Birthday Wishes for Son in Marathi: मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday wishes for son in Marathi : वाढदिवस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस असतो, या दिवशी घरातील सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच चारही बाजूनी शुभेच्छाचा वर्षाव होतो. परंतु वाढदिवसाचा सर्वाधिक आनंद हा जन्म देणाऱ्या आई वडीलानांच होत असतो. घरात जन्मलेल्या मुलाच्या सानिध्यात आई वडिलांचे आयुष्य अधिक सुखमय होऊ व परिपूर्ण होत असते. जर आपल्या देखील मुलाचा वाढदिवस जवळ आलेला आहे तर हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरणार आहे.

येथे आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश व फोटो शेअर करीत आहोत. हे बर्थडे स्टेटस, quotes, sms द्वारे व्हाटसअप्प, फेसबूक, इंस्टाग्राम इत्यादि सोशल मीडिया माध्यमांद्वारे व याशिवाय प्रत्यक्ष समोर भेटून तुमच्या मुलाला दिले जाऊ शकते.

मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Birthday Wishes for Son in Marathi
1st birthday wishes for son in marathi

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
🎉🎂 वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा. 🎂🎉


आईचे हृदय आणि बाबांच्या पाठीचा कणा आहेस तू
प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी खंबीर उभा माझा मुलगा आहेस तू
प्रिय मुलाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा 😊💖🥳


इवल्या इवल्या पावलाने
स्पर्श केला तू घराला
अलगद येऊन इथे
हर्ष दिला मनाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आईपण काय असतं
कळलं तुझ्या येण्याने
आधार झाला मला
तुझ्या या जन्माने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा

तुझ्या सारखा मुलगा मिळायला
भाग्य मोठं लागते…
तू आहेस म्हणून मी आईपण
प्रेमाने जगते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Happy birthday wishes for son in Marathi.
happy birthday son in marathi

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 😘🥳


प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
💖🎉 आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. 💖🎉


माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो. 💕🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा


वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील. 🌟🎂


मुलाला वाढदिवस शुभेच्छा
happy birthday wishes to son in marathi

व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..! 🥳🌟


सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला. ❤️✨


नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
💕🎉💖 माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.💕🎉💖


वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
🥳💕 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. 💕🥳


सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!


Happy birthday wishes for son in Marathi.
son birthday wishes marathi

आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन

कितीही दूर असला
तरी काळजाच्या जवळ
आहे तू…
बाळा ..या जन्मात माझं
जगण्याचं कारण आहे तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

जन्म दिला तुला जेव्हा
घर भरले सुख समाधानाने
आजही आनंदी आनंद वाटतो
त्या दिवसाच्या आठवणीने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तुझ्यामुळे आईबाबा
होण्याचे सुख आम्हा लाभले
बेटा … बघं हे घर
या समृद्धीने किती भरले!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


जन्मापासून आनंदात जगून
मुलगा होणं इतकसोप नाही
रोजच्या अपेक्षांखाली
नाहक तुडवल जाणं सोप नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Happy Birthday Dear son


बर्थडे विशेष फॉर सन इन मराठी
=

Happy birthday wishes for son in Marathi

अगणित मुले या जगात जन्माला येतात,
परंतु तुझ्यासारखा अज्ञाकारी व्यक्तिमत्व असलेला मुलगा नशीबवान लोकांनाच मिळतो.


नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.


तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझं ‘बाबा’ म्हणणं
मनाला स्पर्शून जाते
तुझ्या वाढदिवशी
घर आपले
भरभरून जाते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

बाबा आणि मुलाचे नाते
बेटा खास असते…
जन्मदिवस तुझा हा
माझ्यासाठी सुवर्ण योग असते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

तु आला या कुशीत
बघीतले तुला डोळे भरून
सांगू तुला मी तेव्हाच
घेतले आईपण जगून
आई कडून माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

हा फक्त तुझा वाढदिवस नाही
सोहळा आहे आमच्यासाठी
नसलं हाती काही तरी
तु पुरेसा आहे जगण्यासाठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

वाढदिवस जरी येत असेल
दरवर्षी… आम्ही नव्याने
साजरा करू….
आईबाबा होण्याचा हा दिवस
काळजात भरू…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

आई बाबाला बांधून ठेवणारा
ऋणानुबंध आहेस तू
घरात वावरणारे
खोडकर खेळणं आहेस तू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

हे पण वाचा: आई वडील शायरी

बाबांना कठीण काळात
हवा असलेला तू आधार देतो
संकटाला तू खंबीरपणे
तोंड देतो…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आईच्या चेहऱ्यावरील
हास्य असतो मुलगा
बाबांना आधार म्हणून
जवळ हवा असतो मुलगा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

प्रिय बेटा ..
सुखाची सुमने
उधळली जेव्हा
जन्म झाला तुझा…
संसारात आनंदी
असलेली मी
अजून समृद्ध झाला
संसार माझा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

मुलगा होणं इतकेही सोपं नाही
दुसऱ्यांना सावरत
स्वतः घडणे सोपं नाही
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सौभाग्य माझे
जन्म झाला तुझा
माझ्या पोटी…
तुझ्या साठी कायम
आशीर्वाद राहिल
माझ्या ओठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

बोट धरले तू माझे
चालणे शिकतांना…
सांभाळ तुझ्या
जीवाला
स्वतःच्या पायावर
उभे राहताना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

एक सुर्यकिरण पुरेसा आहे
नवी उमेद द्यायला…
माझ्या आयुष्यात तू
तो सुर्यकिरण आहेस…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
birthday wishes for son in Marathi

क्षण आला पून्हा
तुझ्या वाढदिवशाचा
हर्ष झाला मला
मुलाच्या जन्माचा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आयुष्याकडे तुझी वाटचाल
अशीच राहू दे हसतमुख
दुःख यावे माझ्या वाट्याला
तुला फक्त मिळावे सुखच सुख
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आयुष्यातल्या
सोनेरी पानावरचे
सुंदर शब्द आहेस तू
बेटा.. कितीही चिडले
तरी माझ्या काळजाचा
तुकडा आहेस तू
आई कडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

देवाने एक अनमोल भेट
दिली तुझ्या रुपात…
आता काही फार अपेक्षा
नाही या माझ्या जगात
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

प्रेमात तुला
आम्ही दोघांनी
वाढवले…
तुझ्या वाढदिवशी
सुखाचे क्षण
मज आठवले
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

हे पण वाचा: मराठी प्रेम कविता

हजार वेदना सहन करेल
तुझ्या सुखासाठी
हजार दुःख सोसेल
मी तुझ्या समृद्धीसाठी
बेटा तुच एक आधार आहे
माझ्या जगण्यासाठी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

सह्याद्रीसारखा कणखर
हो तू आयुष्य जगताना
जप आपली माणसे
प्रगतीचे शिखर गाठताना
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आशीर्वाद माझा कायम
तुझ्या सोबत राहणार
तू घे स्वप्नांना कवेत
दोघे मिळून आम्ही
ते क्षण नजरेत
भरून ठेवणार…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

आनंद आम्हाला
फार झाला
मुलगा म्हणून
जन्माला तू आला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

भावी आयुष्यात
फुलांनी तुझी
वाट सजवावी
अंधार दिसेल तिथे
प्रकाशाची ज्योत मिळावी
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

अस्तित्व तुझे
तू निर्माण कर कष्टाने
एक एक शिखर
पार व्हावे तुझ्या
परिश्रमाने
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…


Happy birthday wishes for son in Marathi.
आईकडून मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
वडिलांकडून मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
प्रिय मुला, तुझ्या वडिलांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा


बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
माझ्या मोठ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.


आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.


तर मंडळी या होत्या तुमच्या मुलासाठी काही Happy birthday wishes for son in Marathi. आम्ही आशा करतो की मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील आणि आपल्या लाडक्या मुलासाठी तुम्ही योग्य birthday wishes शोधून देखील काढल्या असतील. ह्या मराठी शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटल्या आम्हास कमेन्ट करून नक्की सांगा धन्यवाद…

READ MORE

Shares