दु:ख मराठी शायरी नवीन | Sad Shayari in Marathi | Sad Love Shayari

प्रेमात यशस्वी न झाल्यावर अथवा प्रिय व्यक्ति द्वारे वेदना प्राप्त झाल्यावर दुख प्रत्येकालाच होत असते. व या दुखाला व्यक्त करण्यासाठी अनेक जन काही उत्तम शब्द व शायरी शोधत असतात. मराठी मध्ये अनेक Sad shayari बनवण्यात आल्या आहेत जसे जीवन समजून घेताना, डोळे ओले झाले, परक्यांनी जीव लावला आणि आपल्यांनीच घोडे लावले ही एक उत्तम Sad shayari in marathi आहे.

या लेखात आम्ही आपल्यासाठी मराठी शायरी नवीन Sad Shayari In Marathi अर्थात दुःख शायरी मराठी घेऊन आलेलो आहोत. ही शायरी संदेश वाचल्यावर आपणास प्रेमाची शोकांतिका आणि दुःख काय असते याबद्दल कळेल. हे marathi sad shayari quotes आपण सोशल मीडियावर शेअर करू शकतात व स्टेटस च्या माध्यमाने इतरांपर्यंत पोहोचवू शकतात.

Sad Shayari in Marathi

shayari sad marathi

शत्रूची गरज नाही राहिली आता,
कारण आपलेच दुःख देण्यास पुरेसे आहेत

काही गणिते किती सोपी असतात ना
जसे माझे तुझ्यातून वजा होत जाणे

हे जीवना बंद कर श्वासांचे येणे जाणे
मी थकलोय आता स्वतःला जिवंत समजत

तिला वेदना देण्याची हौस होती खूप
आम्हाला सुद्धा वेदना सहन करण्याची हौस होती भरपूर.

sad shayari in marathi

तिच्यासाठी लढलो सर्वांशी
परंतु शेवटी हरलो नशिबाशी

एकदा येऊन जा तू
एकदा भेटून जा तू
मी तुझा नव्हतोच कुणी
हे एकदा सांगून जा तू

ज्यांना आम्ही आवडलो, ते आम्हाला आवडू शकले नाही
जे आम्हाला आवडले, त्यांना आम्ही आवडू शकलो नाही

काही चूक झाली तर शिक्षा सांगून द्या
इतक्या वेदना का त्याचे कारण सांगून द्या
जरी थोडा उशीर झाला तुमची आठवण काढण्यात,
तरी तुम्हाला विसरुन जाऊ हा विचार डोक्यातून काढून द्या

गुलाब मराठी शायरी <<वाचा येथे

sad shayari in marathi

जीवन समजून घेताना
डोळे ओले झाले
परक्यांनी जीव लावला
आपल्यांनीच घोडे लावले

आता दुःखी राहणे देखील चांगले वाटते
कोणा जवळ न राहणे देखील चांगले वाटते
आता मी दूर आहे तरी मला काही फरक नाही पडत
कारण मला कोणाच्या तरी आठवणीत येणे चांगले वाटते

स्वतःच रडलो आणि
स्वतःच शांत देखील झालो
हा विचार करून की जर कोणी
आपले राहिले असते तर रडू देते का?

वेळेआधी अनेक संकटांशी लढलो आहे
मी माझ्या वयापेक्षा खूप मोठा घडलो आहे

मराठी शायरी नवीन

दु:ख मराठी शायरी नवीन

आपले तर खूप आहेत आयुष्यात
पण आपलेपणा कोणताच नाही

लागले आहेत घाव हृदयावर दाखवू नाही शकत
विसरावेसे वाटले तरी विसरू नाही शकत
प्रेमाचा शेवट शेवटी हाच होतो
त्याच्यासाठी तर त्याला मिळवू नाही शकणार

मराठी शायरी नवीन

तु विसर आता की
तेव्हा मी तुझ्यावर प्रेम केले
मज आज जुन्या जखमांचे,
काहीही वाटत नाही..!

जागं येते म्हणजे काय?
मन येत भानावर
आणि तुला आठवायचे नाही याचं
ओझं येऊन बसतं मनावर..

मराठी शायरी नवीन

एक गोष्ट कायम लक्षात ठेव
आयुष्यात तुला माझ्यासारखे भरपूर मिळतील
परंतु त्या भरपूर मध्ये मी नाही मिळणार

काही स्वप्ने तू तोडून टाकले
काही आम्ही सोडून टाकले

तुला काय माहिती मी
कोणत्या संकटात जातोय
म्हणायला तर जिवंत आहे
पण समोर प्रेमाचा मृत्यू पाहतोय

स्मशाना बाहेर लिहिले होते
मंजिल तर तुझी हीच होती
बस जीवन घालवून दिले येता येता
काय मिळाले तुला या आयुष्यात
तुझ्याच लोकांनी जाळून दिले जाता जाता

मराठी शायरी नवीन
मराठी शायरी नवीन

एकटेच लढावी लागते आयुष्याची लढाई
लोक सल्ला तर देतात पण सोबत नाही

तलवारीचे घाव तर मिटून जातात
परंतु शब्द रुपी तलवारीचे नाही..

दुःख देण्याचे कारण नको शोधू आयुष्या
मृत्यू येई पर्यंत आम्ही तुझ्या सोबतच आहोत

मित्रहो या लेखात आपण Sad Shayari in Marathi पाहिल्यात. खास करून लिहिण्यात आलेल्या मराठी शायरी जसे वेळेआधी अनेक संकटांशी लढलो आहे, मी माझ्या वयापेक्षा अधिक घडलो आहे या नवीन मराठी शायरी आहेत. आपण या शायरी whatsapp स्टेटस द्वारे शेअर करू शकतात.

दु:ख मराठी शायरी नवीन – Sad Shayari in Marathi आपणास कश्या वाटल्या कमेन्ट करून नक्की सांगा आणि जर याशिवाय आपणास आणखी काही marathi sad shayri माहीत असतील तर आम्हास कमेन्ट मध्ये शेअर करा. धन्यवाद..

READ MORE

🔴 Important Warning For all bloggers and content publishers© : All the Birthday wishes and Shayari's published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble.

 Join our Whatsapp Group> Click Here 

Shares
Scroll to Top
Scroll to Top