धोकेबाज ब्रेकअप शायरी स्टेटस मराठी | Breakup Quotes & Status in Marathi

Breakup Quotes in Marathi : मित्रहो तरुण वयातील मुलामुलींमध्ये प्रेम होणे, breakup, patchup होणे या सारख्या गोष्टी सुरू असतात. परंतु जर आपण कोणाशी खरे प्रेम करीत असाल आणि त्या व्यक्तीने तुम्हाला दगा देऊन तुमच्यासोबत ब्रेकअप केला असेल तर आजच्या या लेखातील breakup quotes in marathi व ब्रेकअप स्टेटस मराठी आपल्यासाठी फार उपयोगाचे ठरणार आहेत.

पुढील लेखात धोकेबाज शायरी मराठी संदेश मध्ये ब्रेकअप स्टेटस मराठी – breakup status marathi चा समावेश केलेला आहे. हे संदेश आपण breakup झाल्यानंतर आपल्या सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकतात. तर चला सुरू करूया..

Breakup Quotes in Marathi

breakup quotes in marathi

ओळखण्याचा प्रयत्न केला होता तुला
पण तू कधी माझ्यावर लक्ष नाही दिले
दुसऱ्यांवर फार विश्वास होता तुला
पण ज्याने तुला आपले समजले त्याला तू नेहमीच दूर केले

तुच सांगुन जा जाताना
तुझ्या शिवाय जगावं कसं
तुला मला कधी समजून घेता आलं नाही
आजुन यापुढे समजून सांगावं कसं

एकदा नात्यातला विश्वास संपला की मग राहतं निर्जीव नातं जसं विना सुगंधाचं फुल

breakup quotes in marathi

विश्वास होता तू विसरून जाशील मला
आणि आनंद आहे की तू विश्वासावर खरी उतरलीस

काही लोकांचं म्हणणं असतं वेळेनुसार आपण सगळं विसरतो परंतु काही व्यक्तींना आपण कधीही विसरू शकत नाही, भलेही त्या आपल्याला कधीच विसरुन गेल्या असतील

तुरळक लोकांच्या बोलण्याचा विश्वास तु धरला आणि माझं मन लाखो वेळा मी कधीच तुझ्याशी चुकीचं वागले नाही हेच सांगत होतं
पण तुला ते ऐकून ही घेता आलं नाही हेच माझ्या मनात सलत होतं

कीतीही थांबून घेण्याचा प्रयत्न केला तरी ज्यांना जायचचं असतं
त्यांच्याच मागे आपलं मन अडकुन पडत असतं
परंतु त्या पडण्यात वेदना फक्त आपल्यालाच होतात

मनात नेहमीच एक गोष्ट येते
ही व्यक्ती आपल्याला कधी भेटलीच नसती तर
आपण आज जितके उध्वस्त झालो तितके झालो नसतो तर
पण या जर तर त्या गोष्टी आज जगणं सोपं नाही करत

Breakup Quotes in Marathi

breakup quotes in marathi

माणसाच्या आयुष्यात कोण येणार कोण जाणार हे वेळ ठरवते
मग जाणार्या व्यक्तीच्या मागे वेळ आठवणींचे पाढे का गिरवते

माणूस तेंव्हाच तुटायला लागतो जेव्हा त्यानं सगळ्यांत जवळच्या मानलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याची किंमत शून्य आहे हे जाणलं असतं

रात्रभर अजूनही स्वप्न तुझेच आहेत
तू सत्यात नसला तरी माझ्या मनाच्या कप्प्यात आजही घर तुझेच आहे

गेर समजाने आपण वेगळे झालो
तू मस्त खुशीत पुढे निघून गेली
मी मात्र कायमचाच बरबाद झालो

एक मोठा गुन्हा झाला आयुष्यात माझ्या
मी स्वतःसाठी जगायचं सोडून तुझ्यावर मरत गेलो
मला माझं कधी होता आलं नाही
तुझा होऊनही मी रिकामाच उरत गेलो

breakup quotes in marathi

तुला माझी किंमत तेंव्हाच कळेल
जेव्हा कुणी दुसरं तुझ्या आयुष्यात येईल
तु तुझ्या जीवनातून मला काढलं पण माझ्या मनात तु दिलेली जखम कायम राहील

रोज दिवस निघतो आहे आणि दररोज रात्री होत आहे
सगळं बदलत असताना मी मात्र अजूनही तीच आहे
कितीही तुला विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुझी ती आठवण आजही येत आहे
Breakup Quotes in Marathi

त्या लोकांपासून लांबूनच चांगलं
ज्यांना जवळीकतेची किंमत नसते

तु जाताना मला घेऊन गेलास असं मी म्हणणार नाही
धड मला पूर्ण केलं नाही आणि अपूर्ण ही सोडलं नाही
नात्यातही तुला स्वार्थचं फक्त कमवता आला
माझ्याकडे आता गमवायला काहीच उरलं नाही

Breakup Status in Marathi

breakup status marathi

खोल मनी उगाच बोचते
सल तुझ्या आठवणींची
प्राजक्ताच्या गंधासही भासते
उणीव तुझ्या नसण्याची

लहानपणापासून खेळण्यासोबत खेळणारा व्यक्ती कधी मनासोबत खेळेल हे सांगता येत नाही
एखादा व्यक्ती आयुष्यातून इतक्या सहजतेने जातो
धडक त्याला जाऊ ही देता येत नाही आणि थांबुनी घेता येत नाही

ज्यांना आपण स्वतःचं समजायला लागतो तेच आपल्याला एक दिवस परकं करून जातात

त्या लोकांसाठी उदास होण्यात काय अर्थ, ज्यांना तुमच्या आनंदाचं कौतुक ना दुःखाची जाणीव

एका बाजूने वाट पाहण्यात अर्थ नसतो
ज्यांना आपली कधी गरजच नव्हती
आशा पासून अपेक्षा बाळगण्यात ही अर्थ नसतो

breakup status marathi

जीव लावूनी निभावलं होतं मी हे नातं
पण तू मनाच्या माणसासोबत डोक्याने खेळ खेळला
मी नव्हतेच असल्या स्वार्थी खेळात कधी तरबेज
तू माझ्या आयुष्याचा उधळणारा सारीपाट मांडला

तुला समजून घेण्यात मी पुर्ण उतरलो पण तुला मला कधी समजून घेताच आलं नाही
तू जातांनाही तुला थांबून घ्यायचं होतं
पण तुझ्या इच्छे पेक्षा मला कधी जास्त वागताच आलं नाही

प्रेम आनंदाचा प्रवास नाही
दुःखाचा त्यात आघात होतो
जेव्हा आपला श्वास असणारच आपल्याला सोडून जातो

या दुःखाला शब्दच नसतात व्यक्त होण्यासाठी
फक्त वाट पाहावी लागते त्याची तीव्रता कमी होण्यासाठी
प्रेमभंग

मनात आघात खूप झाले आहेत
परंतु यासारखा घात कोणता नाही
तुझं ते एक वेगळं होणं इतक लागलं मनाला की आता मनाला यापेक्षा दुसरा कोणता आघात होणं नाही

breakup status marathi

एकटं झालं आहे माझं आयुष्य
आता पावसाचे थेंब ही अश्रू झाले
सोबती फक्त तुझ्या आठवणी
त्या आठवणीतच आता माझे जगणे झाले

तू दिलेला गुलाब आजही माझ्या पुस्तकात शाबूत आहे
सगळं बदललं आहे तुझ्यासगट
परंतु मी अजूनही त्या गुलाबाच्या पाकळी तुला जपत आहे

धोकेबाज शायरी मराठी

प्रेमाच्या सावलीत वाढवायचं होतं मला आपल्या नात्याला
उन्हाची झळ लागली का कळेना आपल्या नात्याला
किती आणि कसं सावरून घ्यावं
निसटण्याचा गेलं आहे वाटेला
फक्त आणि फक्त दुःख च आलं आहे माझ्या वाट्याला

तुझं भेटणं खूप खास होतं माझ्यासाठी
माझ्या मनात प्रत्येक स्वप्न होतं तुझ्यासाठी
तू क्षणाचा ही माझा विचार केला नाही
मला वाऱ्यावर सोडून दिलं या निर्जीव जगासाठी

धोकेबाज शायरी मराठी

साम-दाम-दंड-भेद या कशाचाच प्रेमात उपयोग नसतो
नुसतं खरं प्रेम जरी झालं असतं तुला माझ्यावर
तुझ्यासाठी पाणी फिरवलं असतं मी या जगावर

तुला मिळवण्यासाठी प्रत्येक तरकीब आजमावली मी
तुला कधी समजलेच नाही की काय होतो म्हणून मी
ता नुसत्या सलत आहे त्या आठवणी
कसा होतो आणि तुझ्यामुळे कसा झालो मी

इच्छा असून सुद्धा काही व्यक्तींना कधीच थांबून घेता येत नाही
तुझ्याशिवाय पूर्ण आयुष्य काय एकेक दिवस ही कटता कटत नाही
तरीही मी जगून दाखवेन माझ्या परिवारासाठी
कारण त्यांचं प्रेम सोडलं तर खरं प्रेम कुणी माझ्यावर कधी केलंच नाही

Breakup Quotes in Marathi

धोकेबाज शायरी मराठी

तू म्हणत आहे मला विसरून जा पण तुला कसं समजाऊ तू सोडून मला काहीच आठवत नाही

म्हणतात प्रेम माणसाला मजबूत करतं पण माझं प्रेम मला इतकं कमजोर करून गेलं की आता प्रेम या शब्दावरही विश्वास नाही राहिला नाही

काही लोक आयुष्यात येतात आणि निघून जातात
आपल्याला त्यांची सवय लावून एकटं सोडून जातात

आठवणी तर खुप आहेत पण तुझ्या इतकी आठवण कोणाची नाही
साठवणीत गोष्टी ही अनेक आहेत पण तुझ्या भेटीची साठवण आणि त्याची तुलना कशातच नाही
आता या फक्त आठवणीच्या गोष्टी आहेत

आजही तो दिवस आठवतोय मला
ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं तुला
त्या दिवसापासून प्रत्येक विचार होता फक्त तुझा
तू एकदा तरी करायला हवा होता विचार माझा

आपण किती चांगलं वागलं तर समोरच्या आपल्याला चुकीचे समजतो
आता सगळं समजुतीच्या बाहेर गेलं आहे तरीही माझा जीव तुझ्यात अडकतो

माझ्या हसण्या तला खळखळाट पणा घेऊन गेलीस
सतत बोलणार्‍याला तू अबोल करून गेलीस
जायचं होतं असं हात सोडून माझा
तर माझ्या जीवनात तू का म्हणून आलीस

भांडून का होईना काही संवाद तरी व्हावा आपल्यात
असं हसून तोडलेलं नातं मंजूर नाही मला

गरज संपली की सगळे बदलतात हे ऐकलं होतं
पण त्या सगळ्यात मी तुला कधी धरलं नव्हतं
सगळं तुझ्या सोबतच गेलं माझ्या हाताची काही आता उरलं नव्हतं

ज्यांच्या आयुष्यात तुमच्या असण्या नसण्याला किंमत नाही
त्यांच्या आयुष्यातून आपण निघून गेलेलं कधीही चांगलं
त्रास होतो पण एका बाजूने भार असलेली नाव कधीही पलटी होतेच

ब्रेकअप स्टेटस मराठी

ब्रेकअप स्टेटस मराठी

माझ्यातून तुला वाजा करतेय पण तरीही तू उरतोच आहे
नकोसा झालायस असं नाही पण आता गणितच नको आहे

इतकं छान नात होतं आपलं ते अपूर्ण राहील
इतकं प्रेम असूनही ते दुराव्यातच राहील

मी तुझ्या प्रेमात बुडालो फक्त या आशेवर
तू मला पोहायला शिकवशील
तू तर मला बुडवून निघून गेलीस
माझ्या दम छाटा ची कहाणी मग त्या प्रेमसागरा तच विरून गेली

देव आशा लोकांना आपल्याला भेटतच का जे आपल्याला भेटू शकत नाही

कितीही शोधलं तरी तू आता सापडणार नाही
कारण तू हरवला असता तर शोधन होतं तू तर बदलला आहेस

एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ दिल्यावर आपण जिवंत राहतो पण जगत मात्र नाही

तू दिलेले प्रत्येक वचन मी आजही सांभाळून ठेवले आहेत
तू दिलेला धोका सोडला तर मी तुझ्या प्रत्येक गोष्टीला जपून ठेवलं आहे

सहज तू जाताना सांगून गेलीस
तुला माझ्यापेक्षा चांगलं कोणी भेटेल
पण तुला हे कसं समजलं नाही मला तुझ्या पेक्षा नाही तूच हवी होती म्हणून

ब्रेकअप स्टेटस मराठी

हात आताही तुझा माझ्या हाती आहे असंच वाटतंय
घडलं सगळं विपरीत तरी मन अडकून तुझ्यातच राहतंय

नात्यात विश्वास आहे तोपर्यंत ते टिकून राहतं
एकदा विश्वास उडाला की ते जिवंत नाही राहत

मनात आजही तूच आहे
सोबत नाही तु ही वेगळी गोष्ट आहे

जुन्या लोकांना आयुष्यातून जाऊ दिले तर नवीन लोक येतील
ज्यांना राहायचं असतं जीवनात आपल्या त्यांना जाऊ दिलेलं चांगलं

अश्रूंचा बांध तुझ्याच नावाने वाहात आहे
रोजचा दिवस येतो आणि आला तसाच जात आहे
माझ्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तुझा सहवास आजही आहे
तू माझ्या सोबत नाही मन मात्र आजी तुझ्यातच गुंतून आहे

वेळ गेल्यावर सवयी पण सुटतील
थोडं तू मला विसरशील थोडं माझं मन तुला कमी आठवत राहील

ब्रेकअप शायरी मराठी

ब्रेकअप शायरी मराठी

प्रेमात फक्त साथ हवी असते विश्वासाची
तू दिलीस मला भेट फक्त विश्वासघाताची

काही कहाण्या पूर्णत्वाला जात नाही
त्यांना एका विशिष्ट वेळी मोकळं केलेलं चांगलं
जबरदस्तीने कुणाला आपल्यात गुंतून ठेवता येत नाही

स्वार्थी नाथा आणि स्वार्थी लोकांना आपल्या आयुष्यातून जाऊ देण्याच योग्य असतं
धरून ठेवण्यात तेव्हा काही मतलब नसतो
काही गोष्टी सोडून देनच योग्य असतं

नातं वेळे अगोदर तुटलं तर ते मनात सलत राहतं
दुःख बनून राहतं ते आयुष्यभरासाठी
तू आलास आणि मला कायमचा धडा शिकवून गेलास

तू विसरशील मला आता काय मी माझी आठवण करून द्यावी
वेळ आता घालवण्यात अर्थ नाही
अजून किती द्यावी माझ्या प्रेमाची ग्वाही

माझी मजबुरी तुला समजून घेता आली नाही
मजबुर होते मी हे जाणून घेता आलं नाही
नातं मलाही टिकवायचं होतं पण माझं प्रेम तुला कधी आपलं करून घेता आलं नाही

तुझी वाट पाहण्यात अर्थ नव्हता
तू गोष्टी समजून घेण्यासाठी नाही नातं तोडण्यासाठी येणार होता
तुझ्या मनातलं सांगण्यासाठी नाही वेगळं व्हायचं हे सांगण्यासाठी येणार होता

जगात सगळ्या इच्छेला आहुती द्यावी लागते
प्रेमाला वेगळं होण्याचं वरदान असतं ते दुःखाने सहन करावं लागते

माझी जखम यासाठी मांडली होती तुझ्यापुढे
त्यावर मलम लागेल या आशेने
त्या जखमेवर मीठ चोळले गेले तुझ्या त्या नाही म्हणण्याने
माझ्या आयुष्याला सुरुवात झाली निराशेने

लोकांवर विश्वास ठेवण्या अगोदर मला एकदा तरी विचारलं असतं तर तुला सगळं समजलं असतं
माझा कधीच स्वार्थ नव्हता या नात्यात पण तुला समजून घ्यायला जेव्हा जमलं असतं

प्रत्येक प्रार्थनेत तुझं सुख मागितलं मी
तेव्हा पूर्ण उद्ध्वस्त झाले मी
समजलं तुझ्या जीवनात तु दुसऱ्या कुणालाच मागत आहे

तू आता भूतकाळ आहेस माझा
जो धड वर्तमानही जगु देत नाही आणि भविष्य सजवून देत नाही

Breakup Quotes in Marathi

प्रवासी या साठी सुरु केला होता
तू आयुष्यभर साथ देशील
प्रवास आजही सुरूच आहे पण तूच अर्ध्यावर साथ सोडून गेलास

तू कितीही परत येण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा आता अर्थ नाही
तुझ्यासोबत बळजबरी च्या नात्याला सांभाळण्यात माझा स्वार्थ नाही

प्रत्येक शब्दात विश्वासघात होता
हे माहीत असूनही मी विश्वास ठेवत गेले
तू सोडले मला त्या जलाशयात एकटीला
हे कळत असूनही मी वहात गेले

आयुष्यभर मनात ती आग कायम राहील
जीव ज्याला लावला त्यानेच काढून नेला

प्रेम अशी गोष्ट आहे मिळालं तर आबाद करतं
आणि नाही मिळालं तर बरबाद करतं
वाटतय आपण आबाद होऊन मग बरबाद झालोय
या दोन्ही गोष्टी मिळूनही आपण फकीर झालोय

आता उठान वर हसून असतं
फक्त डोळ्यात आता पाणी असतं
कधी तुझ्या आठवणीत तर कधी तुझ्या कमीपणाणे ते वाहत असतं

आता वाटतय प्रेम,विश्वास, साथ ,मन या गोष्टी फक्त तुटण्यासाठी बनलेल्या असतात
सगळं जुटलं तरी या गोष्टी नसल्या तर ती नाती तुटण्यासाठी च असतात

तुला भेटलोच नसतो तर होत्याचा नव्हता झालो नसतो
का आबाद असणारा मी आज बरबाद झालो नसतो

ही बेचैनी दिवस घालते माझा
रात्र दुःखात जात आहे
तुझा विश्वास घात सोबत राहून
उदासपनात माझं जीवन जात आहे

तुझ्या सोबत प्रेमात पडून तेही समजले मला की खऱ्या प्रेमाचा परतावा विश्वास घात असतो
त्याच्या बदल्यात आपला जीव घेणे ही असतो

तरबेज झाले त लोक सहजतेनं विसरून जायला
खऱ्या भावनिक लोकांचं काम नाही प्रेम सागरात बुडून जायला

तू माझ्या डोळ्यातले अश्रू समजून घेऊ शकला नाही
माझ्या ओठांचं शांत पण तुला कधीच कळालं नाही
मी न बोलता कित्येक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला
तुला त्याकडे लक्ष द्यायला कधी जमलच नाही

मनाचे दुःख तर मी या माझ्या हातांनी निवडलं होतं
तुझ्या प्रत्येक खोटेपणा ला मी विश्वासाने माझं धरलं होतं
दुसऱ्यांना आयुष्यातून उठवण्यासाठी अनेक कारस्थानं असतील
त जिवंत ठेवून तू माझं काळीज काढलं होतं

तुला जायचं होतं तर एकदा बोलून दाखवायचं होतं मला
सहजतेनं ते मी स्वीकारलं असतं आणि सोडून गेलो असतो मीच तुला

तु दिलेल्या जखमांचे आता हिशोब काय ठेवू
सगळं कसं गनतीच्या बाहेर गेलं आहे
कुठल्या कुठल्या गोष्टींची मांडणी ठेवू

माझं तुला कधी होता आलं नाही
खूप अपेक्षा होत्या तुझ्याकडून मला
एकालाही तुला उतरता आलं नाही

भळभळणाऱ्या जखमा आता माझ्या त्या प्रत्येक चुकांची आठवण करून देत आहेत
तुझ्या प्रत्येक चुकांना माफी देण्याची सवय मला आज एकटा ठेवत आहे

तर मित्रहो हे होते काही breakup quotes in marathi आणि breakup status marathi. आशा आहे हे धोकेबाज शायरी मराठी संदेश व ब्रेकअप स्टेटस मराठी आपणास आवडले असतील. आपण या लेखातील शायरी संदेश आणि images कॉपी करून आपल्या सोशल मीडिया ला शेअर करू शकतात. धन्यवाद.

READ MORE :

Shares