या मनावर
मी प्रेम केले तुझ्या काजळी डोळ्यांवर
मी प्रेम केले तुझ्या सोनेरी केसांवर
मी प्रेम केले तुझ्या रसरशीत ओठांवर
मी प्रेम केले तुझ्या सावळ्या देहावर
मी प्रेम केले तुझ्या मधुर बोलीवर
मी प्रेम केले तुझ्या स्मित हास्यावर

Marathi Shayari on Love image

कसं सांगू किती प्रेम आहे तुझ्यावर,
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर.

तुझ्या केसात लावलेला तो फूल सुगंध
मनी भरतातच करी मला बेधुंद..!

तुझ्यासोबत घालवलेला तो क्षण
आज हुरहूर्तय हे भावनिक वेडे मन

दोघांच्या ओठांनी घेतलेला प्रेम श्वास
नकळत बोलून जाई I Luv U शब्द खास

त्यागाचे दुसरे नाव म्हणजेच “प्रेम” होय.

Writer : Manpakhru

मोडक्या माझ्या शब्दांची प्रिये
तूच अर्थ काठी आहे
ते गुलाब ठेवून दे बाजूला
हा चाफा तुझ्याचसाठी आहे.
Marathi Shayari on Love

प्रेम शायरी मराठी

Marathi Shayari on Love

लग्नात त्याचा कान पिळल्यावर
ती बरीच व्याकूळ झाली होती
सुखदुःखात सोबत देण्यासाठी
ती त्याच्या आयुष्यात आली होती.

कार घरी असूनही
गाडीवर तिला जायचे होते
खांद्यावरती हात ठेवून समजून मला घ्यायचे होते

तू बाल्कनीमध्ये उभी राहून
आकाशाकडे पाहतांना,
एक चित्र
माझ्या लक्षात राहिले होते
पूनवेच्या त्या सायंकाळी,
जणू चंद्राने चंद्राला पाहिले होते.

परवा जेव्हा संवाद घडला,
त्याने विचारले प्रेम किती आहे?
हसण्यात तिच्या उत्तर होते,
मग सांगण्यात कसली भीती आहे.

केसांची बट मागे सारतांना,
मनात मोहोर फुलला होता
हास्य तुझे पाहताक्षणी
ती चंद्रसुद्धा खुलला होता.

सोबत वेळ spend करण्याचा
स्वभाव तुझा जाणवला होता.
माझ्या घड्याळात अडकलेली
ओढणी काढतांना,
तू अख्खा तास घालवला होता
Marathi Shayari on Love

आयुष्यात तिची बेरीज होताच
निराशा सारी वजा होते.
नाही! नाही! म्हणूनसुद्धा
भेटण्यात एक वेगळीच मजा असते.

मित्रांनो आजकालची जोडपी
एकमेकांना सोडून राहत नाहीत
पिक्चरला तर जातात दोघे एकत्र
पण पिक्चर दोघेही पाहत नाहीत

आमच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरिता
मित्र माझे उभे राहिले होते.
“वहिनी” म्हणतच हळूच तिने,
मागे वळून पाहिले होते.

रात्री झोपेपर्यंत काल मी
तिच्यासाठीच कण्हत होतो.
झोपल्यावरही स्वप्नांमध्ये,
तिच्याच कहाण्या म्हणत होतो.

प्रेम शायरी मराठी

एकत्र पडतील पावले आपलीही,
तू सोबत चालून तर बघ.
अगं वेडे,
पुन्हा नव्याने प्रेमात पडेन मी,
तू एकदा साडी घालून तर बघ.

डोळ्याला डोळा भिडला होता
सजन प्रेमात पडला होता.
गजर वाजताच समजले त्याला
प्रसंग हा स्वप्नात घडला होता

लपूनच लिहितो कविता तिच्यावर
भावनांवर त्याचा ताबा होता.
रात्री निवांत झोपायची ती
तो मात्र तिच्या आठवणीत जागा होता

जुन्या फांद्यांचा गुंता झटकून,
नव्या पालविला धरून पाहावं.
स्वतः ला दोष देण्यापरी
नव्याने प्रेम करून पहावं.

ओळख जरी जुनी तरी,
भेट मात्र नवी आहे.
आता नातं काहीही असलं तरी,
आयुष्यात ती हवी आहे.

एक अख्खा तास बाजारात फिरून
ते फुलपाखरु मिळाले होते
धाकधूक माझी झालेली पाहुनी
माझे प्रेम तिला कळाले होते.

प्रेम शायरी मराठी

त्या दिवशी तिला साडीत पाहून
एक वेगळीच हुरहूर दाटली होती
असेल ना कायम ती सोबत आपल्या
हीच भीती मनात दाटली होती.

दुर्जनांकडे वळले नाही,
सज्जनांना मिळले नाही
चितेवरही जळले नाही
“प्रेम”
कोण कळले नाही.

तर मित्रहो ह्या होत्या काही उत्तम मराठी प्रेम शायरी – marathi shayari love. आशा आहे या लेखातील मराठी कविता प्रेमाच्या आपणास आवडल्या असतील जर याशिवाय आपल्याकडे देखील आणखी काही Marathi Love Shayari / Poem असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये सांगा. धन्यवाद..

अधिक वाचा :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top