swami samarth quotes in marathi : अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. स्वामी समर्थ हे एकोणिसाव्या शतकामध्ये उद्भवलेल्या महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त पंथाचे महान संत होते. स्वामींनी आपल्या वेगवेगळ्या चमत्काराने व उद्बोधक गोष्टींद्वारे समाजात परिवर्तन घडवून आणले. स्वामी समर्थ आजही त्यांच्या लाखो भक्तांच्या मनात घर करून आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या देवळात पोहचतात.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी श्री स्वामी समर्थ यांचे विचार (swami samarth quotes in marathi), स्वामी समर्थ स्टेटस (swami samarth status in marathi) घेऊन आलेलो आहोत. हे श्री स्वामी समर्थ यांचे स्टेटस व शायरी संदेश आपण आपल्या सोशल मीडिया वर स्टेटस म्हणून वापरू शकतात.
Swami Samarth Quotes in Marathi

खचलेल्या मनात उभारी येते
अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते
जेव्हा मन माझे स्वामी समर्थांचे गीत गाते
स्वामीजी या नावातच एक ताकत आहे
सगळ्या संकटांना भिडण्याची हिंमत आहे
जगण्याची जिद्द आणि स्वामीभक्त असल्याने आयुष्याला किंमत आहे
श्री स्वामी समर्थ
संपूर्ण जीवन माझे ज्यांच्या चरणात अर्पण
असे स्वामीजी मरेपर्यंत माझ्या स्मरणात कायम

स्वामीजी मनोकामना माझी पूर्ण करा
सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा
ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन
जीवनात चांगले घडो वा न घडो परंतु
जे पण घडो ते तुमच्या इच्छेने होवो.
कारण तुमच्या इच्छेतील वाईटही चांगलेच असते.
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची श्री स्वामींना
सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला

सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने,
प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने
सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने
सर्व जग ज्यांच्या शरणात आहे
नमन त्या स्वामींच्या चरणात आहे

सृष्टी निर्माण करणार्याला देव म्हणतात
आणि आपल्या संकटांना हरणार्यानां “ब्रह्मांडनायक” म्हणतात
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामींची महिमा आहे अपरंपार
स्वामी समर्थ करतात सर्वांचा उद्धार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो
स्वामीजी तुमचे आयुष्य आनंदाने भरो.
| | श्री स्वामी समर्थ | |
सुखद शी स्वामींची हाक
प्रत्येक संकटात असते त्यांची साथ
जो कोणी त्यांना प्रेमाने बोलवतो
त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप
भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ
शक्ती चे नाम श्री स्वामी समर्थ
आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ
सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ स्टेटस मराठी

जगण्याला धार आहे
जीवनाला आधार आहे
जेव्हा स्वामी समर्थ आपल्या सोबत आहे तेव्हा कशाचा भार आहे
स्वामींचे नाव जर ओठाशी आहे
तर घाबरण्याची अजिबात बाब नाही
कारण स्वामी कायम आपल्या पाठीशी आहेत
स्वामीजी आमच्या दुखाश्रूना दूर करून,
डोळ्यात सुखाश्रू भरून द्या. हीच आपणास प्रार्थना
श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ ज्यांना सामोरे गेल्याने प्रत्येक दुःखातून मुक्ती होते
जगणं तर सजतेच पण स्वामीजी सोबत असल्याने मृत्यूतूनही सुटका होते
|| श्री स्वामी समर्थ ||
स्वामीजी तुमच्या शिवाय सर्व व्यर्थ आहे
मी तुमचा आणि तुम्ही माझ्या जीवनाचा अर्थ आहेत
हसून देतो मी जेव्हा लोक दगा देतात
कारण खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे मला,
की सोबत तर फक्त स्वामीजी देतात..!
तर मित्रहो आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम स्वामी समर्थ स्टेटस मराठी – swami samarth quotes in marathi शेअर केलेत. हे swami samarth suvichar in Marathi आपण सोशल मीडिया वर स्टेटस म्हणून शेअर करू शकतात. यामध्ये आम्ही आपल्यासाठी swami samarth quotes images in marathi चा देखील समावेश केलेला आहे. म्हणून आपण images देखील शेअर करू शकतात.
आपणास हे positivity motivational swami samarth quotes कसे वाटले कमेन्ट करून नक्की सांगा. याशिवाय जर आपल्याकडे देखील आणखी काही स्वामी समर्थ स्टेटस मराठी असतील तर आम्हाला कमेन्ट करून सांगा. धन्यवाद..
READ MORE :