लग्न वाढदिवस आभार | Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi : लग्नाचा वाढदिवस म्हणजेच लग्नाला ठराविक वर्षे पूर्ण होणे होय. लग्नाचा वाढदिवस हा जोडप्यासाठी आनंदाचा क्षण असतो व या दिवशी चारही बाजूंनी लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश मिळत असतात. जर आपल्या देखील लग्नाचा वाढदिवस आलेला असेल तर सर्वात आधी आपणास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तर या लेखात आम्ही आपल्यासाठी लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश घेऊन आलेलो आहोत. यामध्ये लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश फोटो – Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi व लग्न वाढदिवस आभार बॅनर देण्यात आलेले आहेत.

या लेखात देण्यात आलेले आभार संदेश तुम्ही शुभेच्छा पाठवणाऱ्या व्यक्ती सोबत शेअर करू शकतात व लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करू शकतात. आम्ही आशा करतो की या लेखातील Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi आपणास नक्कीच उपयोगी ठरतील तर चला सुरू करूया..

Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्न वाढदिवसानिमित्त
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या रूपाने आपला स्नेह समजला
त्याबद्दल आपले मनापासून आभार
असाच स्नेह आमच्यावर राहो.. खूप खूप आभार

आपल्यासारखी मोठ्या मनाची माणसं
माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन
माझ्या नजरेत अजून मोठी झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार

लग्न वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छांचा वर्षाव झाला
सगळ्यांच्या शुभेच्छा बघून मनाला मोठा आनंद झाला
सगळ्यांचे अगदी मनापासून आभार
असंच प्रेम सोबत राहो हीच ईश्वराकडे मागणी

आनंदाच्या दिवशी शुभेच्छा असतात खास
तुमच्या वतीने घेतला आम्ही कायम एकत्र
राहण्याचा धास…
धन्यवाद मानतो तुमचे…नव्हे फक्त आपुलकीचा भास…
खूप मनःपूर्वक आभार..

वाचा> लग्न वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश

विविध माध्यमातून आपण माझ्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आपले खूप आभार असच प्रेम वृध्दिंगत होत राहो

तुमच्या शुभेच्छांचा स्वीकार मी मनापासून केला
तुमच्या समवेत आजचा दिवस साजरा झाला
तुमचे मनापासून आभार…

लाखमोलाच्या शुभेच्छांनी रंगत आली दिवसात या
अशा खास दिवशी तुम्ही कायम असेच सोबतीने या
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

शुभेच्छा नव्हत्या…
प्रेम स्नेह विश्वास होता तुमचा
मानुन आभार साऱ्यांचे
करते शुभेच्छांचा
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

भेटवस्तू सुंदर होत्याच…
त्याहीपेक्षा गोड होत्या
शुभेच्छा तुमच्या…
शब्दांनी धन्यवाद म्हणते
तसं तर राहील नेहमी
ऋणात तुमच्या
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

व्यस्त आयुष्यात वेळ काढणे
हल्ली प्रत्येकाला जमत नाही
आपल्या माणसांना
शुभेच्छांच्या रूपात भेटायला जमत नाही
पण तुमच्या सारख्या गोड व्यक्तीला
ते जमलं याचं आश्चर्य काही वाटत नाही
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

आनंद दिल्यानेच वाढतो
आज हे नव्याने शिकले
नशीबवान आहे हे इतके
प्रेमळ व्यक्ती मला लाभले
शुभेच्छांनी तर माझे मनही सजले
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद…

भेटवस्तू पेक्षा सहवास तुमचा
जास्त महत्त्वाचा होता
शुभेच्छांनी दिवसाला
नवा रंग मिळाला होता
तुमचे खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद….

तुमच्या उपस्थितीने
आवडता दिवस अधिक
चांगला साजरा झाला
जसा कातरवेळी गुलमोहर
होता बहरलेला
शुभेच्छांनी माझ्या
दिवसाला अजून बहर आला
तुमचे मनःपूर्वक धन्यवाद…

आठवण बनुन गेला दिवस
हा शुभेच्छांनी भरलेला माझा…
जणू इंद्रधनुष्य निघाला
निरभ्र आकाशात माझ्या
शुभेच्छांनी केला
वर्षाव दिवसावर माझ्या
खूप मनःपूर्वक धन्यवाद….

Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi

लग्न वाढदिवशी वेळात वेळ काढून आपण शुभेच्छा दिल्या
आणि आपल्या जीवनातील महत्त्वाची व्यक्ती समजून
आपण आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार

आपली आपुलकी, आपलं प्रेम असच राहावं
माझ्या लग्नावर दिवशी व्यक्त केलेले प्रेम असच कायम राहावं
आपले मनापासून आभार

लग्न वाढदिवस हा एक दिवसाचा आहे
परंतु आपल्या शुभेच्छांचा स्नेह आयुष्यभर माझ्यासोबत आहे ही ग्वाही देऊन आपल्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनापासून आभार व्यक्त करतो

आपल्या माणसांना धन्यवाद
म्हणून परके करायचे नसते
शुभेच्छांचा वर्षाव झाल्यावर मात्र
आभाराला थोडे क्षण द्यायचे असते
खूप खूप धन्यवाद…

शब्द नाहीत आज मजकडे
मानावयास तुमचे आभार
आपल्या माणसांना जपून
जगायचा खास दिवस
हाच असेल आयुष्याचा सार…
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

दिवस इतका सुंदर जगला नसता
साथीला जर का तुमच्या शुभेच्छा नसत्या
धन्य झाले मी यादिवशी
शुभेच्छा तुमच्या बघून
खरंच आयुष्यात माझ्या
तुमच्या सारख्या मैत्रीणी नसत्या
खूप मनःपूर्वक शुभेच्छा…

शुभेच्छांचा वर्षाव बघून
भारावून गेले मी किती
धन्यवाद मानून तुमचे
जपायच्या मला नात्यांच्या रिती
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

तुमच्या शुभेच्छांना नसावा
शेवट कधीही आयुष्यात माझ्या
आयुष्याभर राहाल तुम्ही
नेहमी नेहमी मनात माझ्या
अश्याच सोबती ठेवा शुभेच्छा
तुमच्या जीवनात माझ्या
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

असं म्हणतात आपल्या लोकांचे
आभार मानायचे नसते
पण … आभार न मानता
त्यांच्या ऋणात राहायचे असते
तरीही खूप मनःपूर्वक आभार…

आपण माझ्या लग्न वाढदिवसानिमित्त आपल्या शुभेच्छा देऊन मला आपल्यातलं एक व्यक्ती मानलं त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

आकाशाला शोभा जशी इंद्रधनुष्य प्रमाणे येते
तशीच आमच्या विशेष दिनाला तुमच्या शुभेच्छांमुळे शोभा येते
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या स्मरणात राहतील त्याबद्दल आपले खूप खूप आभार

माझ्या लग्न वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत त्याचा मनातून स्वीकार करून असाच स्नेह राहावा ही ईश्वरचरणी प्रार्थना

आपल्या शुभेच्छा पाहून मला मी जोडलेल्या माणसांची श्रीमंती समजून आली
आपल्या मनात माझ्याविषयी असणारी जागा बघून आपल्या नात्याला नवीन नजर आली
लग्न वाढदिवशी शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

लग्न वाढदिवस आभार संदेश बॅनर

माझ्या लग्न वाढदिवशी आपण दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छा माझ्या आनंदात भर घालतील
आपल्यासारखी माणसं जगण्याचं मोल ठरतील लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनापासून आभार

लग्न वाढदिवसाचा आनंद तुमच्या शुभेच्छा तून वाढून येतो
माझ्यावर आपल्या असणाऱ्या प्रेमाची हा दिवस साक्ष देतो
आपले मनापासून आभार

आपल्या शुभेच्छांच्या रूपाने आपला आमच्यावर असणारा स्नेह कळाला
आनंददायी आमच्या संसाराला तुमच्या शुभेच्छा तुला आशीर्वाद मिळाला
आपला ऋणानुबंध असाच वाढत राहो हीच देवाकडे मागणी
लग्न वाढदिवसाच्या दिवशी भावना व्यक्त केल्याबद्दल आपले मनापासून आभार

आपल्यासारखी माणसं माझ्या जीवनात आहे याचा मला आनंद आहे
आपण लग्न वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा परतावा करता येणार नाही
आपल्यासारखी माणसं मागूनही प्रत्येकाला मिळत नाही
आपले खूप खूप आभार

आयुष्यातल्या खास दिवशी
शुभेच्छा तुमच्या येत राहो
आणि आभार मानुन तुमचे
तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहो
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांना मी
कधी विसरणार नाही
इतक्या सुंदर दिवसाला
तुमच्या शुभेच्छांशिवाय
नसते आले महत्त्व काही
खूप मनःपूर्वक आभार…

आजकाल आयुष्य
खूप झालंय म्हणतात व्यस्त
तरीही शुभेच्छांनी तुमच्या
जगले मी हा दिवस मस्त
खरंच आजच्या शुभेच्छासाठी खूप खूप धन्यवाद…

माझ्या आवडत्या दिवसाचे
महत्व आज जरा जास्त वाढले
शुभेच्छांच्या वर्षावाने
मला सुखद क्षण लाभले
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद….

प्रेम , स्नेह , विश्वास
अमुल्य ठेवा असतो
जिवाभावाच्या व्यक्तींचा
माझ्या आयुष्यातील खास
दिवशी मिळाले हे सारे
रूपात तुमच्या शुभेच्छांच्या.खूप मनःपूर्वक धन्यवाद…

कळेना मला शब्दात व्यक्त करु की
जपून ठेवू कायम मनात माझ्या
धन्यवाद मानू की राहु ऋणात तुमच्या
खरंच अनमोल शुभेच्छासाठी धन्यवाद…

आयुष्या मधल्या काही खास दिवसाचे
सौंदर्य खरं तर आपल्या लोकांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमध्ये असते…
या शुभेच्छासाठी खूप खूप धन्यवाद…

आपली माझ्यावर असणारे आपुलकी शुभेच्छा तून समजून आली
आपल्यासारखी माणसं जीवनात असणं म्हणजे आयुष्याची पर्वणी झाली
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनापासून आभार

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश फोटो

आपल्या शुभेच्छा मुळे माझा आनंद द्विगुणीत झाला
आपण लग्न वाढदिवशी शुभेच्छा देऊन माझ्यावर आनंदाचा वर्षाव केला
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आपले मनस्वी आभार

आपला अनमोल स्नेह असाच स्मरणात राहील
आपल्या शुभेच्छा माझ्या आयुष्यात आनंद वाढवत राहील
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार

तुमचं आमच्यावर असणार प्रेम शुभेच्छातून व्यक्त झालं
असंच प्रेम आमच्यावर असावं
लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करून आपले खूप खूप आभार

वेळ काढला तुम्ही
शुभेच्छा द्यायला आम्हाला
खूप आनंद झाला
बघून शुभेच्छा तुमच्या
या जीवाकडून खूप खूप
धन्यवाद तुम्हाला….

अविस्मरणीय झाला
खास दिवस आमचा…
धन्यवाद म्हणून
क्षण जपते ऋणाचा
खूप मनापासून धन्यवाद…

स्मितहास्य आले होते
चेहऱ्यावर पुन्हा आज
शुभेच्छांनी केला होता
माझ्या दिवसाचा साज
आभार मानते पुन्हा पुन्हा आज
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

सुर्यकिरणे तपकिरी शोभा वाढवतात दिवसांची
तशीच आज आरास होती तुमच्या खास शुभेच्छांची
शुभेच्छासाठी खूप खूप धन्यवाद…

शुभेच्छामुळे तुमच्या परिपूर्ण झाला माझा दिवस
नेहमीप्रमाणे शुभेच्छा देऊन सुंदर बनवला तुम्ही खास दिवस
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

आशिर्वाद मोठ्यांनी दिला
लहानशी प्रेमळ भेटवस्तू दिल्या
सामान्य दिवसाला आमच्या
तुम्ही सुंदर आठवणी दिल्या
खूप मनःपूर्वक धन्यवाद…

तर मंडळी या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम लग्न वाढदिवस आभार संदेश – Thanks for Marriage Anniversary Wishes in Marathi शेअर केलेत. आशा आहे आपणास ही माहिती उपयोगी ठरली असेल. आणि या शुभेच्छा संदेश पैकी आपण आपल्या आवडीचे संदेश नक्कीच शोधून काढले असतील. आमची इच्छा आहे की तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येक व्यक्ति सोबत आपण हे शुभेच्छा संदेश शेअर करावेत आणि त्यांचे मनापासून आभार व्यक्त करावे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार संदेश फोटो आपणास कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद..

READ More

Shares