पती पत्नीचे नाते दोन धड आणि एक जीव असे असते. सप्तपदी दिलेल्या वचनामध्ये आयुष्यभर सोबत राहून एकमेकांच्या सुख दुखात सोबत राहण्याचे वचन देखील दिले जाते. एकमेकांमधील प्रेमात भर म्हणजे दोघांपैकी कोणाचा तरी वाढदिवस. वाढदिवस एक असा क्षण असतो ज्यामुळे आपापसातील प्रेम वाढवण्यात सहाय्य मिळते. पत्नी ही एका मैत्रिणीप्रमानेच असते, आणि म्हणूनच येथे आम्ही बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश (BIRTHDAY WISHES FOR WIFE IN MARATHI) घेऊन आलो आहोत.
हे सर्व शुभेच्छा संदेश अतिशय प्रेमाने व विचार करून लिहिण्यात आलेले आहे, म्हणूनच जेव्हा आपण हे आपल्या पत्नी सोबत शेअर कराल तेव्हा तिचा आनंद देखील गगनात मावेनासा होईल. येथे देण्यात आलेले wife birthday wishes in marathi आपण टेक्स्ट स्वरूपात कॉपी करू शकतात किंवा दिलेले इमेज देखील डाउनलोड करू शकतात.
Birthday Wishes for Wife in Marathi

कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील हेच आयुष्यभराचे Promise करतो तुला.
Happy Birthday Bayko
तू म्हणजे प्रीत माझी..
तू म्हणजे पहाटेचं मंजुळ गीत.
पूर्ण होवो तुझ्या साऱ्या इच्छा
डियर बायको…
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!
तुझ्या असण्याने…
माझ्या असण्याला अर्थ आहे.
डियर बायको तुझ्याशिवाय
माझं जगणं व्यर्थ आहे..!!
Happy birthday….🎂💐❤️
नकोच चीड चीड
नकोच रुसवे फार.
असू दे आयुष्यभर
असाच तुझा आधार.
वाढदिवसाच्या तुम्हाला
शुभेच्छा सरकार..!!
हळू हळू आयुष्याचं
कोडं सुटत जावं…
अश्याच तूझ्या सहवासानं
आयुष्य फुलत जावं…
पाण्यात पाहतांना सखे
तुझचं प्रतिबिंब दिसावं
ह्या जन्मीचं नातं आपलं
सात जन्मी टिकावं..!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
बर्थडे विशेस फॉर वाइफ इन मराठी

तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु कायम माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भरल्या घराची शोभा असते बायको
रित्या घराची उणीव असते बायको
म्हटले तर सुखाची चव असते बायको,
म्हटलं तर दुःखाची दवा असते बायको.
हॅप्पी बर्थडे डियर
आजही तो दिवस आठवतो
ज्या दिवशी तू दिसलीस
सुखवलेल्या मनामध्ये
जणू गुलाबाची कळी फुलली..!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
माझे हृदय जरी लहान असले तरी त्यात
तुझ्यासाठी जागा खूप आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
Birthday Wishes for Wife in Marathi

छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे
एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍
काहीसे असेच प्रेम आम्हा दोघांचे देखील आहे.
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रोज हवी तू अशी काहीशी
आयुष्याच्या खलबतासाठी
बायको नावाचं बंदर हवं
नवरा नावाच्या गलबतासाठी
परिस्थिति कितीही अवघड असू द्या, नवऱ्याला हार मानू देत नाही
कोणतेही संकट येऊ दे, बायको माझी कधी माघार घेत नाही
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चांदण्यात राहणारा मी नाही
भिंतीना पाहणारा मी नाही
तु असलीस नसलीस तरी
शून्यातही तुला विसरणारा मी नाही
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बायको.
😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Read> मुलींसाठी वाढदिवसाचे गिफ्ट्स
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Wife birthday wishes in Marathi text
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन आणि
तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर हातात असाच राहील
ओठांवरच हसू आणि तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये
बायको असते खास
बायको शिवाय जीवन उदास
प्रिय बायको माझ्यासाठी तूच माझा जीव की प्राण
Happy Birthday Wife
तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्या Wife ला नक्की आवडतील असे वाढदिवस गिफ्ट्स
👇👇
माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच
पद्धतीने आनंदी रहा..!
birthday wishes for wife in marathi
घराला घरपण आणणाऱ्या आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
Read> बायकोला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा
तु माझ्या जीवनात आहे हा विचार करूनच मी स्वताला खूप जास्त भाग्यवान समजतो. हॅपी बर्थडे प्रिये
किती तरी वेळा भांडतो रडतो, आणि चिडवतोही तिला
कितीही नकोशी झाली तरी, लांब गेली की करमत नाही मला
अशी ही माझी बायको, प्रिय बायकोला Happy Birthday..!
घरात कोणाची वस्तु कोठे आहे?
कुणाचा वाढदिवस कधी आहे?
सर्व गोष्टींची नोंद तिच्या डोक्यात पक्की असते
खरंच बायको खूप प्रेमळ आणि सर्वांची काळजी करणारी असते
Happy Birthday Wife
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या या वाढदिवशी एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
बायको म्हणजे तारुण्यात भेटलेला सहप्रवाशी आणि शेवटच्या प्रवासाची शेवट करणारी सह प्रवाशी
आयुष्यात काही मिळाले नाही तर कसला गम आहे
तुझ्यासारखी सोबती मिळाली हे काय कम आहे ?
प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.😍
happy birthday bayko marathi
wife birthday wishes in marathi
काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..🎂

माझ्या स्वप्नातील राजकुमारी
अर्थात माझ्या पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिव्यासोबत वात जशी
माझ्यासोबत तू तशी
happy birthday bayko
माझ्या प्रेमाची प्रीत तू
माझ्या हृदयाचे गीत तू
माझ्यासाठी जीवनाचे अमरीत तू
प्राणप्रिये माझी मनमित तू
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या संसाराला घरपण आणणाऱ्या
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीला
💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐

खूप प्रेम करतो तुझ्यावर
आणखी तुला काय सांगू
तू आयुष्यभर फक्त माझी रहा
याशिवाय अजून काय मागू…!
उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची प्रीत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बायको द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
हा वेडा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday My Beautiful Wife..!🎂
या वाढदिवशी एक वचन देतो तुला
कितीही संकटे आलीत तरी माझ्या हातात तुझा हात राहील,
आणि आयुष्यभरासाठी माझी तुलाच साथ राहील.
आनंदाने भरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तुझ्या दिशा दाही,
दुःखाची सावलीही तुझ्या आसपास येऊ देणार नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या
तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.
प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश
आणि माझे आयुष्य आहेस.
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीचा रंग बायको!!
मैत्रीची संग बायको !!
प्रेमाचे बोल बायको
पाकळ्यांचे फूल बायको
हॅप्पी बर्थडे बायको..!
भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
happy birthday dear wife

तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची
एक मैत्रीण सापडली आहे.
😍❤️ Happy birthday dear wife..! ❤️😍
नशिबाने जरी साथ सोडली
तरी तू माझ्या सोबत राहिलीस
तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला
एक नवीन दिशा मिळाली
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहार फुलांमुळे आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे
Happy Birthday Dear Wife,
Lots of wishes to you
कधी कठीण काळातील आधार झालीस
तर कधी माझ्या सुखाचा भाग झालीस
कळत नकळत तू आता माझ्या जीवनाचा
श्वास झालीस.
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

birthday wishes for wife in marathi
तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.
तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.
प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला
जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार
पत्नी दिली आहे ..!
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,🎂💮
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व
माझ्या पत्नीला ….!
हॅप्पी बर्थडे प्रिये
मी प्रेम केले तुझ्या अंतकरणावर
मी प्रेम केले तुझ्या भोळ्या भाबड्या मनावर
मी प्रेम केले तुझ्या काजळी डोळ्यांवर
मी प्रेम केले तुझ्या सोनेरी केसांवर
मी प्रेम केले तुझ्या रसरशीत \ओठांवर
मी प्रेम केले तुझ्या सावळ्या देहावर
मी प्रेम केले तुझ्या मधुर बोलीवर
मी प्रेम केले तुझ्या स्मित हास्यावर
Happy Birthday Bayko
बायकोला वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा मराठी संदेश

बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला
उचलून फेकता येईल. 😅
वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा बायको
असे म्हटले जाते की बायको नसेल तर राजवाडा देखील सुना आहे
आणि बायकोला रागावणे खरंच मोठा गुन्हा आहे
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे ❤️
आणि तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे. 😁
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
बायको घरी नसतानाच कळते बायकोची किंमत, हे ही कबुल करायला लागते मर्दाचीच हिंमत..
wife birthday wishes in marathi

बायको बुटकी जरी असली तरीही
दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.
Happy Birthday bayko
माझ्या बायकोला वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा
पत्नीला/बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू
तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.
😅 Happy birthday Dear 🎂🎉😁❤️
प्रत्येकाच्या नशिबात
एक बायको असते
आपणास कळतही नसते
डोक्यावर ती केव्हा बसते
बायको इतरांशी बोलतांना
गॉड, मृदु स्वरात बोलते
अजून ब्रम्हदेवाला ही कळाले नाही
नवऱ्याने काय पाप केलेले असते
वाढदिवसाच्या विनोदी शुभेच्छा बायको
बायको जर चांगला स्वयंपाक करत असेल तर सुगीचे दिवस…
बायको जर चांगला स्वयंपाक करत नसेल तर swiggy चे दिवस….
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये…
बर्थडे विशेष फॉर वाइफ इन मराठी [ birthday wishes for wife in marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल तुला माझी साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको
मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
किती प्रेम आहे तुझ्यावर हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय जगता येत नाही..!
हॅपी एनिवर्सरी डियर..!
बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश
Birthday wishes for wife in Marathi
हे पण वाचा 👇
birthday wishes for wife in marathi: आम्ही अशा करतो की तुम्हाला येथे देण्यात आलेले बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आवडले असतील. आणि तुम्ही आपल्या पत्नीसाठी / बायकोसाठी उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील. यामध्ये देण्यात आलेल्या बायकोच्या वाढदिवसाच्या कविता आपणास कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा.
आपण wife birthday wishes in marathi शिवाय इतर कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीसाठी वाढदिवस शुभेच्छा आमच्या या वेबसाइट च्या Birthday Wishes Marathi या सेक्शन मध्ये प्राप्त करू शकतात. धन्यवाद मराठी
प्रेम म्हणजे काय <<नक्की वाचा
अधिक वाचा :

मोहित पाटील हे विशमराठी ब्लॉग चे Founder व सुरुवाती लेखक आहेत. wishmarathi ही ब्लॉग साइट मोहित द्वारे सुरू करण्यात आलेल्या सुरुवाती ब्लॉग्स पैकी एक आहे. मोहित आज 30+ websites वर काम करीत असून अनेकांना ब्लॉगिंग व डिजिटल मार्केटिंग शिकवण्याचे कार्य देखील करीत आहेत. अधिक जाणून घ्या येथे..






