सहकर्मियांना वाढदिवस शुभेच्छा संदेश | Birthday Wishes for Colleague in Marathi

Birthday Wishes for Colleague in Marathi : ऑफिस कोणतेही असो तेथे अनेक लोक कार्यरत असतात. जर आपण कोठे जॉब वैगरे करीत असाल तर आपणास याचा अनुभव आलेलाच असेल. सोबत काम करणारे सहकर्मी हे वयाने मोठे म्हणजेच सीनियर आणि बऱ्याचदा वयाने लहान म्हणजे जूनियर देखील असतात. परंतु असे असले तरी सहकर्मियांचे एकमेकांसोबत चे संबंध मित्राप्रमाणेच असतात.

आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी सहकर्मियांना वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश – Birthday Wishes for Colleague in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे birthday wishes for employee in marathi आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या जन्मदिनी शेअर करू शकतात.

Birthday Wishes for Colleague in Marathi

Birthday Wishes for Colleague in Marathi

या ऑफिसमध्ये आल्यापासून तू मला समजून घेतलं आहे
माझ्या कामात सतत मला मदत आणि मार्गदर्शन केलं आहे
तुझ्यासारखा सहकारी भेटणं म्हणजे माझं नशीब आहे
सहकार्याला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

ऑफिस म्हणजे एक प्रकारे आपलं घर आहे
सहकारी तू मला मी नवीन असूनही फार समजून घेतलं आहे
त्या सहकारी मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ऑफिसमधलं प्रत्येक काम कौशल्या न करणाऱ्या
आणि आपल्या प्रत्येक सहकार्याला समजून घेणाऱ्या
कुणावर संकट आली तर धावून जाणाऱ्या
सहकार्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday Wishes for Colleague in Marathi

Birthday Wishes for Colleague in Marathi

मित्राचा आधार मला प्रत्येक वेळी असतो
सहकारी तू ऑफिस मधला पण मला भावासारखा भासतो
त्या ऑफिस सहकार्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ऑफिस मधल्या प्रत्येक कार्यात मला भक्कमपणे पाठिंबा देणाऱ्या
माझ्या सहकाऱ्याला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

या शहरातल्या निर्जीव वातावरणात ऑफिसमध्ये तुम्हाला आपल्या माणसात धरतो
म्हणून तर माझा जीव तुझ्यात बसतो
त्या माझ्या जीव लावणाऱ्या सहकार्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमक यावी तुझ्या आयुष्यात
चांदण्यांची आरास व्हावी तुझ्या जीवनात
मी नशीबवान आहे तुझ्यासारखा सहकारी मिळाला मला माझ्या जीवनात
वाढदिवसाच्या सहकारी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

दीर्घायुष्य आणि प्रगती तुझ्या सतत पदरात पडो
सहकारी तुझा सहवास मला असेच पुढचे जन्म ही घडो
ऑफिस सहकार्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

संकल्प तुझे नवे नवे पूर्तीस जावे
तुझ्यासारखा सहकारी म्हणजे जीवाला जीव द्यावे
त्या मनमिळाऊ सहकार्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होवोत
तुला तुझ्या जीवनात सगळे सुख मिळोत
तूच सहकारी म्हणून पुढची बरीच जन्म मला मिळोत
वाढदिवसाच्या सहकार्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes for Employee in Marathi

birthday wishes for employee marathi

ऑफिस मधला सगळ्यांचा तू प्रेरणास्रोत
ऑफिसवर आलेल्या संकटातील अंधारातील तू ज्योत
ऑफिसमधल्या आणि माझ्या आधारस्तंभाला म्हणजे सहकारी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

मन लावून तू प्रत्येक ऑफिसचं काम करतो
प्रत्येक संकट तू आव्हान म्हणून स्वीकारतो
त्या धैर्यवान सहकार्यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

पुढची बरीच वर्ष आपली सोबत अशीच राहो
सहकारी तुझा प्रत्येक दिवस आनंदात जावो
सहकारी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जसा एक मित्र तू
आनंदात आणि दुःखद धावून येतोस तू
नावालाच ऑफिसमधला सहकारी परंतु मला नेहमीच माझ्या भावासारखा भासतोस तू
वाढदिवसाच्या सहकारी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आज तुझा विशेष दिवस म्हणजे तुझा वाढदिवस जन्मदिवस
आजचा नाही तर येणारा प्रत्येक दिवस तुझे स्वप्न पूर्ण करत येवो
संकट तुझ्या मार्गातून आपसूक जावो
माझ्या सहकार्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

ऑफिसमध्ये आल्यानंतर एक मित्राची उणीव तू पूर्ण केली
मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा तू मला साथ दिली
त्या सहकारी शब्दास जागलेल्या सहकार्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देव तुला दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

जीवनात तुझ्या प्रत्येक पायरीवर तुला सुख भेटत जाईल
तू जे जे मागेल देव ते ते तुला देत जाईल
सगळ्या तुझ्या इच्छा पूर्णत्वास जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सहकारी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for employee in marathi

आनंदाचा दिवस आणि अशेची पहाट
माझ्या सहकाऱ्याला नेहमी मिळो यशाचीच वाट
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सहकारी तुला

माझ्या आयुष्यात बरेच सहकारी आले
परंतु तुझ्यासारखा कधी मला भेटला नाही
तुझ्या सारख्या मनमोकळ्या व्यक्तीला कोणीही कधी विसरणार नाही
त्या सहकार्यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

पूर्ण होवो तुझ्या इच्छा आणि आकांक्षा
प्रत्येक वाटेवर तुला मिळो सक्सेस
तुझ्यामुळेच प्रगतीस आला माझा बिजनेस
सहकार यास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सुख आणि समृद्धी तुझ्या चरणावर येवो
ऑफिसच्या चं नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात तुला यश येवो
सहकारी तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा

आयुष्यात तुझ्या प्रत्येक रस्ता फुलांनी बहरून जाईल
माझ्या सारख्याचं आयुष्य भरून पावेल
जेव्हा तुझ्यासारखा सहकारी माझ्या जीवनात येईल
माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या सहकार्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday Wishes for Colleague in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील अशी आशा आहे. आपल्या सहकर्मि कर्मचाऱ्यांना वाढदिवस शुभेच्छा संदेश म्हणून आपण या शुभेच्छा पाठवाव्यात व त्यांच्या वाढदिवशी या शुभेच्छा रूपी पुष्पानी मधुर सुगंधाचा प्रसार करावा. birthday wishes for employee in marathi या पोस्ट ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..

Read More :

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top