60th Birthday wishes in Marathi : वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा आनंदाचा दिवस असतो. प्रत्येक वाढदिवसासोबत व्यक्तीचे वय हे वाढत जाते. परंतु आयुष्याच्या या कालावधीत वाढदिवसाचे देखील टप्पे असतात. यापैकीच एक टप्पा आहे 60 वर्षांचा. सामान्यतः 60 वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना सीनियर सिटिजन म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाते. 60 वर्षानंतर चे वय हे रिटायरमेंट वय म्हणूनही ओळखले जाते.
जर आपणही 60 वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तींसाठी 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. कारण या लेखात आम्ही आपल्यासाठी 60th Birthday wishes in Marathi चा एक संग्रह घेऊन आलेलो आहोत. हे शुभेच्छा संदेश आपण 60 वा वाढदिवस असणाऱ्या व्यक्ति सोबत शेअर करू शकतात आणि त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छा देऊ शकतात. तर चला सुरू करूया..
60 व्या वाढदिवसाला काय म्हणतात ?
अनेकांचा प्रश्न असतो की 60 व्या वाढदिवसाला काय म्हटले जाते ? 60 व्या वाढदिवस वर्षाला इंग्रजीत डायमंड जुबली (Diamond Jubilee) व मराठी भाषेत हीरक महोत्सव म्हटले जाते. पुढे आपणास हिरक महोत्सव चे शुभेच्छा संदेश देण्यात येत आहेत.
60th Birthday wishes in Marathi
तुमच्या प्रत्येक कामातील चैतन्य आणि स्फूर्ति
आम्हाला तुमच्या वाढत्या वयाची
अजिबात आठवण येऊ देत नाही.
आपणास 60 व्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याकडेपाहून मला नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते
ती म्हणजे कामासाठी वय नाही उत्साह लागतो
आणि उत्साह हा वयाप्रमाणे थकू देऊ नये
तुम्हाला तुमच्या 60 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जे जे तुम्हाला हवे ते ते न मागता मिळावे
आयुष्यात येणारे प्रत्येक वर्ष आनंदाने जावे
आपणास 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
जीवनात येणाऱ्या चांगल्या वाईट क्षणांना पार करून
वयाच्या 60 व्या वर्षात आपण पदार्पण केल
असंच पुढे जगत रहा हीच ईश्वराकडे इच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाचा> वडिलांना वाढदिवस शुभेच्छा संदेश
मनानं, वयानं आणि आपल्या कर्माने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला
60 व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचं आयुष्य आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Happy 60th Birthday
प्रत्येक काम अतिशय कौशल्याने करणाऱ्या
आणि प्रत्येकाला समजून-उमजून घेणाऱ्या,
कुणावरही संकट आली तर आधी धावून जाणाऱ्या
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आला आला वाढदिवस आनंदाची जणू पर्वणी
सुख समृद्धी अन् आनंदी आनंद नांदो आपल्या मनी
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा
60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
सुखच सुख मिळावे आपणास आयुष्यभर
दुःख न मिळो आपणास एकही क्षणी
वाढदिवस आणि येणारी आयुष्याची
पुढील वर्षे सुखाने नांदो आपल्या अंगणी
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपणच माझे आधार
माझ्या धेय्याची किनार
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचे सोबती
आपण माझ्या जीवनाचे सार
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही म्हणजे आकांक्षा नि स्वप्नपूर्ती
गगनात न मावणारी आपली प्रगल्भ कीर्ती
आपणास 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचा वाढदिवस आला आहे
चारही बाजूंना आनंदाचा बहर झाला आहे
वयाच्या 60 व्या वर्षी शंभर वर्षे आयुष्याचा आशीर्वाद आपणास मिळो
हीच शुभदिनी प्रार्थना आहे…
आपणास 60 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपली सर्व स्वप्न पूर्ण होवोत
कोणतेच स्वप्न अपूर्ण न राहो
धनधान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
वाढदिवसाच्या शुभदिनी सुखसमृद्धी चे व्हावे आगमन
आपणास वयाच्या 60 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
अधिक शुभेच्छा संदेश मिळवण्यासाठी पुढील लिंक वर जा
???
तर मित्रहो या लेखात आम्ही आपल्यासाठी काही खास आणि नवीन 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – 60th Birthday wishes in Marathi शेअर केलेत. आशा आहे आपणह हे सर्व शुभेच्छा संदेश आवडले असतील आणि उपयोगी ठरले असतील. वर देण्यात आलेल्या 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पैकी आपण आपल्या आवडीच्या शुभेच्छा निवडून काढल्या असतील ही आशा आहे.
याशिवाय कुटुंबातील आणि नात्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आपल्याला आमच्या वेबसाइट wishmarathi.com ला मिळून जातील. याशिवाय wishmarathi वर नवनवीन सण उत्सव चे शुभेच्छा संदेश सोबत स्टेटस, quotes इत्यादि देखील नियमित टाकले जातात, त्यांना देखील आपण वाचू शकतात. धन्यवाद.
Read More
मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..